शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे राजकारणच !

By admin | Updated: December 19, 2015 03:45 IST

मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्याच्या कारणातून उद्भवलेल्या रोषाला राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपाच्या स्थानिक आमदारांना

- किरण अग्रवाल

मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्याच्या कारणातून उद्भवलेल्या रोषाला राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपाच्या स्थानिक आमदारांना सामोरे जावे लागल्याची घटना ताजी असताना आता नाशकातील पाणीकपातीचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. यात पाण्याची चिंता व नागरिकांच्या अडचणी राहिल्या बाजूला, पण परस्परांवर कुरघोडी करत एकमेकाना असंवेदनशील ठरविण्याचे जे राजकारण सुुरू आहे ते केवळ विदारकच नव्हे तर मतलबीपणाचेही ठरणारे आहे.
‘स्मार्ट सिटी’ योजनेतील सहभागाबाबत पाठवावयाच्या प्रस्तावाप्रकरणी नाशिक महापालिकेतही जी भवती न् भवती घडून आली, त्यामागे राजकारणच राहिल्याचे एव्हाना लपून राहिले नाही. अटी-शर्ती टाकून का होईना, तो प्रस्ताव पाठविला गेल्यानंतर आता पाणीकपातीचा मुद्दा उफाळून आला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्रच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्याला पाणी सोडावे लागल्याच्या विषयात राजकारण शिरले. सत्तेत सोबती असलेल्या खुद्द शिवसेना आमदाराच्याच पुढाकाराने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. पालकमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांतर्फे घेराव घातला गेला, तर नाशकातील भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद केला गेला. यानंतर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन, नाशकात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला गेला असताना, तसे करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र पालकमंत्र्यांनी पाठविले व हे पत्र महासभेत वाचून दाखवा म्हणून भाजपा आमदारांनी आग्रह धरल्याचेही पाहावयास मिळाले. यातून कुणाचे ऐकावे, महापालिका महासभेचे की शासन म्हणून पालकमंत्र्यांचे, अशा पेचात प्रशासन पडले हा भाग वेगळा; परंतु ‘यांनी निर्णय घेतला म्हणून त्यांनी पाणी पेटवायचे आणि त्यांनी काही कळविले की यांनी नकारात्मकता दाखवायची’, असे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. लोकभावनांची कदर आम्हालाच कशी आहे, हे दाखवून देण्याचा क्षुल्लक प्रयत्न यामागे असल्याचे लपून राहिले नाही.
मुळात, नाशकात एकवेळ पाणीपुरवठ्याची कपात केली गेली असताना पुन्हा आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याची गरज नाही असे जेव्हा पालकमंत्री सुचवतात तेव्हा त्यामागे त्यांनी काही अभ्यास केला असेल, हे उघडच आहे. परंतु त्यांच्या या भूमिकेला काटशह देत, आता तुम्हीच महापालिकेत बसून पाणीपुरवठ्याचे नियोजन करून दाखवा म्हणून आव्हानाची भाषा केली गेली. अर्थात असे करण्यामागे खरेच धरणातील पाणीसाठ्याची कमतरता असेल तर आता अगदी अलीकडे खुद्द प्रशासनातर्फे १५ वरून ३० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला गेल्यावर सत्ताधारी मनसेसह शिवसेना आदि सर्वपक्षीय गटनेत्यांनी खळखळ करण्याचे कारण नव्हते. पण नव्याने करावयाच्या वाढीव पाणीकपातीचा विषय महासभेपुढे न आणता परस्पर पुढे आल्याने त्यावर सर्वांनीच हल्लाबोल केला. वस्तुत: महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा हवाला देत हा वाढीव पाणीकपातीचा विषय पुढे करण्यात आला होता. परंतु अधिकारावरूनच प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर महापालिका आयुक्तांवर घूमजाव करण्याची वेळ आली. पाण्यासारख्या जीवन-मरणाशी निगडित विषयावर पालिका प्रशासनाने परस्पर असे करावे, ही यातील गंभीर बाब आहे. विशेषत: खुद्द महासभेने यापूर्वी पाणीकपातीसाठी पुढाकार घेतला असताना तिला त्यावेळी थांबवून आता वाढीव कपात रेटण्याचा प्रयत्न झाल्यानेच सत्ताधाऱ्यांसह अन्य पक्षीयांनी विरोधाची भूमिका घेतली. यात कुठे व कशा कपातीने पाणीबचत साधता येईल, या मूलभूत मुद्द्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे व ते अधिक शोचनीय आहे.