शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कोण म्हणतो आम्ही आळशी आहोत?

By admin | Updated: July 14, 2017 23:55 IST

खरे म्हणजे आम्ही भारतीय स्थितप्रज्ञ आहोत. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या संत वचनाचे आम्ही शब्दश: पालन करतो

खरे म्हणजे आम्ही भारतीय स्थितप्रज्ञ आहोत. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या संत वचनाचे आम्ही शब्दश: पालन करतो. कारण संत जे काही सांगून गेले ते जीवनाचे सार आहे, असे आम्ही समजतो आणि घरीदारी, अवतीभवती जे काही चालले आहे त्याकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो, यात आमचे चुकते काय? वास्तवात असा प्रश्नही आम्हाला पडत नाही, एवढे आम्ही आमच्या स्थितप्रज्ञ वृत्तीत रममाण झालो आहोत. आता आमच्या या स्वभावधर्माला कोणी आळशीपणा म्हणत असेल तर म्हणोत बापडे. कारण त्यांच्या अज्ञानाची आम्हाला कीव येते. आमच्या संतांची वचने त्रिकालाबाधित सत्य आहेत हे अशा पामरांना कोण समजावून सांगणार? स्टॅनफोर्ड विद्यापीठाने असाच एक शोध आम्हा भरतभूमीवासीयांबद्दल लावला आहे. तो म्हणजे आम्ही आळशी आहोत आणि आमचा आळशीपणा ठरविला तो आम्ही रोज किती पावले चालतो या निकषावर. आता हे त्यांना कोण सांगणार की तुमचे निकषच चुकीचे आहेत. चालण्याचा आणि आळशीपणाचा संबंध येतोच कुठे? फक्त चालतो तो आळशी नसतो असेच म्हणायचे तर पूूर्वी आमचे पिताश्री कार्यालयात पायी जात, आता आम्हीही कार्यालयात जातो ते चारचाकीतून. त्यांच्यापेक्षा कमी काम करतो असे मुळीच नाही. पूर्वी आमच्याकडे बहुतेक जण पायी चालत असत; पण त्यामुळे वेळ वाया जायचा. आता वाहने वापरून आम्ही तो वाचवतो. अगदी कोपऱ्यावरच्या दुकानातून दुधाची पिशवी आणायची असेल तर दुचाकी वापरतो आणि वेळ वाचवतो. वाचवलेला वेळ आम्ही दूरचित्रवाणी पाहून सामान्य ज्ञान वाढविण्यात घालवतो. बसून-बसून मन शिणले की टी. व्ही. पाहणे हा आमच्या दृष्टीने आराम असतो. आता तुम्ही आळशी म्हणत असाल तर नाईलाज आहे. वाचवलेला वेळ घालविण्यासाठी आम्ही मोबाईल न्याहाळत बसतो. तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुकवर रेंगाळतो. यातही श्रम होतात, पण त्याने आमचा मेंदू तरतरीत राहतो; पण वेळ घालविण्याच्या अनेक कल्पना आम्हाला स्फुरतात. तासन्तास बसून आम्ही राजकारणावर चर्चा करतो आणि पंतप्रधानांपासून सरपंचांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करीत असतो. अशी ही आमची क्रियाशीलता त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाला दिसली नाही. आमच्या डोक्यावर वैचारिक कामाचे किती ओझे आहे हे त्यांना काय कळणार? मोदींनी ट्रम्प यांच्याशी दोस्ती करावी असे आम्हीच सुचविले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता सगळी शेती फडणवीसांनीच कसायला घ्यावी, अशी आमची कल्पना आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतीलच. शिवाय फडणवीसांच्या मागचा रोजचा शेतकऱ्यांचा ताप कमी होईल. आमच्या म्हणण्याची कोणतेच नेते दखल घेत नाहीत हा भाग अलहिदा, म्हणून आमचे कार्य आम्ही थांबविणार नाही. आमच्या न चालण्याने देशाच्या औद्योगिक विकासात भरत पडते. देशात ८० टक्के दुचाकी वाहने आहेत आणि दरवर्षी त्यांचा खप वाढतोच. गेल्या वर्षी १ कोटी ७५ लाख ८९ हजार ५११ वाहनांची विक्री झाली. २०१५-१६ शी तुलना केली तर ११ हजार वाहनांची विक्री वाढली. समजा सगळ्यांनीच पायी चालण्याचे ठरविले तर दुचाकी वाहनांची मागणी कमी होईल आणि उद्योग क्षेत्राला त्याचा फटका बसेल. देशाचा विचार केला तर देशात २१ कोटी २३ हजार २८९ वाहने असून, त्यापैकी १२.१७ टक्के वाहने एकट्या महाराष्ट्रात आहेत. टक्केवारीत येथे महाराष्ट्र देशात अव्वल आहे. असायलाच पाहिजे. कारण आमचे राज्य पुरोगामी आणि उद्योगात आघाडीवर असणारे राज्य म्हणून उगाचच ओळखले जात नाही. महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख ६२ हजार १७५ वाहने आहेत. वाहनांमुळे प्रदूषण वाढते, न चालल्याने मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरुग्ण वाढतात हे जरी खरे असले तरी उपचारासाठी शहरा-शहरांतून अत्याधुनिक इस्पितळे आहेतच. मधुमेहाचे पाच कोटी रुग्ण असतील, पण उपचार आहेतच ना. न चालण्याने लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणाची समस्या समाजात वाढत चालली; पण ज्यांना वजन कमी करायचे ते घाम गाळतात, रोज सकाळ, संध्याकाळ फिरायला जातात. भारतीय माणूस रोज ४२९७ पावले तर महिला ३६८४ पावले चालतात. हाँगकाँगचा माणूस ६८८० तर अमेरिकेचा ४७७४ पावले चालतो. आमची हजार, दीड हजार पावले होतात कमी, म्हणजे लगेच आम्ही आळशी ठरतो का? आमच्याकडच्या महिलांना घरातच इतकी कामे असतात की त्यांचे घरातून बाहेर पडणे होत नाही. तरी घरातल्या घरात त्या इतकी पावले चालतात याचाही या अंगाने स्टॅनफोर्डने विचार करायला पाहिजे होता. या विद्यापीठाने मुंबईच्या माणसाचा अभ्यास करावा तो केला तर त्यांना चक्करच येईल. मुंबईकर नुसता चालत नाही तर तो उठल्यापासून झोपेपर्यंत सुसाट पळतच असतो. वर्षानुवर्षे नव्हे तर पिढ्यान्पिढ्या मुंबईकर धावत पळत असतो, याची दखल या विद्यापीठाने घेऊ नये हे नवलच. भलेही आम्ही चालत नसलो तरी जगाच्या तुलनेत कुठे कमी आहोत. सॉफ्टवेअरमध्ये आघाडी आहे, दूध उत्पादनातही मागे नाही, तीच अवस्था उद्योग, कृषी क्षेत्राची आहे. आमचे संरक्षण दल जगात तिसऱ्या क्रमांकाचे आहे, एवढेच काय लोकसंख्येतही दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी २०२५ पर्यंत चीनला मागे टाकून सर्वात पुढे जाणार असे देशोदेशीच्या विद्यापीठांनी भाकीत केले आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही आळशी कसे?