शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबण्याचा उपयोग शून्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:13 IST

ऊठसूट भारतविरोधी आग ओकणे न थांबविल्यास, अर्थव्यवस्था न सुधारल्यास आणि दहशतवादाला दूर ठेवून जगाशी समरस न झाल्यास पाक तगू शकणार नाही! 

ठळक मुद्देऊठसूट भारतविरोधी आग ओकणे न थांबविल्यास, अर्थव्यवस्था न सुधारल्यास आणि दहशतवादाला दूर ठेवून जगाशी समरस न झाल्यास पाक तगू शकणार नाही! 

अनंत गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

भारतपाकिस्तान हे दोन्ही देश स्वातंत्र्याची  ७५ वर्षे पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. गेल्या ७५ वर्षात भारतात संसदीय लोकशाही कायम राहिली, तर पाकिस्तानात लोकशाही व हुकूमशाही यांचा आलटून - पालटून लपंडाव चालू आहे.  दोन्ही देशांतील विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत आक्रोश एकच आहे, फरक फक्त पद्धतीचा. भारतात विरोधकांवर ईडी - सीबीआयची धाड, तर पाकिस्तानात विरोधकांवर लष्करी गिधाड. राजकीय विरोधकांपासून ते विरोधी मताच्या पत्रकारांपर्यंत सर्वांचेच या गिधाडांनी पार लचके तोडल्याची असंख्य उदाहरणे पाकिस्तानात आहेत.

पाक लष्कर व आय. एस. आय.ला अंतर्गत आव्हान देणाऱ्याची पार विल्हेवाट लावली जाते.  पाकमधील दोन नामांकित पत्रकार, आमिर मीर व इमरान शफकत यांनी खासगी चर्चेत पाकिस्तानची न्यायव्यवस्था, लष्कर व आय. एस. आय. यांच्या विरुद्ध केलेले वक्तव्य  सोशल मीडियावर टाकले. एवढेच निमित्त  सत्ताधाऱ्यांना पुरे होते. दोघांनाही त्वरित अटक करण्यात आली. याहून अमानूष वागणुकीचे दुसरे भयानक उदाहरण - सईद सलीम शहजाद - नामांकित पाकिस्तानी पत्रकार. विरोधी आवाज उठविणाऱ्याचे पाकिस्तानात कसे हाल केले जातात, यावर त्यांनी एक लेखमालाच लिहिली. याच विषयावर एका वृत्त वाहिनीवर  चर्चा करण्यासाठी ते निघाले खरे पण कार्यक्रम संपला तरीही ते टीव्ही स्टुडिओत पोहोचले नाहीत. दोन दिवसांनी झेलम कालव्यामधे त्यांचा मृतदेह तरंगताना सापडला.

न्यूयॉर्क मासिकाचे शोधपत्रकार डेक्सटर फिल्किन यांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. ७-८ वर्षांपूर्वी कराचीजवळच्या पाकिस्तानी हवाई दलाच्या एका तळावर हल्लेखोरांनी पाकची दोन विमाने उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अशफाक कयानी व आय. एस. आय. प्रमुख अहमद पाशा यांच्यावर टीकेची झोड़ उठली होती. हल्ल्याची इत्यंभूत  माहिती शहजाद यांनी मिळविल्याचा आयएसआयला संशय होता. त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, छळ करण्यात आला. पण, अखेरपर्यंत त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या  केली गेली.

पाकिस्तानातल्या गरीब शेतकऱ्यांचीही या दडपशाहीतून सुटका नाही. ओकारा येथे एक लष्कराच्या भूखंडावर गेली अनेक वर्षे शेतकरी वास्तव्य करीत होते. स्थलांतराला नकार देताच, लष्कराने गावाला वेढा घातला, शेतकऱ्यांना अटक करीत इतके हाल केले, की त्यात काही मृत्युमुखी पडले. पाकमधील एकाही वर्तमानपत्रास याचा सुगावाही लागू दिला गेला नाही. मात्र, अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने  हे प्रकरण अखेरीस चव्हाट्यावर आणले.

एकीकडे अंतर्गत दडपशाही चालू असताना, दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी  दहशतवाद्यांचे पीक पोसणारे शेत म्हणजेच पाकिस्तान. पाकच्या भूमीवरच प्रशिक्षण घेतल्याचा संशय असलेल्या आणि अल-कायदाशी संलग्न असलेल्या उज्बेकिस्तान  देशातील आयएमयु या संघटनेने आपल्या मासिकाचे नाव ‘गझबा - ए - हिन्द’ ठेवले आहे. उद्देश हा, की प्रत्येकाच्या मनात ‘हिंदुस्तानशी संघर्ष’ ही भावना घुमत राहिली पाहिजे.  या संघटनेच्या विचारसरणीतील एक विचित्र धोकादायक बाब म्हणजे, दहशतीच्या जोरावर ‘हिन्द प्रांत’ काबिज केला पाहिजे. हिन्द प्रांत म्हणजे काय ?- तर भारत, श्रीलंका, म्यानमार अणि बांगला देश.

इंडस करारानुसार तीन प्रमुख नद्यांबाबत भारतावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आहे. तरीही भारतातून येणारे नदीचे पाणी जाणीवपूर्वक गढूळ करीत, पाकमधील सुपीक जमिनीचा भारत वाळवंट करत आहे, अशी भाषणे करत, लष्करे - तैयबाचा प्रमुख हाफिज सय्यद आणि २०१७ साली ज्या सय्येद सलाबुद्दीनला “जागतिक दहशतवादी” म्हणून घोषित करण्यात आले होते तो, हे दोघेही सीमेवरील गावांतील तरुणांची माथी भडकवण्याचे काम आज करीत आहेत. दुसरीकडे, अल-जवाहिरीच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या अल - कायदामधून काही अरब दहशतवादी अबू-बकर - अल - बगदादीच्या अधिपत्याखालील आयसीसकड़े आता वळू लागले आहेत. यामुळे पाक मुक्कामी अतिरेक्यांमध्ये अंतर्गत संशयाचे वातावरण इतके वाढत चालले आहे की, न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकार सब्रीना तावरनीस यांनी लिहिल्याप्रमाणे या सर्वांना आयएसआयचे जरी पाठबळ असले तरीही पाकचे लष्करी गुप्तचर खाते, आयबी व आयएसआय आपल्यावरही गुप्त पाळत ठेवत आहेत, अशी भावना या दहशतवादी संघटनांमध्येच वाढत चालली आहे. थोडक्यात, राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक पाकिस्तानी राज्यकर्त्याने नाकाला मिरच्या झोंबत  असल्याप्रमाणे उठसूट भारतविरोधी आग ओकत राहण्याचे न थांबविल्यास, आपली अर्थव्यवस्था न सुधारल्यास आणि दहशतवाद्यांना दूर ठेवत जगाशी समरस न झाल्यास,  स्वतःच निर्माण केलेल्या दहशतवादाच्या भोवऱ्यात पाकिस्तान बुडाल्याशिवाय राहणार नाही.anantvsgadgil@gmail.com

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणीBangladeshबांगलादेशTerrorismदहशतवादEconomyअर्थव्यवस्था