शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 02:13 IST

कोणाचा देव कसा असावा, कोणाची श्रद्धा कोणावर असावी व कोणी त्याच्या देवाची कशी उपासना करावी, हे सांगण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही.

कोणाचा देव कसा असावा, कोणाची श्रद्धा कोणावर असावी व कोणी त्याच्या देवाची कशी उपासना करावी, हे सांगण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही. न्यायालयांना तर मुळीच नाही. तरीही असे निकाल देणे म्हणजे लाखो भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे!केरळमधील शबरीमला येथील अयप्पाचे मंदिर सर्व महिलांना खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालायचा निकाल का चुकीचा आहे, यावर अनेक विद्वानांनी मते मांडली, पण हा निकाल आणखीही एका वेगळ्या कारणासाठी चुकीचा आहे. या निकालाने अयप्पावर नितांत श्रद्धा असलेल्या लाखो भाविकांचा देव हिरावून घेतला आहे, हे त्याचे कारण आहे. हिंदू धर्म एका ठरावीक उच्च आध्यात्मिक पातळीवर निर्गुण-निराकार परमेश्वराची कल्पना मांडतो, पण सर्वसामान्यांचा देव मूर्त रूपातच असतो. प्रत्येक जण आपल्या देवाच्या रूपाची व गुणांची मनोमन कल्पना करतो व त्या देवाची मनोभावे उपासना करतो. म्हणूनच हिंदूंमध्ये पूर्वीच्या काळी भारताची जेवढी लोकसंख्या होती, तेवढे म्हणजे ३२ कोटी देव मानले गेले. मला लाल फूल आवडते, हे गणपतीने कधी कोणाला सांगितलेले नाही की, मला बिल्वदल प्रिय आहे, असा दृष्टांत भगवान शंकराने कधी कोणाला दिलेला नाही. आपापल्या देवांच्या आवडी-निवडी, स्वभाव, गुणवैशिष्ट्ये माणूसच ठरवत असतो. हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो व श्रद्धा तार्किक तराजूत तोलता येत नाही. म्हणूनच श्रद्धेच्या या विश्वात लुडबूड न करण्याचा सुबुद्ध शहाणपणा न्यायालये पाळत आली. आज जे सर्वोच्च न्यायालय शबरीमलाच्या निकालाचा तुरा अभिमानाने मिरवत आहे, त्याच न्यायालयाने अयोध्येची वादग्रस्त जागा हे प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची निस्सिम श्रद्धा असल्याने आम्ही त्यावर मतप्रदर्शन करणार नाही, असे ठणकावून, राष्ट्रपतींनी मागितलेले अभिमत द्यायला नकार दिला होता, हे विसरून चालणार नाही. याच न्यायालयाने समलिंगी लैंगिक संबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हा ठरविणारे दंड विधानातील कलम ३७७ रद्द करताना, काही महिन्यांपूर्वी राणा भीमदेवी थाटात असे सांगितले होते की, अशी लैंगिक प्रवृत्ती असलेल्यांची समाजात संख्या किती आहे, हा मुद्दा गैरलागू आहे. सरकारने केलेल्या कायद्याने एका व्यक्तीचे जरी मूलभूत हक्क हिरावले जात असतील, तर त्याचे रक्षण करणे हे आमचे घटनादत्त कर्तव्य आहे. मग शबरीमलाच्या बाबतीतच याचा विसर न्यायालयास सोईस्करपणे का बरं पडावा? शबरीमलाचे मंदिर ज्या जिल्ह्यात आहे, तेथे पूर्वी पंडालम राजघराण्याची सत्ता होती. आख्यायिका अशी आहे की, या राज्याचा राजा राजशेखर एकदा शिकारीला गेला असता, जंगलात त्याला पंबा नदीच्या काठी कोणीतरी टाकून दिलेले अर्भक दिसले. निपुत्रिक राजाने ते वाढविले. त्याचे नाव मणिकंदन. मोठा झाल्यावर या युवराजाने राजाला सांगितले की, मी मानवी रूप घेऊन तुझ्या घरी आलो, पण प्रत्यक्षात मी अयप्पा आहे. तू माझे मंदिर बांध. तेच शबरीमलाचे मंदिर. प्रजेचीही या देवावर श्रद्धा बसली. माहात्म्य देशभर पोहोचले व श्रद्धाळूंची संख्या वाढत गेली. खासगी मंदिर सरकारने ताब्यात घेतले, पण रूढी-परंपरा कायम राहिल्या. त्या मान्य आहेत, म्हणूनच लाखोंच्या संख्येने तेथे जातात. जे अयप्पाचे भक्त नाहीत, अशा अन्य कोणालाही त्यास आक्षेप घेण्याचा सूतराम संबंध नाही, पण अशा गोष्टी न्यायालयात नेणाºया पांढरपेशा उपटसुंभांचा एक वर्ग हल्ली सक्रिय झाला आहे. त्यांना हाकलून देण्याऐवजी आंजारून-गोंजारून न्यायालये त्यांना डोक्यावर बसवितात, ही गंभीर चिंतेची बाब आहे. याहूनही चित्र-विचित्र धार्मिक समजुती, प्रथा व परंपरा भारतातच नव्हे, तर जगातही प्र्रचलित आहेत. इस्लाम व ख्रिश्चन या दोन धर्मांवरून मध्ययुगात युरोपात धर्मयुद्ध झाली. भारतातही त्याच सुमारास शैव-वैष्णव वाद विकोपाला गेले. न्यायालये हे वाद उकरून काढणाºयांना वरदहस्त देऊन देशाला पुन्हा मध्ययुगीन अराजकतेकडे नेत आहेत. समानता, स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्त्वांचा खरा अर्थ आहे की, कोणाचा देव कसा असावा, कोणाची श्रद्धा कोणावर असावी व कोणी त्याच्या देवाची कशी उपासना करावी, हे सांगण्याचा दुसºया कोणालाही अधिकार नाही. न्यायालयांना तर मुळीच नाही. तरीही असे निकाल देणे म्हणजे लाखो भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे!

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिर