शिक्षक होण्यासाठी यंदाही मोठी पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:58 IST2026-03-06T07:57:54+5:302026-03-06T07:58:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा यंदाही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शैक्षणिक वर्ष ...

शिक्षक होण्यासाठी यंदाही मोठी पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा यंदाही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी यंदा १,०९,५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ७०४० ने घट झाली आहे. असे असले तरी यंदाही प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखापार गेल्याने चुरस पाहायला मिळणार आहे. बी.एड. अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा गेल्या वर्षी १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी दिली होती. २०२४-२५ मध्ये ७९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. बीएडसह एमएड आणि एमपीएड अशा तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण १ लाख १६ हजार १३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक
एमपीएड : २४ मार्च २०२६
(फिल्ड टेस्ट: २५ मार्च)
एम.एड. : २५ मार्च
बी.एड. : २७ ते २९ मार्च
विद्यार्थ्यांनी नोंदणी किती?
वर्ष बी.एड. एम.पी.एड एमएड
२०२३-२४ ७९,९८४ २०८८ ३०६६
२०२४-२५ ७९,०८३ २६८६ २९८५
२०२५-२६ १,१६,५८५ २३८४ ३८०९
२०२६-२७ १,०९,५४५ २५१६ ३९५२
आता दुरुस्तीचा पर्याय
बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना चुका केल्या असल्यास त्यांना या चुका सुधारणेसाठी ७ मार्चपर्यंत सुविधा दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.