शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..?

By अतुल कुलकर्णी | Updated: November 1, 2023 08:39 IST

‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही’, असे विधान विधानसभाध्यक्षांनी नुकतेच केले आहे. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात.

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेला एक गट आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला एक गट, अशा दोन्ही गटांबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष या नात्याने नार्वेकर यांची आहे. त्याची सुनावणी विधानसभेत सुरू असताना त्यांनी एक विधान केले. त्यामुळे अनेक घटनात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही,’ असे विधान अध्यक्षांनी केले आहे. या विधानामुळे विधानसभेचे उपाध्यक्षच नाही तर सर्व तालिका अध्यक्ष, तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती आणि विधानपरिषदेतील तालिका अध्यक्षांनी घेतलेले निर्णय देखील वैध की अवैध, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मुळात तालिका अध्यक्षांची निवड विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष करतात. त्याचप्रमाणे विधानसभेच्या उपाध्यक्षाची निवड संपूर्ण सभागृह करते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांनी किंवा दोघांच्याही अनुपस्थितीत तालिका अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज पाहणे अपेक्षित असते. ज्यावेळी तालिका अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सभागृहात अध्यक्षांच्या आसनावर बसून निर्देश देतात, किंवा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा त्यांना अध्यक्षांचे सर्व अधिकार कायद्याने प्राप्त होतात. राज्यघटनेच्या कलम १८० आणि १८४ मध्ये विधानसभा, विधानपरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची सुस्पष्ट शब्दांत व्याख्या केलेली आहे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत जर उपाध्यक्ष सभागृहात अध्यक्षांच्या आसनावर असतील, तर त्यांना अध्यक्षांचे संपूर्ण अधिकार लागू आहेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत जर तालिका अध्यक्षांनी सभागृहात डायसवरून काही निर्देश दिले असतील तर तेदेखील अध्यक्षांचेच आदेश मानले जातात.

जर तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश त्यानंतर आलेल्या उपाध्यक्षांनी बदलले, किंवा उपाध्यक्षांनी दिलेले आदेश अध्यक्षांनी डायसवर येऊन बदलले तर ते बदल गृहीत धरले जातात. मात्र, त्यात कसलेही बदल केलेले नसतील तर उपाध्यक्षांनादेखील अध्यक्षांइतकेच अधिकार असतात. इतकी सुस्पष्ट राज्यघटना असताना, उपाध्यक्षांचे निर्णय आपल्याला बंधनकारक नाहीत, असे विधान विद्यमान अध्यक्षांनी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता घटनातज्ज्ञांनाही पडला असेल.

अध्यक्षांना उपाध्यक्षांचे निर्णय बंधनकारक नसतील अशी जर अध्यक्षांची भूमिका असेल तर उपाध्यक्ष किंवा तालिका अध्यक्षांनी सभागृहात जे काही कामकाज केले असेल ते सगळे बेकायदेशीर ठरवायचे का? उपाध्यक्षांनी किंवा तालिका अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील तर ते निर्देश यंत्रणांनी पाळायचे की नाही याविषयीदेखील अध्यक्षांनी स्पष्टता दिली पाहिजे. शिवाय उपाध्यक्षांचे निर्णय आपल्याला बंधनकारक का नाहीत हे देखील कारणांसह अध्यक्षांनी स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा त्यांचे हे विधान वादग्रस्त होऊ शकते. तसेच ते एकतर्फी व उपाध्यक्षांवर अविश्वास दाखवणारे ठरू शकते. अध्यक्ष जर म्हणत असतील की मला उपाध्यक्षांचे निर्णय बंधनकारक नाहीत, तर उपाध्यक्षांनी दिलेले निर्णय प्रशासकीय यंत्रणा तरी का मान्य करेल? उद्या जर प्रशासकीय यंत्रणेने ‘आम्हाला अध्यक्षांनीच सांगावेत, उपाध्यक्षांचे निर्णय आम्ही मान्य करणार नाही, कारण ते निर्णय अध्यक्षांनी बदलले तर आम्ही काय करायचे?’, असे प्रश्न उपस्थित केले तर त्यातून कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतील. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीने अशी विधाने करणे कितपत योग्य आहे..?अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चेला जाणे किंवा सेंट जॉर्जसारख्या हॉस्पिटलमध्ये भेट देऊन अधिकाऱ्यांना खडसावणे या गोष्टी जशा वादग्रस्त ठरल्या तसेच हे विधानदेखील वादग्रस्त ठरू शकते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMLAआमदारvidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकर