शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Ram Sutar: माणसाने वर्तमानात जगावे! ना भूतकाळाचे ओझे, ना भविष्याची चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:09 IST

Ram Sutar: वयाच्या ९७व्या वर्षीही कार्यरत असणारे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

- राम सुतारख्यातनाम शिल्पकार

वयाच्या ९७व्या वर्षीही कार्यरत असणारे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

आपले बालपण गरिबीत गेले. आज तुमच्याकडे यश आणि पैसा दोन्ही आहे. या प्रवासाकडे कसे बघता? माझे वडील सुतार होते. कुटुंबात चालत आलेले काम मी पुढे नेले. पुढे त्या रोपट्याचे झाड झाले, त्याला फांद्या फुटल्या, फुले-फळे लागली. बस आणखी काय?

आपण चांगली चित्रे काढता, मग आपण शिल्पकार होणे का पसंत केले? प्रत्येक शिल्प तयार करण्याच्या आधी रेखाचित्र तर काढतोच. मी पुष्कळ चित्रे काढली आहेत. पण सर्वाधिक आनंद शिल्प तयार करण्यात मिळाला.

आपली शिल्पं देहबोलीतून तर संवाद साधतातच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपण कसे पकडता? जर समोरची व्यक्ती हसली तर तिच्या चेहऱ्याच्या मांसपेशी कशा काम करतील आणि रागावली तर या मांसपेशी कशा वळतील, याची कल्पना मी करतो. त्यातूनच हावभाव तयार होतात आणि बदलतात.

गांधीजींची तुमची बहुतेक शिल्पं ध्यानमुद्रेतच का? त्यांच्या जीवनाला इतर अनेक पैलू होते. गांधीजींचे माझे पहिले शिल्प हसरेच होते, परंतु संसदभवनात स्थापित करण्यासाठी सरकारला ध्यानमुद्राच पाहिजे होती. आज जगातील ५०हून अधिक देशात मी तयार केलेली गांधीजींची हीच मुद्रा बसवली आहे. शांती आणि अहिंसेचे ते प्रतीक आहे.

आपल्या जीवनातील सर्वात चांगला, सर्वात वाईट काळ कोणता? मी वर्तमानात जगतो. घडून गेलेल्या गोष्टींचे सुख-दुःख बाळगत नाही आणि भविष्याची चिंता करत नाही. जे झाले ते झाले. पुढचा विचार काही करायचा नाही. यामुळे मला जीवनातला सगळाच काळ चांगला वाटतो.

कोणते शिल्प तयार करताना अडचणी आल्या? मला शिल्प तयार करताना आनंद मिळतो. जे काम आपल्याला आवडते त्यात कधीच अडचण येत नाही.

आपल्या कल्पनेत असलेले, पण अजून प्रत्यक्षात न उतरलेले एखादे शिल्प आहे काय?मी गांधींच्या एका शिल्पाची कल्पना केली होती. जिच्यात ते दोन मुलांबरोबर आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाच्या हातात शांततेचे प्रतीक कबूतर आहे आणि मुलीच्या हातात समृद्धीचे प्रतीक फूल. हे शिल्प अजून बाकी आहे. शिवाय मुंबई आणि पुण्याच्यामध्ये एक डोंगर कापून शिवाजी महाराजांचे चरित्र कोरण्याचा विचार आहे. एक - दोनदा बोलणी झाली आहेत. महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला कधी मंजुरी देते ते बघायचे. 

अफगाणिस्तानातील बामियान, अमेरिकेतील माऊंट रुश्मोर स्मारक किंवा अजिंठा-वेरूळसारखे काही करण्याचा विचार आहे काय? मी सुरुवातीला अजिंठा - वेरूळमध्येच काम केले. काही गुंफा अपुऱ्या होत्या. त्यातील एकात गांधीजींचे शिल्प तयार करण्याचा विचार केला होता. गुजरातमधील केवडियात उभारलेल्या सरदार पटेलांच्या शिल्पाचे डोके माऊंट रुश्मोरमधील राष्ट्रपतींच्या डोक्यापेक्षा दहा फूट मोठे आहे. आणखी काय पाहिजे? शिवाय भारतात त्याप्रकारच्या खडकासारखे पहाडही नाहीत.

आपण तयार केलेल्या हजारो शिल्पांमधील आपल्याला सगळ्यात जास्त कोणते आवडते? मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर तयार होत असलेल्या गांधीसागर धरणावर उभी असलेले चंबळची शिल्प. त्याचे एक कारण आहे. केवळ ३५ वर्षांचा असताना मी हे काम केले. ते फक्त दहा हजार रुपयात चंबळचे सात फूट उंच शिल्प मागत होते. तिथे पोहोचल्यावर मला वाटले, इतके छोटे शिल्प दूरवरुन दिसणार नाही. ते जास्त पैसे द्यायला तयार नव्हते. मी तेवढ्याच पैशात एकट्याने एक वर्षात हे ४५ फूट उंचीचे चंबळ देवीचे शिल्प तयार केले. त्यांनी फक्त काँक्रीट दिले. त्याचा पहाड तयार करुन छिन्नी हातोड्याने हे शिल्प मी कोरुन काढले. धरणाच्या ठेकेदाराने छिन्नीला धार काढण्यासाठी फक्त एक माणूस दिला होता. मी दररोज त्या काँक्रीटच्या पहाडावर चढून संध्याकाळपर्यंत काम करत राहायचो. दोन राज्यांमधल्या सहयोगाचेही हे शिल्प प्रतीक असल्याने त्याचे ‘भाईचारा’ ठेवले. माझ्यासाठी कामाला महत्त्व होते, पैशाला नाही.आपण अडीचशे-तीनशे मीटर उंचीचे जगातील सर्वांत मोठे शिल्प तयार करता आहात. इतकी मोठी शिल्पं सटीक कशा तयार करता? पहिल्यांदा स्टुडिओमध्ये मातीचे मॉडेल तयार करतो. स्टायरोफोमचे मोठे मॉडेल करतो. नंतर संगणकावर त्याचे माप मोठे करत जातो. नंतर शिल्पाचे वेगवेगळे भाग फाउंड्रीत टाकले जातात. ते जोडून शेवटी मोठे शिल्प तयार केले जाते.

टॅग्स :Indiaभारतartकला