शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Independence Day: कोरोना संकटात स्वातंत्र्य दिनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 5:20 AM

एकीकडे जगाला ग्लोबल व्हिलेज म्हटले जात असताना नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. देशाच्या सीमा समाप्त झाल्या असल्या तरी सामाजिक अंतर मात्र वाढले आहे.

- भूपेंद्र यादव राज्यसभा सदस्य, भाजप सरचिटणीससंपूर्ण जग कोरोना संकटाला तोंड देत असताना आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. आज आम्ही विकास आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जात असताना साथीचा हा रोग नव्या स्वरूपात समोर आला आहे. जगात काही गोष्टी अतिशय वेगाने बदलत आहेत. एकीकडे जगाला ग्लोबल व्हिलेज म्हटले जात असताना नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. देशाच्या सीमा समाप्त झाल्या असल्या तरी सामाजिक अंतर मात्र वाढले आहे.बदलत्या जागतिक परिस्थितीत हे निश्चित करायला हवे की, भारताने कोणत्या मार्गाने जायला हवे. कोरोना काळात भारताची लढाई अतिशय यशस्वी राहिलेली आहे. आरोग्य सुविधाही वाढविण्यात आल्या आहेत. सर्वांत मोठी बाब म्हणजे या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजची घोषणा केली आहे. जग एका संकटाशी दोन हात करीत असताना आत्मनिर्भर कसे बनता येऊ शकते, याचाच संकल्प १५ आॅगस्ट रोजी व्हायला हवा. मोदी सरकारने आपल्या ६ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळात मुख्य आव्हानांना तोंड देत देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे.सरकारने जे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, शिक्षण धोरण, डिजिटल तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी सवलती, कर प्रणाली सुटसुटीत बनविणे आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने कठोर निर्णय घेत अनेक समस्या दूर केल्या आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा देशात ६१ विमानतळे होती ती आज १०१ आहेत. आरोग्य क्षेत्रातही वेगाने सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोरोना काळातही अतिशय वेगाने चाचण्यांच्या लॅबचे नेटवर्क तयार करण्यात आले. ८० देशांसाठी ‘एचसीक्यूएल’ तयार करण्यात आले. शिवाय रेल्वेची क्षमता वाढविण्यात आली. कायद्यातील सुधारणांसाठीही मोठे काम करण्यात आले. काळाच्या ओघात जुने झालेले आवश्यक वस्तू अधिनियम आणि कामगार कायदा आणि कंपनी कायद्यात दुुरुस्ती करण्यात आली. दिवाळखोरी कायदा आणण्यात आला.दूरगामी योजनेंतर्गत सरकारने अशा क्षेत्रांची निवड केली ज्याच्या आधारावर आगामी ३०-४० वर्षांत देशाला पुढे नेता येईल. त्यासाठी प्राधान्य क्षेत्रांत सुधारणांची सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत कोळसा, खनिज, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा, विमान वाहतूक, वीज क्षेत्र विकासासाठी धोरणात्मक सुधारणा केल्या. मोदी सरकारने धोरणात्मक सुधारणांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत संस्थांची प्रतिष्ठा वाढविली. त्यांनी ६ वर्षांच्या काळातच समृद्ध, सुसंकृत, सुरक्षित, संपन्न आणि सर्वसमावेशी भारत बनवण्याचा यज्ञ सुरू केला आहे. स्वातंत्र्य दिनी या यज्ञासाठी आहुतीचा संकल्प ही सर्वोत्तम संधी आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcorona virusकोरोना वायरस बातम्या