शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कॅप नोंदणीला उद्यापासून आरंभ, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश नोंदणी ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 12:03 IST

वाचा, कोणकोणत्या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू होणार

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील इंजिनीअरिंग, विधी, कृषी, फार्मसी, एमबीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणीला १५ जून म्हणजे उद्यापासून सुरुवात होत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) त्याची तयारी पूर्ण केली आहे. कॅप प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा संपली आहे. यंदा सीईटी सेलकडून राबविण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पार पडून कॉलेज वेळेत सुरू होण्याची आशा आहे.

करोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. तशात शैक्षणिक वर्ष लांबले होते. आता करोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावर शैक्षणिक वेळापत्रकही जागेवर आणण्याच्या दृष्टीने यावर्षी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.  सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या १९ प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यातील १८ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलने पार पाडली आहे. यातील १६ परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. यंदा सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांसाठी ९ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू होणार

 अभ्यासक्रम- नोंदणी    बीई, बीटेक- १५ जून  एमबीए / एमएमएस- १५ जून एमसीए- १५ जून  एलएलबी ५ वर्षे- १५ जून बीए बीएड, बीएससी बीएड ४ वर्षे- १५ जून बीएड- एमएड- १५ जून कृषी- १५ जून बी. फार्मसी- १५ जून एम फार्मसी - १५ जून बी. एचएमसीटी- १६ जून  बी. प्लॅनिंग - १६ जून  बीएड अँड ईएलसीटी- १६ जून  एमएड- १६ जून  बी. डिझाइन - १६ जून  एमई, एमटेक- १६ जून  एलएलबी ३ वर्षे- १८ जून  एम.पी. एड - १८ जून  बीपीएड- १८ जून  एम आर्च - १८ जून एम. एचएमसीटी- १८ जून बॅचलर ऑफ फाइन आर्ट- २० जून  एम प्लॅनिंग - २० जून  बीएससी नर्सिंग- २० जून

नोंदणी माहितीसाठी सीईटीकडून ॲप

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रम यांच्या प्रथम वर्ष पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून प्रथमच मोबाइल ॲपमार्फत उमेदवारांना विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना व जागा वाटप इत्यादी माहिती मिळणार आहे. सदर मोबाइल ॲपचा वापर विद्यार्थी / पालकांना करता येईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीतून १२ वीचे गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जात, जात वैधता, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, तसेच कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता लागणारा सात-बारा उतारा आदी आवश्यक प्रमाणपत्र / दाखले यांची पडताळणी होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविला जाणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण