शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी कर्ज घेताय? - आधी हे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 09:34 IST

उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं, तर अनेकदा कर्ज हा पर्याय निवडावा लागतो.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं, तर अनेकदा कर्ज हा पर्याय निवडावा लागतो. हा निर्णय घेताना पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात- १ - व्याजाचा दर : भारतात शैक्षणिक कर्जही स्वस्त नाही. शैक्षणिक कर्ज बुडीत खात्यात जाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं या व्याजाचा दरही जास्त असतो. विद्यार्थी शिकत असतानाच व्याज भरले असेल आणि त्यानंतर नियमितपणे कर्जाची परतफेड केली असेल, तर बँका व्याज एक टक्क्याने कमी करतात. याचा फायदा घ्यायला हवा.२ - शिक्षणसंस्था : निवडलेली शिक्षण संस्था नामांकित असेल, तर बँकाही कर्ज देण्यासाठी पुढे येतात. अशा संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्याजाचा दरही कमी असतो. कारण, भविष्यात त्यांना चांगला रोजगार मिळण्याची बऱ्यापैकी खात्री असते. ३ - तारण किंवा गहाण : सार्वजनिक क्षेत्रातील बँका साधारणपणे ७.५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारणाचा आग्रह धरतात. अनेक वित्तीय संस्था तारणाशिवाय कर्ज देत असल्या, तरी व्याजाचा खर्च कमी करण्यासाठी तारण ठेवण्याचा पर्यायही चांगला ठरू शकतो.४ - सह-कर्जदार : बहुतेक वित्तीय संस्था सह-कर्जदार म्हणून पालकांचा आग्रह धरतात. पालक जर निवृत्त झाले असले किंवा निवृत्तीजवळ आले असले तर बँक त्यांना गॅरेंटर म्हणून विचारात घेत नाही. अशावेळी अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते.५ - मार्जिन मनी : एकूण खर्चात तुमचे योगदान मार्जिन मनी म्हणून ओळखले जाते. काही बँका मार्जिन मनी शिवायही कर्ज देतात, पण त्यांचा व्याजाचा दर अधिक असतो.६ - मोरॅटोरिअम किंवा अधिस्थगन : शैक्षणिक कर्जांची परतफेड विद्यार्थ्याचे शिक्षण संपल्यानंतर वर्षभराच्या आत सुरू होत असली, तरी दरम्यानच्या काळात व्याज फेडलेले असेल, तर फक्त मुद्दलावरच व्याज द्यावे लागते.७ - कर्जाचा कालावधी : जास्तीत जास्त कालावधीसाठी शैक्षणिक कर्ज घेणे परवडते. कारण इएमआय कमी असल्याने पगार कमी असला, तरी दडपण येत नाही. शिवाय कर्ज लवकर फेडले तरी त्यावर तु्म्हाला पेनल्टी लागत नाही.८ - स्कॉलरशिप : शैक्षणिक कर्ज हा उत्तम पर्याय असला, तरी तोच एकमेव नाही. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते. ती मिळत असल्यास कर्जाचा भार कमी होऊ शकतो.