तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:08 IST2025-06-11T11:07:53+5:302025-06-11T11:08:30+5:30

M.S. Dhoni: ‘धोनी... फिनिशेस ऑफ इन स्टाइल!’ हे वाक्य कुणीही भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरू शकत नाही. त्यानं तो षटकार मारला आणि २०११ च्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हॉल ऑफ फेमचा सन्मान आयसीसीने धोनीच्या नावानं केला आणि पुन्हा एकदा ते जुने क्षण आठवलेच.

When you feel thirsty, do you think? - Drink water.. | तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या..

तहान लागल्यावर विचार करता?- पाणी प्या..

- अनन्या भारद्वाज
(मुक्त पत्रकार)
‘धोनी... फिनिशेस ऑफ इन स्टाइल!’ हे वाक्य कुणीही भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरू शकत नाही. त्यानं तो षटकार मारला आणि २०११ च्या विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. हॉल ऑफ फेमचा सन्मान आयसीसीने धोनीच्या नावानं केला आणि पुन्हा एकदा ते जुने क्षण आठवलेच. टी- टे्वण्टी विश्वचषक, एकदिवशीय विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी देशासाठी जिंकून आणणारा एकमेव कप्तान ही धोनीची ओळख; पण हे चषक आणि त्यानं केलेल्या धावा, यष्टीमागे घेतलेले बळी यापलीकडे त्याची ओळख आहे. लहान शहरातल्या रांगड्या मुलांचा प्रतिनिधी होता- तो ‘लिजंड’ झाला.

नुकतंच आयपीएलमध्ये त्याच्या संघाचा पालापाचोळा झाला; पण कोण काय म्हणतं याची फिकिर तो करत नाही. त्यानं सांगितलंही की, ‘खराब कामगिरीने खचून जाऊन जर खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेऊ लागले तर अनेकांनी वयाच्या २२ व्या वर्षीच निवृत्ती घेतली असती!’ 

तो ना पराभवात खचून गेलेला दिसतो ना त्यानं कधी विजयाचा आक्रमक आनंद साजरा केला. यायचं, खेळायचं कप जिंकायचा आणि शांतपणे घरी निघून जायचं याहून जास्त काहीच येत नसल्यासारखा तो खेळला. 

‘इतका ‘पॉझिटिव्ह’ तू कायम कसा राहतोस?’ -असं त्याला एकदा मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तर तो हसून म्हणाला, ‘तुम्ही लोक फार विचार करता, ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा हे पाहत बसता. मी तसं काही करत नाही. माझं गणित सोपं आहे. मला तहान लागली आहे. माझी तहान भागण्यापुरतं घोटभर पाणी ग्लासमध्ये आहे, ते मी पिऊन टाकतो. तो अर्धा भरला होता की रिकामा, मला काय करायचंय? माझी आताची गरज भागली विषय संपला. त्यामुळे पुढचा नी मागचा विचार करत बसण्यापेक्षा तहान लागल्यावर करायची कृती काय?- तर पाणी प्यावं. इतकं सोपं असतं आयुष्य. तुम्ही कशाला कॉम्प्लिकेटेड करता?‘ 
उगीच का म्हणतात, थाला फॉर अ रिझन!
 

Web Title: When you feel thirsty, do you think? - Drink water..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.