शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक बोलत नाहीत, अधिकारी घाबरत नाहीत! जेव्हा सत्तेला आरसा दाखवणारा चेहराच हरवतो...

By यदू जोशी | Updated: March 13, 2026 08:42 IST

सरकारवर बाहेर तुटून पडणारे नेते विधानसभेत आक्रमक होऊन सरकारला घाम का फोडत नसावेत? विधिमंडळातली ही ‘शांतता’ धोक्याची घंटा आहे.

यदु जोशीराजकीय संपादक,लोकमत

विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नाही. विरोधकांचा आवाज सरकारला घाबरवत नाही. त्यामुळे यावेळचे विधिमंडळ अधिवेशन  आजवरचे सर्वांत कंटाळवाणे वाटते आहे. विधान भवनातील गर्दीवर नियंत्रण आणले गेले आहे; त्यामुळे हवशागवशांची गर्दी नसते. सभागृहातही शांतता आणि बाहेरही शांतता अशी स्थिती आहे. सरकारला विरोधकांची भीती उरलेली नाही. सगळे कसे ‘मॅनेज्ड्’ वाटते. नरहरी झिरवाळांच्या मंत्री कार्यालयात लाच घेतली गेली; पण, त्यावर विरोधक एक शब्द बोलले नाहीत. झिरवाळही जणू काही घडलेच नव्हते अशा अविर्भावात निश्चिंतपणे वावरत आहेत. या सरकारमधल्या किमान चार-पाच मंत्र्यांची प्रकरणे लोकांनी विरोधकांकडे पोहोचविली; पण, ती सभागृहात मांडली जात नाहीत. अधिवेशनाच्या उर्वरित काळात तरी त्याबाबतचा पर्दाफाश केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

या अधिवेशनात विरोधकांनी एकदाही गदारोळ केला नाही, एकदाही  वेलमध्ये उतरले नाहीत, एकदाही सभात्याग केला नाही, एकदाही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वेळ सभापती/अध्यक्षांवर आणली नाही. विरोधी पक्षनेत्याची निवड करत नाही तोवर अधिवेशन होऊच देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही ते घेत नाहीत. नाही म्हणता चॅनेल्सवर झळकण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ते घोषणाबाजी करतात; पण, तिथे जी मागणी केली जाते ती सभागृहात करीत नाहीत.

नेत्यांकडून निराशाच

काँग्रेसचे नाना पटोले कुर्ता-पायजमा बदलून पँट-शर्ट घालायला लागले; पण, बदल फक्त कपड्यांमध्ये दिसतो आहे. आपल्या पक्षाची अवस्था, विलीनीकरणाची संपलेली शक्यता यामुळे की काय जयंत पाटील यांच्यामध्ये पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. मुंबई महापालिकेतील पराभवाची सल बाजूला ठेवून आदित्य ठाकरे नव्या उमेदीने सरकारचा सामना करतील अशी अपेक्षा होती; पण, ती फोल ठरली आहे. ते सभागृहात फारसे बोलतानाही दिसत नाहीत. विजय वडेट्टीवार यांच्याकडून विरोधकांची मोट बांधून सरकारवर हल्लाबोल करण्याची अपेक्षा आहे; पण, ते फक्त स्वत: बोलतात, त्यातही पूर्वीसारखा आक्रमकपणा दिसत नाही. 

जितेंद्र आव्हाड कुठे हरवले माहिती नाही. रोहित पवार हे ‘अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर घातपात होता,’ हे सांगण्यात व्यग्र आहेत. विरोधी पक्ष असा दुबळा असल्याची उणीव बरेचदा सुधीर मुनगंटीवार हे सत्तापक्षाचे ज्येष्ठ सदस्य भरून काढतात. सुधीरभाऊ आहेत म्हणून विरोध तरी दिसतो. विधानसभेपेक्षा विधान परिषदेतील विरोधकांची कामगिरी सरस वाटावी असे चित्र आहे. विधानसभेत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, हेमंत ओगले, संदीप क्षीरसागर यांची यंग ब्रिगेडही प्रभाव दाखवत नाही. सरकारमधील बऱ्याच प्रकरणांची माहिती असलेले मोहोळचे आमदार राजू खरे या प्रकरणांचा उपयोग सभागृहात उचलण्यासाठी करत नाहीत.

अधिवेशन म्हटले की पूर्वी विरोधक सरकारची ‘प्रकरणे’ शोधून भांडाफोड करायचे, सरकारला घाम फोडायचे; पण, या अधिवेशनात सरकार बिनधास्त वाटत आहे. लोकशाहीत सरकारला विरोधकांची भीती नसणे ही धोक्याची घंटा असते. कारण सत्तेला मर्यादा घालणारा हातच जर शिथिल झाला, तर सत्ता आपोआपच अमर्याद होत जाते. विरोधक सभागृहात उपस्थित असतात; पण, त्यांची उपस्थिती जाणवत नाही. लोकशाहीत शांतता ही कधीकधी प्रगतीची नाही, तर तडजोडीची खूण असते. सत्तेला आरसा दाखवणारा चेहरा नाहीसा झाला की सत्तेला स्वतःचेच प्रतिबिंब खरे वाटू लागते. सध्या सरकारला विरोधकांनी असेच अभय दिले आहे. विधान भवनात शांतता आहे, गदारोळ नाही, घोषणाबाजी नाही. वरवर पाहता हे आदर्श वाटू शकते; पण, अतिशांतता लोकशाहीला अस्वस्थ करते. लोकशाहीत विरोधक हे फक्त खुर्च्या भरण्यासाठी नसतात; ते सत्तेच्या मर्यादा ठरविण्यासाठी असतात. त्या मर्यादा जर नाहीशा झाल्या, तर मग अधिवेशन उरते; पण, लोकशाहीचा आत्मा कुठेतरी हरवतो, सध्या तसेच चालले आहे.

नोकरशाहीला भीती नाही 

सरकारबाबत नोकरशाहीमध्ये पूर्वी एक दरारा असायचा. विधान भवनात एखादा प्रश्न येणार, लक्षवेधी येणार म्हटले की बड्याबड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणायचे. बदल्यांसाठी रेटकार्ड आले, त्यातून कोट्यवधी रुपयांचे अर्थपूर्ण व्यवहार होऊ लागले. ‘आपल्या’ माणसांना टेंडर मिळावे म्हणून वरून फोन येऊ लागले. सरकारी कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप कमालीचा वाढला अन् त्यातूनच मग लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री यांचा धाक कमीकमी होत गेला हे वास्तव आहे. त्यामुळे एखादा प्रश्न विधिमंडळात येणारही असेल तर आपण तो मॅनेज करून घेऊ, अशी बेदरकार वृत्ती अधिकाऱ्यांमध्ये आली. आपल्या विरोधातील प्रश्न सभागृहात येणारच नाही, अशी व्यवस्था करणारे अधिकारीदेखील आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांना ब्रीफिंग देण्यासाठी गेले नाही म्हणून आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह आणि सहसंचालक सतीश पडवळ यांना निलंबित केले खरे; पण, दहा दिवसांतच निलंबन मागे घेताना पूर्वीच्याच पदावर त्यांना बसविले. निलंबन अधिक काळ ठेवून नंतर साइडपोस्टिंग द्यायला हवी होती; पण, तसे काही झाले नाही. मग, धाक वाटेल कसा?

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition silent, officers fearless: The vanishing mirror to power.

Web Summary : Maharashtra's legislative session feels dull due to a weak opposition. Corruption cases remain unaddressed. Bureaucracy lacks fear, undermining accountability. Democracy suffers as checks on power weaken, leaving the government unchecked and complacent.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र