शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'विकासाच्या मार्गातील काटे वेळीच काढायला हवेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 07:36 IST

Nitin Gadkari alleges in letter to CM Uddhav Thackeray on Shiv Sena leaders obstructing highway projects: या लेटर बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता किती आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र यानिमित्ताने बहुतेक सर्वच पक्षांतील तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांकडून होणारा विकासकामांना नख लावण्याचा प्रकार सुज्ञ नागरिकांना विचार करावयास लावणारा आहे.

गेल्या काही महिन्यात दुसऱ्या लेटर बॉम्बचा नुकताच स्फोट झाला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते हे कंत्राटदारांच्या यंत्रसामग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत असल्याचे कळवताना, हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशाराही दिला आहे.

या लेटर बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता किती आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र यानिमित्ताने बहुतेक सर्वच पक्षांतील तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांकडून होणारा विकासकामांना नख लावण्याचा प्रकार सुज्ञ नागरिकांना विचार करावयास लावणारा आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी कामांच्या कंत्राटदारांना तथाकथित राजकीय कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळते. त्यामागील कारणे आणि उद्देश वेगवेगळे असतात आणि ते चर्चेचे विषय ठरतात.

कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करीत हे कार्यकर्ते आंदोलनाच्या नावाखाली कुणा कंत्राटदाराच्या तोंडाला काळे फास, डांबून ठेव, मारहाण कर, चिखलात बसव, अंगावर शाई फेक, असे प्रकार करीत असल्याचे पाहावयास मिळते. वास्तविक कंत्राटदार ही विकासकामांच्या साखळीतील एक महत्त्वाची कडी. पण कोट्यवधी रुपयांची कंत्राटे घेऊन अतिशय सुमार दर्जाची कामे करणारे कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची हातमिळवणी हा प्रकार काही नवा नाही.

अशा तऱ्हेने होणारी जनतेच्या पैशांची लूट अतिशय संतापजनकच आहे. ही लूट थांबवून ठरलेल्या दर्जाची कामे करून घेणे ही कंत्राटे देणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आहे आणि सनदशीर मार्गाने त्यासंबंधी प्रभावी कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र कंत्राटे देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील प्राधिकरणे ही जबाबदारी पाळत नाहीत तेव्हा त्याविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेची सहानुभूती मिळते. याचाच गैरफायदा घेत गेल्या काही वर्षांत कंत्राटदारांना सळो की पळो करून आपले ईप्सित साधणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांची फळीच मैदानात उतरली आहे.

काही कार्यकर्ते आंदोलनांसारख्या मार्गाने गैरप्रकारांकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतातही. मात्र आपले उपद्रवमूल्य दाखवत कंत्राटदाराची कामे बंद पाडून त्याला  ‘समझोता’  करायला भाग पाडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत आहे. त्यासाठी आधी ते कंत्राटदाराला खलनायक ठरवण्याची कामगिरी पार पाडत नंतर आपली पोळी भाजून घेतात. गुंडांच्या टोळीत जाऊन खंडणी मागण्यापेक्षा राजकीय झूल पांघरत संरक्षण आणि सोबत प्रतिष्ठाही मिळवणे सोयीचे झाले आहे. अगदी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला शहरात, चौकाचौकात झळकणाऱ्या फलकांपासूनचा सारा खर्च कंत्राटदारांच्या खिशातून केला जातो, हे उघड गुपित आहे.

अशा तथाकथित कार्यकर्त्यांच्या उपदव्यापाचे दुष्परिणाम अंतिमत: समाजालाच भोगावयास लागत आहेत. आधीच सरकारी अधिकाऱ्यांच्या कमिशन राजमुळे मेटाकुटीला आलेले हे ठेकेदार कार्यकर्त्यांच्या टक्केवारीने बेजार होत नामधारी कामे उरकतात. काही ठिकाणी आधी विकासकामांना विरोध करणारे कार्यकर्ते काही दिवसांनी स्वत:च कंत्राटदार झाल्याचेही पाहावयास मिळते, तर काही नातेवाइकांच्या नावाने कंत्राट घेऊन मोकळे होतात. हे कागदोपत्री कंत्राटदार केवळ कमिशन घेऊन प्रत्यक्षात कामे इतरांकडे सोपवतात. जनतेच्या सोयीसुविधांसाठी काढलेल्या कामाच्या विकासकामांच्या निधीतील कार्यकर्त्यांच्या रूपातले हिस्सेदारच कामांचा बट्ट्याबोळ होण्याचे मुख्य कारण ठरत आहेत.

जनतेच्या मागण्या, गरजा, प्रकल्पांची रचना आणि निधीचे गणित जुळवण्याचे किचकट काम पार पाडून संबंधित यंत्रणा जेव्हा एखादा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करू पाहाते, तेव्हा विशिष्ट उद्देशाने हुल्लडबाजी करणाऱ्यांमुळे दहशत निर्माण होत असेल तर सरकारने त्याची वेळीच दखल घ्यायला हवी. गडकरी यांच्या पत्राला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या धमकीसत्राच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. नेमकी वस्तुस्थिती या चौकशीतून उघड व्हायला हवी. एकीकडे विकासकामांचा आग्रह धरणाऱ्या राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते दुसरीकडे त्यात बाधा ठरत असतील तर त्यांना खड्यासारखे वेचून बाजूला काढण्याचे धारिष्ट्य सर्वच राजकीय पक्षांनी दाखवायला हवे. विकासाच्या महामार्गावरून वेगाने वाटचाल करण्यासाठी हे काटे वेळीच काढायला हवेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे