शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:10 IST

पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!

- राजा मानेपत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!अनेक माणसं आपल्याभोवती वावरत असतात. त्यांचं ‘वनमॅन आर्मी’ शैलीतील काम मात्र बºयाच वेळा आपल्या लक्षातही येत नाही. अशाच शैलीत सोलापूर जिल्ह्यात गेली चार तपं कार्यरत असलेलं नाव म्हणजे आबासाहेब तथा धनंजय एकनाथ माने!वकिली व्यवसायात राहून स्वत:च्याच आचारसंहितेबरहुकूम जीवनाची वाटचाल करताना वाचन, अभिरुची संपन्नता आणि सामाजिक जबाबदारीचे भान कशा पद्धतीने राखले जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणूनच आबासाहेबांकडे आज पाहिले जाते. वयाची सहासष्टी ओलांडलेल्या या माणसाने आपल्या ज्ञान व वाचनसमृद्धीच्या बळावर अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ ठरण्याचे आपसूक कार्य केले आहे.राजकारण असो वा आंतरराष्टÑीय इतिहास, त्याचे सर्व संदर्भ त्यांना जणू तोंडपाठच! या गुणाला प्रेमळ आणि निरपेक्ष स्वभावाची जोड मिळाल्याने सर्वच क्षेत्रात त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा गोतावळा तयार झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. करमाळा तालुक्यातील शेळगाव हे माने कुटुंबाचे मूळ गाव. शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुढे हे कुटुंब सोलापूरला स्थलांतरित झाले. सोलापूर नगरपालिका असताना १९६३-६४ साली त्यांचे पिताश्री अण्णासाहेब तथा अ‍ॅड. ए. तु. माने हे नगराध्यक्ष होते. वकिली आणि राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा होता. कडक शिस्तीचे आणि कल्पक असलेल्या अण्णासाहेबांनी त्या काळात सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत व्हावे, असा ठरावही केला होता. वडिलांचा असा संपन्न वारसा लाभलेल्या आबासाहेबांचे शालेय शिक्षण दमाणी हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले. बी. एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. कायदा विश्वात ते बॅ. शरदचंद्र बोस आणि कैलासनाथ काटजू यांना आपले गुरू मानतात. शिकत असतानाच त्यांचे वडील अण्णासाहेबांना कर्करोगाने ग्रासले अन् सर्वच कर्तव्यांची जबाबदारी आबासाहेबांवर येऊन पडली. ती जबाबदारी समर्थपणे सांभाळताना व्यवसायात सामाजिक मूल्य असणाºया खटल्यांमध्ये त्यांनी सदैव विशेष भूमिका बजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोरगरिबांच्या खटल्यांमध्ये विनामूल्य काम करण्याचे तत्त्व अंगीकारले.१९७५ पासून सक्रिय झालेल्या अ‍ॅड. धनंजय माने यांच्याकडे आज चार हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय आहे. इंग्रजीसह विविध भाषांमधील अनेक संदर्भ संकलित करण्याचा त्यांना छंद आहे. माणूस मोठा होतो, त्यात समाजाचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे आपण केलेल्या कमाईचा ५० टक्के वाटा समाजाला दिला पाहिजे, या तत्त्वाचे ते समर्थक आहेत. त्याच कारणाने प्रसिद्धीपासून दूर ठेवून कॅन्सरग्रस्त तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी ते आर्थिक मदत करीत असतात. याच कार्यात त्यांची पत्नी सौ. रेखा, चिरंजीव अ‍ॅड. जयदीप, सून नेहा यांचा सहभाग असतो. त्यांच्या दोन्ही कन्या अभियंता असून, त्यापैकी गीतांजली साळोखे ही अमेरिकेत तर दीप्ती जाधव ही मुंबईत संशोधन करते आहे. जिल्ह्यातील पत्रकारांबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेबांकडे पाहिले जाते.

टॅग्स :Solapurसोलापूर