शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धोकादायक कीटकनाशकांवर बंदी का नाही?

By रवी ताले | Published: October 17, 2017 12:20 AM

आरोग्य व पर्यावरणाच्या रक्षणासाठी धोकादायक कीटकनाशकांवर बंदीच हवी! मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे.

मोठ्या प्रमाणातील शेतकरी-शेतमजूर मृत्यूंच्या बातम्यांसाठी विदर्भ पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे. फरक एवढाच, की यापूर्वी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा होता, तर यावेळी कीटकनाशक फवारणीमुळे होत असलेले मृत्यू हा मुद्दा आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या आता अर्धशतक पार करण्याच्या बेतात आहे.सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यातून आणि पुढे अकोला, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमधूनही फवारणीच्या बळींच्या बातम्या येण्यास प्रारंभ झाला, तेव्हा एकच खळबळ उडाली. कीटकनाशकांची फवारणी तर वर्षानुवर्षांपासून होत आहे, मग यावर्षीच मृत्यू का होत आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्याची कारणेही यथावकाश समोर आली. वस्तुस्थिती ही आहे, की कीटकनाशक फवारणीने विदर्भात जरी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेतले असले तरी हे आक्रित जगात प्रथमच घडले असे नाही. जगात इतरत्र यापूर्वी अनेकदा कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत. भारतात केरळमधील कासारगोड जिल्ह्यात तर १९७६ ते २००० या कालावधीत शेकडो जणांचे मृत्यू झाले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. अगदी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही कीटकनाशक फवारणीने बळी घेतले आहेत.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेहमीच्या शासकीय शिरस्त्यानुसार विशेष तपासणी पथकाचे (एसआयटी) गठन केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला आहे. अर्थात, अशा अहवालांचे पुढे काय होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विक्रेत्यांनी शेतकºयांना दिलेले एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण फवारण्याचे सल्ले, कीटकनाशकांची अनधिकृत विक्री, उच्च क्षमतेच्या फवारणी पंपांचा वापर, संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव, अप्रमाणित कीटकनाशकांचा वापर या कारणांमुळेच विदर्भात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यातही अप्रमाणित कीटकनाशकांचा वापरच खºया अर्थाने घातक ठरल्याचे सुस्पष्ट आहे. अशा घातक कीटकनाशकांचे उत्पादन होते कसे, ती बाजारात विक्रीसाठी पोहोचतात कशी, हा खरा कळीचा प्रश्न आहे. गतवर्षीच्या अखेरीस भारत सरकारने १८ कीटकनाशकांवर बंदी घातली खरी; पण आरोग्य आणि पर्यावरणविषयक चिंतांमुळे जगभर बंदी घालण्यात आलेली ४८ कीटकनाशके अद्यापही भारतात सर्रास वापरल्या जातात. त्यापैकी काही कीटकनाशकांवर तर आपल्याच देशातील काही राज्यांमध्ये बंदी आहे; पण भारत सरकारने बंदी न लादल्याने उर्वरित राज्यांमध्ये ती बेधडक वापरल्या जातात.आपल्या देशातील शेतकरी प्रामुख्याने अशिक्षित वा अल्प शिक्षित आहे. परिणामी कीटकनाशक वापरातील आरोग्य वा पर्यावरणविषयक धोक्यांविषयी तो जागृत नाही. किरकोळ विक्रेता जे सांगेल त्यावर तो विश्वास ठेवतो. सर्वच नसले, तरी अनेक विक्रेते, उत्पादकांकडून दाखविल्या जाणाºया आमिषांना बळी पडून शेतकºयांना चुकीचे मार्गदर्शन करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोकादायक कीटकनाशकांवर संपूर्ण देशात सरसकट बंदी लादणे, हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार