शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

अवैज्ञानिक ‘कौमार्य चाचणी’च्या रोगट मानसिकतेचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 5:34 AM

केवळ शिक्षण देऊन नव्हेतर, अंधश्रद्धेच्या विळख्यातून राज्याला बाहेर काढणं हेच राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.

- नम्रता फडणीस (वार्ताहर-उपसंपादक)स्त्रीचं ‘योनिपटल’ हा समाजाच्या चर्चेचा विषय होईल हे कधी कुणाला स्वप्नातदेखील वाटलं नसेल. पण स्त्रीच्या योनीचा अत्यंत छोटासा भागच अनेक कुटुंबांच्या चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यामध्ये हे एक धक्कादायक वास्तव आहे.आजही कंजारभाटसारख्या समाजात तिचं कौमार्य सहीसलामत आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची परीक्षा घेतली जाते. एवढंच नव्हे, तर तरुणांनी वधूची ही कौमार्य चाचणी करण्यास विरोध दर्शविला तर त्यांना बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली जाते. या कंजारभाट समाजातील अमानवीय प्रथेचा पर्दाफाश झाल्यानंतर समाजात सर्व स्तरांतून वादंग उठले. अनेक पातळीवर विचारमंथन झाले. या प्रकरणात एकाच समाजाला लक्ष्य केले गेले तरी आता हा फक्त विशिष्ट समाजापुरताच मुद्दा राहिलेला नाही हे वास्तव म्हणावं लागेल.

विविध समाजवर्गांमध्ये अजूनही हे बुरसटलेले विचार डोक्यामध्ये पक्के घर करून बसलेले आहेत. का? आजही स्त्रियांच्या योनिपटलातील एक छोटासा पापुद्रा फाटला आहे की नाही यावर तिचे कौमार्य ठरवले जात आहे? खरंच ते इतकं महत्त्वाचं आहे? वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेक वेळा ही बाब अधोरेखित केली आहे की शरीरसंबंधाच्या वेळीच हा पडदा फाटतो केवळ एवढेच त्यामागचे कारण नाही; तर आजच्या धकाधकीच्या काळात सायकलिंग, व्यायाम किंवा खेळामुळेही हा पडदा फाटला जाऊ शकतो किंवा अनेक मुलींमध्ये तो जन्मजातच नसतो. तरीही तज्ज्ञांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून तरुणीच्या योनिपटलात तो पडदा असायलाच हवा आणि तो लग्नानंतर शरीरसंबंधावेळीच फाटायला हवा, तरच तिचं कौमार्य शाबूत आहे ही रोगट मानसिकता अजूनही समाजात मूळ धरून आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला. अभ्यासक्रमातून हा विषय पुसला गेला तरी विचारांमधून तो पुसला गेलेला नाही. आजही कुटुंबांच्या दडपणामुळे तरुणी कौमार्य शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांचे दरवाजे ठोठावत आहेत. हे नक्की कशाचे द्योतक आहे?

पुण्या-मुंबईसारख्या स्मार्ट शहरांमधील तरुणींचा ओढा या शस्त्रक्रियेकडे वाढत चालला आहे ही तर त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणता येईल. प्रसिद्ध कॉस्मॅटिक आणि प्लॅस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे यांच्या म्हणण्यानुसार, पुण्या-मुंबईत वर्षाला २0-३0 तरुणी ‘कौमार्य शस्त्रक्रिया’ करून घेत आहेत. आमच्याकडे तरुणी जेव्हा येतात तेव्हा त्या जरा अस्वस्थ किंवा घाबरलेल्या असतात. कुणाशी तरी त्यांचे शरीरसंबंध आलेले असतात आणि त्यांचे लग्न दुसºया तरुणाबरोबर ठरविले जाते. लग्नाच्या पहिल्या रात्री नवºयाच्या हे लक्षात आले तर? याची तरुणींना अधिक भीती आहे. पूर्वी कुणाबरोबर तरी शरीरसंबंध आले असल्याची गोष्ट कुटुंबातील कुणालाच त्या सांगू शकत नाहीत. खरंतर या शस्त्रक्रियेमुळे तरुणींचे कौमार्य पुन्हा मिळवून देणे शक्य नाही याची त्यांनाही कल्पना दिलेली असते.

या शस्त्रक्रियेत योनिपटलातील पापुद्र्याचा जो काही भाग शिल्लक राहिलेला असतो तो जोडून देण्याचे काम फक्त केले जाते. लग्नाच्या दहा ते पंधरा दिवस आधी ही शस्त्रक्रिया केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. परंतु हेही तितकेच खरे आहे की हा पापुद्रा फाटला तरी रक्तस्राव होईलच याची शाश्वती देता येत नाही. तरीही तरुणींकडून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आग्रह केला जातो. याचा अर्थ असा की आजच्या काळात तरुणी कितीही शिकल्या तरी काय योग्य आणि काय अयोग्य? हे समजण्याइतकी विवेकबुद्धी त्यांच्यात अद्यापही जागृत झालेली नाही.

एकीकडे कंजारभाटसारख्या समाजातील तरुणी ही प्रथा बंद होण्यासाठी आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या शहरी भागातील तरुणी शरीरातील अत्यंत निरर्थक भागाच्या जोडणीसाठी हजारो रुपये खर्च करीत आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली, पण या क्रांतिज्योतीचा लढा अयशस्वी तर ठरला नाही ना? असे वाटण्यासारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. जाती-धर्माच्या अस्पष्ट चौकटी अजूनही मिटल्या गेलेल्या नाहीत. उलट शिक्षितांच्या मनातच या जाती-धर्माच्या रेषा अधिक गडद होऊ लागल्या आहेत. केवळ शिक्षण देऊन नव्हेतर, अंधश्रद्धेच्या विळख्यातून राज्याला बाहेर काढणं हेच राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Womenमहिला