शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मृत्यूनंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 3:30 PM

जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.

मिलिंद कुलकर्णीभारतीय व्यक्तीच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्त्व आहे. जन्म-मृत्यूचा फेरा, मनुष्यजन्म अशा संकल्पना पुराण कथांमधून त्याच्यावर बालपणापासून बिंबलेल्या असतात. जीवनाची साधी सोपी व्याख्या त्याने केलेली असते. जगणे सुखकर व्हावे आणि मरण यातनामुक्त असावे. पण तसे घडतेच असे नाही. जगताना मरणयातना अनुभवण्याची वेळ अनेकांवर येते. वेगवेगळी कारणे त्यामागे असतात. त्यातूनच हे जीवन नकोसे व्हायला लागते. आत्महत्या, प्रायोपवेशन, इच्छामरण असे मार्ग चोखाळले जातात. कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपटाच्या माध्यमांतून या विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो.परंतु, मृत्यूनंतरही यातना पाठ सोडत नसतील, तर यापेक्षा वेदनादानी असे काही नाही. दुर्देवाने जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.गेल्या आठवड्यात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने मृतदेहाला अग्निडाग देण्यासाठी दोन तास ताटकळत रहावे लागले. जीवलग हरपल्याचे दु:ख उरी बाळगणाºया नागरिकांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीसुध्दा साहित्याची जमवाजमव करण्यासाठी ऐनवेळी धावाधाव करावी लागली. काय मनस्थिती असेल त्या लोकांची? या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली. महापालिका प्रशासन हादरले. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलण्याचा हास्यास्पद प्रकार झाला. सामान्य माणसाच्या साध्या अपेक्षा असतात, त्याही पूर्ण होत नसतील, तर त्याने काय करावे? स्मशानभूमीत लाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हवीत, याची जबाबदारी महापालिकेने कोणत्या तरी कर्मचाºयावर सोपविलेली असणार. हा कर्मचारी त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय किंवा नाही, याची खबरदारी घेण्यासाठी कुणीतरी वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी नियुक्त असणारच. नागरिकांच्या करातून त्यांना नियमित व वेळेवर पगार दिला जात असतो. मग आयुष्याच्या शेवटच्या प्रवासासाठीही त्या माणसाला यातना का भोगाव्या लागतात? याची उत्तरे कोण देणार? परदेश प्रवासानंतर तेथील भौतिक सुविधांचे, शिस्तीचे कौतुक करणारी आम्ही माणसे तिथले गुण काही अंगी बाणवत नाही, हेच खरे.काल घडलेला दुसरा प्रसंगदेखील तसाच वेदनादायी. ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीत जाण्यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून एक लोखंडी पूल उभारला होता. अंत्ययात्रा सुरु असताना हा पूल नाल्यात कोसळला. मृतदेहासह १२ लोक पडले. मृतदेहाची विटंबना आणि जीवलगाचा अंतिम प्रवासदेखील आपण सुखकर करु शकलो नाही, हा नातलगांच्या उरी आयुष्यभर बोचणारा सल...बथ्थड प्रशासनाला तर कधी उमगणार नाही. प्रशासकीय यंत्रणेने चौकशीचे आदेश दिले खरे, पण त्यासोबत युक्तीवादाचे डोस दिले गेलेच. लोखंडी पुलाला भक्कम आधार नव्हता, या पुलाच्या जवळ महापालिकेने पक्का पूल बांधला असतानाही लोक याच पुलाचा वापर करतात...किती ही सामान्य माणसाची चेष्टा म्हणावी. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांनी वर्गणी जमवून हा लोखंडी पूल बांधला. कारण ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी हात वर केले असल्याने लोकांवर ही वेळ आली, हे वास्तव कसे लपणार? नंतर तुम्ही पक्का पूल बांधला, मग तरी हा पूल नागरिक का वापरतात, हे समजून घेतले काय? तो तकलादू असता तर लोकांना जीव धोक्यात घालायची हौस आहे काय? या प्रश्नांकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो.प्रत्येक व्यक्तीला मरण आहे, ते कुणाला चुकलेले नाही. मग सामान्य माणूस असो की, मोठा राजकीय नेता. मृत्यू अटळ आहे. आणि मृत्यूनंतर सोबत तो काहीही घेऊन जात नसतो. हे सगळे आम्ही अध्यात्मातून, व्यवहारातून शिकत असलो तरी वर्तनातून ते प्रतिबिंबीत होत नाही. ‘टाळूवरचे लोणी खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ महापालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत नुकताच दिसून आला. पाच वर्षांपूर्वी रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला शवदाहिनी उभारुन देण्याचा प्रस्ताव दिला होता. सगळा खर्च रोटरी क्लब करणार होती, त्यानंतर देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेला करायची होती. परंतु, पाच वर्षात काहीही झाले नाही. आता महापालिकेने नव्याने ठराव करुन शवदाहिनीसाठी निधीची तरतूद करण्यात केली. रोटरी क्लबच्या पदाधिकाºयांनी महापालिका प्रशासनाला जुन्या प्रस्तावाची आठवण करुन दिली असता ते चकीत झाले. घरातल्याच गोष्टी घरातल्या व्यक्ती सोयीस्कर विसरुन जात असतील, तर हा शुध्द विसरभोळेपणा म्हणायचा का? का आणखी काही, हे तुम्हीच ठरवा.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव