शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अभियान कशाला?

By admin | Updated: January 25, 2016 02:15 IST

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अग्रभागी होते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही नुसती एकच काव्यपंक्ती उच्चारली तरी त्यातून सावरकरांची मातृभूमीविषयीची ओढ आणि प्रेम किती अगाध होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. सावरकर म्हणजे देश आणि मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणारे देशाचे अस्सल रत्न होते, हे कोण नाकारू शकेल? त्यांचे देशप्रेम, त्यांची देशसेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची हिंदुत्वावरील निष्ठा आणि त्यांचे ज्वलंत विचार व अनन्यसाधारण कार्य हे कोणत्याही मान-सन्मानापलीकडचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये शिवसेनेने एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठविण्याच्या अभियानाचा शुभारंभ शनिवारी केला. हे अभियान सावरकरांच्या पुढील महिन्यातील पुण्यतिथीपर्यंत राबविण्याचा संकल्पही करण्यात आला. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन शब्दातच त्यांचा उचित असा गौरव दडलेला आहे. जे भारताचेच रत्न आहे, हे अवघ्या विश्वाला ठाऊक आहे. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले तरच ते या देशाचे रत्न ठरतील असा याचा अर्थ होत नाही. ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण’ इतक्या अस्सल शब्दात आपल्या मातृभूमीबद्दलची भक्ती अभिव्यक्त करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न किताब देण्यासाठी कोणावर मागणी करण्याची वा अभियान राबविण्याची वेळ यावी, हेच देशाचे दुर्दैव मानायला हवे. खरे तर सावरकरांच्या प्रखर देशभक्तीला ‘भारतरत्न’ने अलंकृत करण्याची संधी शासनाने कधीच घ्यायला हवी होती. त्या किताबाने सावरकर या तेज:पुंज व्यक्तिमत्त्वात तसूभरही फरक पडणार नाही, याउलट त्या किताबाची खऱ्या अर्थाने उंचीच वाढणार आहे.