शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

अध्यात्म - नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:13 AM

‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही़ काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले.

- डॉ. गोविंद काळे‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही. काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले़ मूर्खांचेही नंदनवन असते तर? शेजारच्या पाटील काकांनी जुना वाडा नेस्तनाबूत करून भला मोठा बंगला, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा बांधला़ चार मुलांसाठी चार स्वतंत्र खोल्या़ ऐश्वर्याचे प्रदर्शन तर बंगल्यात जागोजागी़ बंगल्याचे नाव होते नंदनवन. पाटीलसाहेब फार भाग्यवान माणूस असे सारेच गाववाले म्हणत़ पुढे मुलांची लग्ने झाली, सुना आल्या़ कधी न बोलणारे शांत नंदनवन बडबडू लागले़ रोज सुनांचे भांडणतंटे़ गावभर बभ्रा झाला. पाटील साहेबांनी तर धसकाच घेतला. त्यातच त्यांचे देहावसान झाले. नंदनवनाचे सारे गणित चुकले. आयुष्यातील गणिते चुकण्यासाठीच असतात तर?आद्य शंकराचार्यांनी नंदनवनचे गणित कायमचेच सोडवून टाकल्याचा प्रत्यय आला.‘संपूर्णं जगदेव नन्दनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमागांगं वारि समस्तवारिनिवह: पुण्या: समस्ता: क्रिया:।वाच: प्राकृत संस्कृता: श्रुतिशिरो वाराणसी मेदिनीसर्वावस्थितरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणि॥ज्याला परब्रह्मरूपाचा साक्षात्कार झाला त्याला सर्व जगच नंदनवनासारखे दिसते़ सर्वच वृक्ष कल्पवृक्षासारखे होतात. जगातील सारे जलाशय त्याला गंगोदक बनतात व त्याची सर्व कर्मे ही पुण्यकारकच होतात़ त्याचे बोलणे संस्कृत असो अथवा प्राकृत, ते उपनिषदांसारखे बोधप्रद असते़ संपूर्ण पृथ्वी ही त्याची वाराणसी म्हणजे मुक्तिक्षेत्र असते व तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याची ती अवस्था समाधिस्थिती अथवा ब्रह्मस्वरूपी एकरूप होऊन राहणेच होय.आचार्यांची ही प्रचिती सामान्य जीवाला कशी आणि कधी येणार? कोणते मठ आणि पीठ हा अद्वैताचा साक्षात्कार घडविणार? तरुणाईला हा नंदनवनाचा अर्थ आकलनात आला तर विश्वकल्याण दूर नाही. क्षणाक्षणाला कालबाह्य होणाऱ्या असंख्य गोष्टींचे निरुपायाने का होईना आपण मूक साक्षीदार असतो. संस्कारी बालवयात हा श्लोक भेटला तर जगाकडे बघण्याची दृष्टी आमूलाग्र बदलून जाईल. आचार्य भटाब्राह्मणांचे, छत्रपती मराठ्यांचे, फुले माळ्यांचे आणि आंबेडकर दलितांचे हे सवतेसुभे जन्मालाच आले नसते. प्रश्न आहे तो पण परंतुचा. विश्वाचे नंदनवन ह्या कल्पनेलाच मनोभावे नमस्कार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHomeघरFamilyपरिवार