शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

इश्क करण्याच्या गुन्ह्याची एवढी जबर सजा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:32 AM

लाहोर विद्यापीठातल्या हदिका जावेदने हातात लालचुटूक गुलाब घेतला, गु‌‌डघ्यावर बसून तिला आवडणाऱ्या शहरयार अहमदला थेट प्रपोज केलं. पुढे?

मेघना ढोके, मुख्य उपसंपादक, लोकमत - 

ये इश्क नहीं आसां, बस इतना समझ लिजिए, इक आग का दरिया है और डूब के जाना है! - जिगर मुरादाबादी यांचा हा शेर म्हटलं तर जुनाच, पण शेजारी पाकिस्तानातली ताजी घटना सांगते, की हे इश्क फक्त आग का दरियाच नाही तर ‘गुनाह’ आहे. प्रेम करण्याची शिक्षा म्हणून विद्यापीठ  हाकलून देतं, आईबाप मुलीला घरात डांबून ठेवतात, मुलीचे भाऊ मुलाला ‘कतल’ करण्याच्या धमक्या देतात आणि त्याचा आणि आपलाही जीव वाचावा म्हणून मुलाचे आईवडील त्याला घेऊन अज्ञात जागी रवाना हाेतात. इथवरचा हा घटनाक्रम! फार अपरिचित नाही, पण तो आहे शेजारी पाकिस्तानातल्या लाहोरचा!  लाहोर हे शहर तसं रसिक.  जिस लाहोर नहीं वेख्या वो जम्याही नहीं, अर्थात ज्यानं लाहोर नाही पाहिलं तो जन्मालाच आला नाही, त्यानं दुनियाच पाहिली नाही अशी या सुंदर, जिंदादिल शहराची महती. याच शहरात लाल शाहबाज कलंदरच्या सेहवान शरीफ दरबारमधली कव्वालीची दंगल हा जगण्याचा विलक्षण अनुभव. त्यावरही अलीकडेच दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली बाँब टाकले. तीच ती दहशत जी म्हणते प्रेम नको, दुश्मनी पोसा. तर त्याचंच हे लाहोर शहरातलं ताजं उदाहरण. लाहोर विद्यापीठात शिकणारी  हदिका जावेद. तिनं हातात लालचुटूक गुलाबाचा  छानसा गुच्छ घेतला आणि गु‌‌डघ्यावर बसून  तिला आवडणाऱ्या शहरयार अहमदला थेट  प्रपोज केलं. अतिशय रोमँटिक असं दृश्य. शहरयारही लाजला, ती ही. मग त्यानं तिला एक छानशी प्रेमळ मिठी मारली. अवतीभोवती उभ्या त्यांच्या दोस्तांनी टाळ्या वाजवल्या, तो रोमँटिक क्षण डोळ्यातच नाही तर आपल्या मोबाइलमध्येही कैद केला. तिथंच गडबड झाली, तो व्हिडिओ पाकिस्तानात तुफान व्हायरल झाला, भारतातही झाला. अनेकांनी त्या दोघांच्या प्रेमाचं स्वागत केलं, असे गुलाबी क्षण आताच्या कोरड्या जगण्यात हरवत चालले आहेत, हे मोहब्बतके दिवाने वाढले पाहिजेत म्हणून समाजमाध्यमात पोस्ट्सही लिहिल्या. पण प्रेमाची कदर करणाऱ्यांची संख्या कमी, त्याला विरोध करणारेच जास्त. बऱ्याच जणांना या मुलांचं  ‘प्रेमप्रदर्शन’ हा संस्कृती भंग वाटला. सार्वजनिक ठिकाणी असं वागणं भयंकर पाप वाटलं. खानदान की इज्जत पासून ते विद्यापीठाच्या आणि देशाच्या इज्जतीच्या लक्तरांपर्यंत चर्चा उसळल्या.  शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी होऊ लागली. दोन्हीकडचे पालक आणि नातेवाईकही सटपटले. बाकीच्या मुलांचे पालक म्हणाले की, या असल्या मुलांना पाहून आमची मुलं ‘खराब’ होतील, यांना शिक्षा करा. मग टाकोटाक लाहोर विद्यापीठानं एक शिस्तभंग कारवाई समिती स्थापन केली. या मुलांना समितीसमोर हजर रहायला सांगितलं. मात्र त्या दोघांना त्यांच्या कुटुंबानं कुठं डांबलं हे कुणाला माहीत नसल्याने ते आलेच नाहीत साक्षीला. तर या शिस्तभंग कारवाई समितीने त्यांना विद्यापीठातूनच काढून टाकलं ! म्हणाले शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही. तसं पत्रकही त्यांनी काढलं, रीतसर. त्यावर पाकिस्तानातले तरुण  चिडले. पण राजकारणी चूप. कुणी काही बोललं नाही. अपवाद दोघींचा. एक बख्तावर भुत्तो झरदारी, त्यांनी ‘रिडिक्युलस’ म्हणत या कारवाईवर जाहीर टीका केली आणि दुसऱ्या शनायरा अक्रम. क्रिकेटपटू वसिम अक्रमची पत्नी. त्या म्हणतात, ‘तुम्ही वाट्टेल ते करा, वाट्टेल ते नियम लावा, तुम्ही प्रेम हद्दपार नाही करू शकत. तरुण असणं, आयुष्य सुंदर आहे असं वाटणं याचा भाग आहे प्रेम करणं. मात्र शिक्षण संस्थाही तुम्हाला हे नाही शिकवू शकत!’ असे निषेधाचे काही मोजके सूर, काही समाज माध्यमातले तरुण आवाज सोडले, तर पाकिस्तानात अनेकांना वाटतंय की, विद्यापीठाच्या आवारात प्रेमाची जाहीर कबुली ही त्यांची चूकच झाली. मात्र यासीर अलीसारखे  तिथले तरुण जाहीर सांगतात की, पाकिस्तान हा इंटरनेटवर पोर्न सर्च करणाऱ्या देशात आघाडीवर आहे. प्रेमाचं मात्र इथं वावडं असावं, हे विचित्रच! -पण ते प्रेमाचं वावडं फक्त पाकिस्तानातच आहे का? हे सारं आपल्याकडच्या विद्यापीठात झालं? असतं तर हेच नसतं का झालं प्रेमाचं वावडं आपल्याही समाजाला आहेच.  प्रेमीयुगुलांच्या मागे शिस्तप्रिय पोलिसांची भरारी पथकं आपल्याकडेही आहेतच की !तसं नसतं तर  सैराट ऑनर किलिंग कशाला घडलं असतं आपल्याही देशात ?  जाहीर द्वेष करणं, विखार ओतणं समाजमान्य; प्रेम करणं मात्र गुन्हाच.meghana.dhoke@lokmat.com

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी