शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

आपल्या मुलांच्या वाट्याला उरेल बरबाद दुनिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 09:54 IST

या जगाला पर्यावरणाच्या विनाशाची पर्वा उरलेली नाही! निसर्ग नाही वाचला, तर या पृथ्वीवर माणूसही उरणार नाही !

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -

पर्युषण पर्वानिमित्त मी प्रतिक्रमण करत असता लक्षात आले यात तर सारे पर्यावरण सामावलेले आहे. जल, स्थळ आणि आकाशातील सर्व जीवांची मी क्षमा मागत होतो. माणसाची तर मागतच होतो. झाडे, पक्षी, कीटक आणि सर्व जनावरांची क्षमा मागत होतो. मनात प्रश्न आला, आपण पूजा तर पंचतत्त्वांची करतो, पण सामान्य जीवनात त्याप्रमाणे वागतो का? माणसाने जाणूनबुजून निसर्गाविरुद्ध शत्रुत्व का पत्करले आहे? निसर्गाचे नुकसान हे आपलेच नुकसान असताना आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेत आहोत? पर्यावरणाच्या बाबतीत माझ्या मनात हे विचार नेहमीच चालू असतात. माणसाच्या विद्यमान पिढीची लालसा पर्यावरणाचे मोठे नुकसान करत आहे आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याबरोबर आपल्या मुलाबाळांनाही भोगावे लागत आहेत. कधीकधी तर वाटते, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण काय मागे ठेवून जाऊ? आपल्या लालसेतून काय बाकी उरेल? 

अर्थात, पर्यावरणाचा असा विचार करणारे पुष्कळ लोक असले तरी; मोठा वर्ग असा आहे, जो अजिबात फिकीर करत नाही. हे जग विध्वंसाकडे चालले आहे. व्यक्तिगत पातळीवर आपण किती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो, याचा विचारही करत नाही आपण. आसपास जे दिसते त्याने मी सतत हैराण होतो. माझ्या संस्थेत, कार्यालयात इतके सारे लोक येतात, कोणी मोटारीने येतो, कोणी मोटारसायकलने. यातून किती कार्बन उत्सर्जित होत  असेल? जर प्रवासाची सार्वजनिक साधने उपलब्ध असतील तर हे उत्सर्जन कमी करता येईल. एका बसमध्ये किंवा रेल्वेत जास्त लोक बसतात. त्यामुळे प्रतिव्यक्ती उत्सर्जन कमी होते. एका कारमधून एक माणूस जात असेल तर ते अन्यायकारक नाही का? माझ्या वृत्तपत्राच्या छपाई विभागातील यंत्रांचे संचालन करण्यासाठी किती वीज  खर्च होते ते मी पाहत होतो; तेंव्हा लक्षात आले, ही इतकी वीज कोळशापासून निर्माण झाली... म्हणजे त्यामुळे किती कार्बन उत्सर्जित झाला असेल? 

- या प्रश्नातुन सुरु झाले विचारमंथन ! मग  अवघा लोकमत समूह आम्ही  सौर ऊर्जेकडे वळवला. सध्या लोकमतमध्ये वृत्तपत्र छपाई सौरऊर्जेवर केली जाते. अर्थात, त्यासाठी आम्हाला मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागली पण समाधान याचे आहे, की पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने आम्ही योग्य पाऊल टाकले आहे. खरे तर प्रत्येकाने याचा विचार करून व्यक्तिगत स्तरावर काही ना काही केले पाहिजे. केवळ सरकारवर भरवसा ठेवून कसे चालेल? आपले छोटे प्रयत्नही महत्त्वाचे ठरतील. अन्नाची नासाडी टाळणे हा त्यातलाच एक भाग. जवळपास ७० टक्के धान्य आणि फळांची नासाडी होते असे आकडेवारी सांगते. धान्य आणि फळे उत्पादन करताना पाणी द्यावे लागते, त्यात वीज खर्च होते. कीटकनाशके वापरावी लागल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. आपण धान्य आणि फळे वाया जाण्यापासून वाचवू शकलो तर किती फायदा होईल? पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने अनेक संमेलने झाली आहेत. जिनेव्हात संमेलन झाले तेंव्हा बहुतेक सदस्य पर्यावरण वाचवण्यासाठी सहमत झाले होते. रिओ दि जानेरो आणि पॅरीसमध्येही याच संकल्पाची अधिक ठाम  अशी पुनरुक्ती केली गेली.

१९९४मध्ये सर्वानुमते हे ठरवण्यात आले, की २०००पर्यंत कार्बन उत्सर्जन १९९०च्या पातळीवर आणले जाईल. यासाठी विकसित देश विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत सर्व ती मदत करतील. पण झाले काय? समझोता जागीच राहिला. इतकेच नव्हे तर २०१९मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती ट्रम्प यांनी ग्लोबल वॉर्मिंगसंबंधी पॅरीस करारातून  अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. भारत, रशिया आणि चीनवर ट्रम्प यांनी ठपका ठेवला की, हे देश काहीही करत नाहीत आणि अमेरिकेचे मात्र पैसे वाया चालले आहेत.

वास्तव असे आहे की, कार्बन उत्सर्जनाचे ऑडिट करण्यासाठी निरीक्षक नेमायलाही अमेरिकेने मोडता घातला आहे. पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान अमेरिकेने केले असेल, तर किंमत त्याच देशाने मोजली पाहिजे. विकसनशील देशांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. काही करायचे म्हटले, तर काही ना काही चुकणारच; पण सारखी फक्त नावे ठेवून कसे चालेल? ५,१०,१५ टक्के चुका होतील; पण निदान ८० टक्के तरी चांगले काम होईल...? आज परिस्थिती भयावह आहे. जंगले नष्ट केली जात आहेत. नद्या सुकत चालल्या आहेत. वायुमंडळ प्रदूषित होत आहे. ओझोनचा थर विरळ होत चालला आहे. डोंगर धसत आहेत. जीवजंतू नष्ट होत आहेत. आजार पसरत आहेत. पर्यावरणाचा नाश म्हणजे मनुष्य प्रजातीचा नाश होय. 

- आम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही असे आज कोणते तरी सरकारी खाते सांगू शकते? हा नाश आपणच केला असल्याने सुधारण्याचा रस्ताही आपल्यालाच शोधावा लागेल. लॉकडाऊनचा काळ आठवा. आपण सगळे घरात बसलो होतो तेव्हा निसर्ग कसा छान फुलून आला होता!  लॉकडाऊन भले नको; पण आपल्या दैनंदिन व्यवहारात शक्य ते बदल करायला तरी काय हरकत आहे?  हे लिहीत असताना मी स्वीत्झर्लंडमध्ये आहे. इथे हवेत कोणतेही प्रदूषण नाही. नद्या झुळूझुळू  वाहताना दिसतात. तळी साफ आहेत. मेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीची उत्तम व्यवस्था आहे. कुठेही कचरा दिसत नाही. स्थानिक लोकांशी माझे बोलणे झाले. ते म्हणतात, ही जबाबदारी आमची आहे.

- सगळ्या जगाने असा विचार केला तर किती बरे होईल! हे जग सुंदर व्हावे म्हणून सगळ्यांनी चिंता केली पाहिजे आणि चिंतनही!

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणVijay Dardaविजय दर्डा