शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

विशेष लेख - ‘ईडी’ने महाराष्ट्रात विश्रांती घेतली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:46 IST

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. पडद्यामागे नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत? ed

हरिश गुप्ता

ईडीसह सगळ्याच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात अचानक विश्रांती घ्यायचे ठरविलेले दिसते. कदाचित राज्यातले सरकार बदलल्यानंतर हे घडले असावे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो काही महिन्यांपूर्वी राज्यात जितके सक्रिय होते तेवढे आज नाहीत. काही नेत्यांना या यंत्रणा चौकशीसाठी बोलावतात; परंतु आता पूर्वी लावला जायचा तसा रेटा लावला जात नाही. स्वत:हून पुढाकार घेतला जात नाही. इतकेच नव्हे तर इतर राज्यात आयकर खात्याच्या धाडी सुरू असताना महाराष्ट्रात मामला थंड  आहे. असे म्हणतात की  पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत. 

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पक्ष काहीसा साशंक असल्याचे भाजपातील अंतस्थ सूत्रे सांगतात. शिंदे आणि ठाकरे गटाने व्यापक हिंदुत्व हितासाठी एकत्र यावे, येऊन हात मिळवावे, अशी गरज भाजपमधील काही  नेत्यांना वाटते आहे. २०२४ साली  भाजपशी संघटित लढा देण्याच्या पवित्र्यात विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे बाकी काही नाही तरी एक सेल्फ गोल झाला, असे मानले जाते. माजी काँग्रेस अध्यक्षांनी महाविकास आघाडी विस्कळीत होण्यासाठी एक प्रकारे दारूगोळाच पुरवला. दुसरे म्हणजे २०१९ साली शरद पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही, ही त्यांची हिमालयाएवढी मोठी चूक झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना वाटते आहे. कदाचित २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पवार पाहत असतील. हिमाचल आणि गुजरातमध्ये  भाजप सत्तेवर आला आणि ‘आप’सारखा पक्ष एक नवी शक्ती म्हणून उदयाला आला तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गदारोळ होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते. तूर्तास तपास यंत्रणांची सूत्रे हलवणाऱ्यांनी आता महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे.  ममता-मोदी यांचे सख्य

५० कोटी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाव न गोवले गेल्याने ममता बॅनर्जी यांना थोडा दिलासा मिळाला आहे, असे मी या स्तंभामध्ये लिहिले होते. काही आठवड्यांतच मोदी सरकारने पश्चिम बंगालमध्ये नवे राज्यपाल नेमले. तेही स्वस्थ आहेत. नेमणुकीनंतरच्या काही दिवसांतच ममता बॅनर्जी यांनी असे जाहीर केले की, ५ डिसेंबरला आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहोत. ममता यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना चहापानाला बोलावले आणि जणू तणाव वितळून गेला. ममता जर आपल्याशी जुळते घेत असतील तर त्यांच्याशी दीर्घकाळ शत्रुत्व पत्करून फार काही राजकीय लाभ पदरात पडणार नाही, असे भाजपलाही वाटू लागले आहे. कदाचित काही महत्त्वाचे कायदे संसदेत संमत करून घेण्यासाठी मोदी यांना ममता यांचे सहकार्य हवे असेल. सीबीआयची जयस्वाल यांना मुदतवाढ

सत्तारुढ पक्षाच्या इच्छेनुसार सीबीआय मान डोलवत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र केडरमधून आलेले सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल वेगळ्याच मुशीतून घडलेले आहेत. ते अत्यंत कठोर आणि  नियमांशी बांधील राहतात. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय मिश्रा यांच्यावर सरकार खूश आहे. त्यांना पाच वर्षांचा विक्रमी कार्यकाल देण्यात आला. जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची गोष्ट काही वेगळी नाही. जयस्वाल यांचा कार्यकाल मे २०२३ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या वर्षात नवा माणूस आणण्यापेक्षा जयस्वाल यांनाच मुदतवाढ देण्याचे सरकारच्या मनात असल्याची  बातमी आहे. ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाल पाच वर्षांपर्यंत वाढवण्यासंबंधी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून घेतलेलीच आहे.

हे काय शिजते आहे ? भाजपशी समझौता केल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांवर करत असतानाच गुजरातमधील उमेदवार व्यक्तिगत पातळीवर काही मतदारसंघात समझोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आदिवासी पट्टा, सौराष्ट्र आणि शहरी भागात आपल्याला पाठिंबा असल्याचे आपच्या लक्षात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही. या भागात काँग्रेसला पारंपरिक आधार असल्याने आपच्या काही उमेदवारांनी ग्रामीण भागात काँग्रेसला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. बंडखोरांनी नमते घेण्यास जेथे नकार दिला, अशा डझनभर जागांवर भाजपाला चिंता वाटते आहे.

(लेखक लोकमत दिल्ली आवृत्तीचे नॅशनल एडिटर आहेत) 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र