शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:10 IST2025-07-08T14:08:20+5:302025-07-08T14:10:50+5:30
CA Exam Result: जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी ७१व्या वर्षी CA परीक्षा उतीर्ण होऊन देशासमोर आदर्श ठेवला आहे.

शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA...
CA Exam Result: शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, अनेकांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. नुकताच CA परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ज्यात देशभरातील अनेकण उतीर्ण झाले. यामध्ये राजस्थानची राजधानी जयपूर येथे राहणाऱ्या ताराचंद अग्रवाल यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, ताराचंद यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झाल्यानंतर ताराचंद अग्रवाल आपल्या नातीला अभ्यासात मदत करायचे. यादरम्यान, त्यांना CA परीक्षेबद्दल आवड निर्माण झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया द्वारे आयोजित CA अभ्यासक्रम सर्वात आव्हानात्मक मानला जातो. पण, या वयातही ताराचंद यांनी अभ्यास सुरू केला अन् प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही परीक्षा उतीरण केली.
CA परीक्षा खूप कठीण मानली जाते
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया द्वारे आयोजित CA अभ्यासक्रम हा देशातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मात्र, ताराचंद यांनी निवृत्तीनंतर या वयात ही कामगिरी केली असून, ही देशातील तरुणांसाठी आदर्श ठरली आहे. आता ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणार आहेत. या यशाबद्दल ताराचंद अग्रवाल म्हणाले, "वय हा फक्त एक आकडा आहे. ध्येय, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर कोणीही कोणत्याही वयात हे यश मिळवू शकतो."