शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

आजच्या काळात ‘शेतकऱ्याचा असूड’ची प्रासंगिकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 6:01 AM

महात्मा जोतीराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकºयाचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे दैन्य प्रथमच जगाच्या वेशीवर टांगले.

- बी. व्ही. जोंधळेसामाजिक विषयांचे अभ्यासकमहात्मा जोतीराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकºयाचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे दैन्य प्रथमच जगाच्या वेशीवर टांगले. त्यांनी या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेचे जे दाहक वर्णन केले आहे त्या शेतकºयांच्या दैन्यावस्थेत आजही फारसा फरक पडलेला नाही. शेतकºयांना दररोज आत्महत्या कराव्या लागत आहेत. वस्तुत: म. फुले हे कुणी अर्थशास्त्रज्ञ नव्हते. त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आहे, असेही नव्हे. पण येथील जातीय नि वर्गीय व्यवस्थेमुळे शेतकºयांचे जे अमानुष शोषण होत आले त्याची पहिली जाण ही जोतीरावांनाच झाली आणि ती त्यांनी रोखठोक लेखनातून प्रभावीपणे व्यक्त केली; म्हणूनच ‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथाचे महत्त्व आज १३६ वर्षांनंतर कायम आहे, हे विशेष!‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेची कारणमीमांसा करताना जोतीराव म्हणतात, ‘ब्राह्मण हे भूदेव आणि राजा हा ईश्वराचा अंश’ असल्यामुळे आपणावर काही अन्याय होतोय ही कल्पनाच येथील शेतकºयांच्या मनाला शिवली नाही. धर्म नि राज्यव्यवस्थेकडून होत आलेले शोषण म्हणजे आपल्या नशिबाचाच एक भाग आहे, असे समजून शेतकरी वागत आल्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले. शेतकºयांचे अज्ञान, त्यांचे अडाणीपण यामुळेही शेतकºयांची पिळवणूक होत आली, असे निरीक्षण नोंदवून जोतीराव म्हणतात, ‘शेतकºयांनी आपले अज्ञान, आळस, धर्मभोळेपणा, व्यसनाधीनता व गतानुगतिकतेचा त्याग केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही.’सावकार-अंमलदार शेतकºयांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना कसे लुबाडतात, याचे मर्मभेदी वर्णन करताना जोतीराव लिहितात, ‘शेतकºयाने स्टांप आणल्यानंतर कुलकर्णी वगैरे लोकांकडून त्याजमध्ये नाना प्रकारच्या अटी लिहून घ्याव्या आणि त्याजवर त्याची वा त्याच्या भाऊबंदाची किंवा मुलाची सही साक्ष घेऊन त्याच्या हातावर लिहिणावळीचा वगैरे खर्च कमी करून दहा-बारा रुपयांबद्दल नऊ-दहा रुपये ठेवावे. तो कागद लिहून त्यास काही दिवस लोटल्यावर त्याचे व्याज मुद्दल जरी त्यास मिळून चुकले तरी त्या व्याजाचे व्याज आणि पडव्याज जुळून त्याच्या मुलाच्या लग्नाकरिता थोडेसे पैसे देऊन त्याजबद्दल नवीन कागज लिहून घ्यावा. येणेप्रमाणे क्रम चालून तीन-चार वर्षांत सुमारे दोनशे-अडीचशे रक्कम फुगली म्हणजे सरकारात फिर्याद टाकून त्या खर्चासह तीनशे अथवा सव्वा तीनशे रुपयांचा हुकूमनामा काढून अन्नधान्य काढण्याच्या वेळी शेतीवर जप्ती बसवावी.’ जोतीरावांच्या काळात सावकार आणि अधिकाºयांच्या भ्रष्ट युतीमुळे शेतकºयांची जशी पिळवणूक नि फसवणूक होत असे तशी ती आजही होते म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे आपले दाहक समाजवास्तव.

म. फुले शेतकरी हितदक्ष होते. ब्रिटिश सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणास त्यांनी वेळोवेळी विरोध केला. उदा. शेतकºयांना भरपूर पाणी मिळावे म्हणून लक्षावधी रुपये खर्च करून शासनाने कालवे बांधले; पण त्याचा हेतू इंग्लंडमधील सावकारांना महाव्याज नि इंजिनीअरांना चांगला पगार मिळावा हा असल्याचे त्यांनी नोंदविले. शेतकºयांकडून भरमसाट करवसुली करून त्यांना पाणी व अन्य सुविधा मात्र पुरवीत नाही ही बाबही त्यांनी आक्षेपार्ह ठरवली. शेतकºयांच्या कराचा विनियोग शहरवासीयांच्या सुख-सुविधांसाठी होतो ही बाब त्यांना मान्य नव्हती.जोतीरावांनी शेतीसुधारणेचे उपाय सुचविताना पाणीपुरवठ्याच्या योजनांना अग्रस्थान दिले. गोरक्षणाची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली होती; पण गोरक्षणामागची त्यांची दृष्टी धार्मिक नव्हे, तर सामाजिक उपयुक्ततेची होती. शेतकºयांना नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळून यंत्राद्वारे शेती करण्याचे तंत्र जोवर अवगत होत नाही तोवर गोरक्षण असावे, असे त्यांनी म्हटले होते. जनावरांमुळे शेतीचे नुकसान झाले तर शासकीय तिजोरीतून नुकसानभरपाई मिळावी, अशी सूचना त्यांनी केली होती.शेतकºयांना कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांचा विचार शासनाने केल्यावर जोतीराव म्हणाले, शेती किफायतशीर होत नाही तोवर बँका यशस्वी होणार नाहीत. त्यासाठी कराचा बोजा कमी करावा. शेतकºयांचे प्रश्न नजरेसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करावा, शेतकºयांना कर्जमुक्त करावे, अशा सूचना जोतीरावांनी केल्या होत्या.जोतीरावांनी ‘शेतकºयाचा असूड’मधून शेतकºयांची जी दैन्यावस्था कथन केली, त्यात आजही फरक पडलेला नाही. महाराष्टÑात ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले. कोल्हापूर-सांगलीत महापूर आला. ताज्या आकड्यांनुसार राज्यातील ५४ लाख ८२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली. अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता तेव्हा महसूल कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटत होते. परिणामी, नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. अशातच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सत्तेची साठमारी सुरू झाली.शेतकºयांच्या नावे पॅकेजेस् जाहीर होतात; पण ती शेतकºयांपर्यंत पोहोचत नाहीत. अतिवृष्टी किंवा अवर्षणाची झळ बसलेल्या शेतकºयांना मदतीसाठी विमा योजना आली; पण विमा कंपन्या शेतकºयांना मदत करण्याऐवजी त्यांची लूट करतात, असाच अनुभव आहे. तात्पर्य शेतकºयांची दैन्यावस्था कायम आहे. शेतकºयांनी आत्महत्या न करता त्यांचा ‘असूड’ शेतकरीविरोधी प्रवृत्तीवर उगारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी