शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नव्या सरकारमध्ये खान्देश कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 9:24 PM

खान्देशने २० पैकी ११ जागा या आघाडीच्या पारड्यात घातल्या असल्याने नव्या सरकारमध्ये झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर ती चुकीची ठरणार नाही.

मिलिंद कुलकर्णीशिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तारुढ होणार हे अखेर निश्चित झाले. उध्दव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री असतील. खान्देशने २० पैकी ११ जागा या आघाडीच्या पारड्यात घातल्या असल्याने नव्या सरकारमध्ये झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर ती चुकीची ठरणार नाही.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला ४, काँग्रेसला ४, राष्टÑवादी काँग्रेसला १ जागा मिळाली. दोन अपक्ष निवडून आले असून त्यांनी आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सत्तारुढ होणाऱ्या आघाडीचे संख्याबळ ११, विरोधी बाकावर बसणाºया भाजपचे ८ आणि एमआयएमचा एकमेव आमदार तटस्थ राहण्याची शक्यता आहे.नवे सरकार आरुढ झाल्यानंतर स्वाभाविकपणे मंत्रिपदांची उत्सुकता असते. तीन पक्षांचे हे सरकार असल्याने मंत्रिपदांची विभागणी होईल आणि प्रत्येकाचा कोटा निश्चित केला जाईल. त्यात कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपदे यांचा समावेश राहील.गेल्या पंचवार्षिक कार्यकाळातील महायुतीच्या सरकारमध्ये खान्देशला अडीच मंत्रिपदे मिळाली होती. दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद. सुरुवातीला एकनाथराव खडसे हे वजनदार खात्यांचे मंत्री दीड वर्षे सत्तेत होते. गिरीश महाजन, जयकुमार रावल हे भाजपचे तर गुलाबराव पाटील हे सेनेचे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे खातीही चांगली होती. महाजनांकडे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण तर रावलांकडे पर्यटन, रोजगार हमी योजना, पाटील यांच्याकडे सहकार अशी खाती होती. खडसे यांच्याकडे तर महसूल, कृषी अशी महत्त्वाची खाती होती. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये महाजन आणि रावल यांचा समावेश होता. त्यामुळे खान्देशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टेक्सटाईल पार्क सारखे मोठे उपक्रम आणि सिंचन योजनांना मोठा निधी, जळगाव व धुळे महापालिकेचा विकास कामांसाठी निधी, कर्जमुक्ती असे लाभ मिळाले.पालकमंत्रिपदाबाबत मात्र तिन्ही जिल्ह्यांमध्ये धरसोडीची भूमिका राहिल्याने विकास कामांमध्ये सातत्य, प्रशासनावर पकड, प्रकल्पांचा पाठपुरावा या पातळीवर मात्र प्रभाव दिसून आला नाही. जळगावला या काळात तीन पालकमंत्री मिळाले. एकनाथराव खडसे, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन. या तिघांपैकी कोणाचीही चमकदार कामगिरी दिसून आली नाही. तीच अवस्था नंदुरबार जिल्ह्याची आहे. सुरुवातीला गिरीश महाजन आणि त्यानंतर जयकुमार रावल यांच्याकडे धुरा आली. परंतु, स्थानिक प्रश्नांची तड लावण्यात फारसे यश मिळाले नाही. धुळ्याला सलग पाच वर्षे दादा भुसे हे पालकमंत्री होते. परंतु, त्यांचाही लाभ ना जिल्ह्याला झाला, ना पक्षाला झाला.आता नव्या सरकारमध्ये तरी वेगळे काही घडेल, अशी अपेक्षा आहे. जळगावात गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. गेल्यावेळी त्यांचा उशिरा मंत्रिमंडळात समावेश झाला. यंदा कॅबिनेट मंत्रिपदाची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खान्देशात संपूर्ण १०० टक्के यश शिवसेनेला मिळाले. शिवाय चंद्रकांत पाटील यांच्यारुपाने बोनस आमदारदेखील मिळाला. चिमणराव पाटील, किशोर पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर लता सोनवणे या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. काँग्रेसकडून शिरीष चौधरी आणि राष्टÑवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे काय जबाबदारी सोपवली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.धुळ्यातील पाच जागांपैकी आघाडीकडे काँग्रेसची एकमेव आणि साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी सेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन संख्याबळ आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र कुणाल पाटील हे दुसºयांदा निवडून आले आहेत. त्यांच्याकडे किमान राज्यमंत्रीपद सोपविले जावे, अशी अपेक्षा राहणार आहे.नंदुरबारमध्ये काँग्रेसला मिळालेल्या दोन जागांपैकी अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. पाडवी यांनी निवडणूक काळात प्रदेश पातळीवर मोठी भूमिका बजावल्याचे दिसून आले. सातव्यांदा ते विजयी झाले आहेत. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष नाईक हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. नंदुरबार आणि धुळ्यात भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी आहे, पूर्वी १५ वर्षे त्यांनी राज्यात सरकार चालविले आहे. परंतु, आता शिवसेनेचा सत्तेतील सहभाग नवीन असल्याने या सरकारचा कारभार कसा चालतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहील. त्यात खान्देशला सहभाग कसा राहतो, हेदेखील महत्त्वाचे राहणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव