शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सकारात्मक जनमानसाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:07 IST

सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा.

- डॉ. महेश बेडेकरकाहीच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घातली. या निर्णयामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सण साजरे करण्याच्या पद्धतीबाबत उलटसुलट चर्चा झाल्या. न्यायालये धर्माविरुद्ध आहेत, अशा चर्चांना तर उधाण आले. मंडपांबाबत न्यायालयाने घातलेल्या निर्बंधामुळे नाराज असलेले राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते या निर्णयामुळे अधिक नाराज झाले. न्यायालये आणि जनहित याचिकाकर्ते धर्माविरुद्ध आहेत, असा समज अधिक बळावला आणि मग चिथावणीखोर वक्तव्ये करून सामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, या वक्तव्यांना किती बळी पडायचे, याचा निर्णय सामान्यांनीच घ्यावा. सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा. राज्य घटनेने नागरिकांना धर्माचे पालन करण्याची मुभा दिली असली तरी याच घटनेने नागरिकांना शांततेत जीवन जगण्याचाही अधिकार दिला आहे, याचा विसर राजकारण्यांनी व सामान्यांनी स्वत:ला पडू देऊ नये.जे उद्दिष्ट ठेवून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याच उद्दिष्टाला आजची सार्वजनिक मंडळे हरताळ फासताना दिसत आहेत. गेल्या २०-२५ वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवात प्रबोधनाचे काम तर दूरच; पण दारू पिऊन ‘मुन्नी बदनाम हुई’सारख्या गाण्यांवर हुल्लडबाजी करणारे अधिक दिसतील. अशाच प्रकारची गाणी लावण्यासाठी लोकांना डी.जे. हवा असतो. भजन, आरती, व्याख्यानांसाठी डी.जे. हवा कशाला? पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने सण साजरे करायला लागलो तर डी.जे.ची आवश्यकताच भासणार नाही. परिणामी, लोकांनाही त्रास होणार नाही आणि त्यामुळे न्यायालयातही जावे लागणार नाही.गेल्या काही वर्षांत सण साजरे करण्याचे स्वरूप वेगाने बदलले. सण आणि राजकारण, असे समीकरण दिसत आहे. राजकीय नेते प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सण साजरे करत आहेत.उच्च न्यायालयात २०१०मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेत केवळ ध्वनिप्रदूषणाचाच मुद्दा उपस्थित करण्यात आला नव्हता तर सणांच्या बदलत्या स्वरूपाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती. जिथे माणसांना चालायला व वाहन चालवायला धड जागा नाही, अशा ठिकाणी गणपती, देवीसाठी मंडप बांधण्यास परवानगी देणे कितपत योग्य? राज्यघटनेने लोकांना सण साजरा करण्याची मुभा दिली आहे, असा कोणी मुद्दा उपस्थित करत असेल तर त्याच राज्यघटनेने शांततेचे जीवन जगण्याचा व रस्त्यावरून विनाअडथळा चालण्याचा अधिकारही दिला आहे, याचे स्मरण असावे.साउंड सिस्टीम, मंडप, खड्डे यांबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय लोकप्रिय नसेल तरी लोकहिताचा जरूर आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, एका ठरावीक मर्यादेपुढे आवाजाची पातळी वाढल्यास माणसाला केवळ बहिरेपणा येत नाही, तर शरीरातील अन्य अवयवांनाही हानी पोहोचते. त्यांच्या या दाव्याला कोणीही फेटाळू शकत नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयही नाही. याचाच विचार करून न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखली. परंतु, काही राजकारण्यांनी न्यायालय आणि याचिकाकर्ते धर्माविरुद्ध आहेत, अशी आवई उठविली. या राजकारण्यांनी लोकांची माथी भडकविण्यापेक्षा न्यायालयाचे आदेश समजून घेत त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यानुसार वागायला भाग पाडले पाहिजे. तसेच यात पोलीस यंत्रणा आणि महापालिकेची महत्त्वाची भूमिका आहे. दुर्दैवाने या दोन्ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पाहायला मिळते.उच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर साउंड सिस्टीम भाड्याने देणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला. पण एक - दीड लाख लोकांच्या रोजगारांसाठी लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात घातले जाऊ शकते का? नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन सरकारने गुटखा, विडी बंद केली. त्या वेळीही लाखो लोक बेरोजगार झाले. पण लोकांचे आरोग्य राखण्यासाठी सरकारला बंदीचे पाऊल उचलणे भाग होते. बेरोजगारीची सबब पुढे करीत सार्वजनिक ठिकाणी साउंड सिस्टीम वापरण्याची परवानगी मिळू शकत नाही. राजकीय नेत्यांना मोठ्या धूमधडाक्यात सण साजरे करायचे असतील तर त्यांना सुवर्णमध्य काढणे सोपे आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने एकच सार्वजनिक गणपती बसवावा. कोणत्याही चांगल्या बदलाला सुरुवातीला विरोध होतोच, तसा इतिहासही आहे. सुजाणांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सकारात्मकतेने विचार करावा आणि राजकारण्यांच्या हाळीला कितपत साथ द्यावी, याचा निर्णय घ्यावा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMumbai High Courtमुंबई हायकोर्ट