शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:32 IST

काँग्रेस मविआतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकणे राष्ट्रवादीलाही अपरिहार्य होईल ! 

आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा एकत्रित तंबू म्हणजे राष्ट्रवादी. शरद पवार हे त्या तंबूतले रिंगमास्टर. कालपर्यंत राज्याच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल हातात असलेले पवार यांना फडणवीसांनी  राजकीय खेळी करून अवघ्या आठ दिवसांतच काहीसे अप्रासंगिक केले आहे. आता पवारांना नवीन भूमिका शोधावी लागेल. शिंदे यांच्या बंडानंतर मातोश्रीवरून फडणवीसांना समेटासाठी फोन गेल्याच्या बातम्या आल्या, पण राष्ट्रवादीकडूनही सत्तास्थापनेसाठीची ऑफर फडणवीसांना दिली गेली, अशीही चर्चा आहे. रात्री-बेरात्री काही नेते फडणवीसांना त्यासाठी भेटलेदेखील म्हणतात. फडणवीसांच्या सागर बंगल्यात गेल्या एक महिन्यात कोण कोण गेले हे शोधले तर धक्कादायक माहिती मिळेल. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे देवीला घातले जात असताना घरातले उपमुख्यमंत्रिपदही निघून गेले आहे.

आता विरोधी पक्षनेतेपद मिळेल. ते अजित पवार किंवा जयंत पाटलांना मिळू शकते. तसा क्लेम अजितदादांचा जास्त आहे, पण त्यांच्या पक्षात फक्त त्यांचीच मर्जी कुठे चालते? उद्धव ठाकरे लक्ष देत नव्हते, आमदारांना भेटतही नव्हते या शिवसेना आमदारांच्या तक्रारी होत्याच, पण त्यांचा त्याहूनही जास्त रोष हा राष्ट्रवादीकडून दाबले जात असल्याबद्दलचा होता. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडातील एक खलनायक राष्ट्रवादीदेखील आहे. सरकार आणण्याचे श्रेय त्यांचे; तसेच अपश्रेयाच्या धन्यांपैकीदेखील ते एक. 

आता महाविकास आघाडी कदाचित टिकणार नाही. आपण स्वबळावरच पुढे जाऊ, असा दबाव काँग्रेस पक्षातून नेतृत्वावर येईल. काँग्रेसमहाविकास आघाडीतून बाहेर पडली तर पुढे राष्ट्रवादीही शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस नावाच्या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकल्याशिवाय राष्ट्रवादीलाही पर्याय नसेल.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस