शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

एका बारशाची गोष्ट!

By admin | Updated: April 24, 2015 23:57 IST

राजकारणात शक्यतांवर बरेच काही अवलंबून असते. एका बारशाचेही तसेच सुरू आहे. ‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याचा मनसुबा कायदामंत्री सदानंद

रघुनाथ पांडे -राजकारणात शक्यतांवर बरेच काही अवलंबून असते. एका बारशाचेही तसेच सुरू आहे. ‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याचा मनसुबा कायदामंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केला, पण प्रत्यक्षात विधी व न्याय विभागाचे अंतिम मत अजून म्हणे यायचेच आहे. मनसुबा जाहीर करणारे गौडा हे तिसरे कायदामंत्री. अडीच वर्षांपासून असेच सुरू आहे. कायदामंत्री बोलले की, मराठी गोटात तारखांच्या उकळ्या फुटतात. प्रत्यक्षात कशात काहीच नसते. नव्या वर्षात दोन तारखा ठरल्या. कोर्टासंबधीचा विषय असल्यानेच कदाचित असे ‘तारखांचे’ पडणे आणि निर्णय प्रलंबित राहणे सुरू असावे !राज्य सरकारने ‘मुंबई हायकोर्ट’ करण्यासाठी केन्द्राला ‘ना हरकत’ कळवून एव्हाना नऊ वर्षे झाली. पण तरीही नामांतर का होत नाही, हा कळीचा प्रश्न ज्याला त्याला पडतो आहे. अर्थात हायकोर्टाचे नामकरण झाल्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का, तर त्याचे उत्तर नाही! अन्य कज्जे चालतात तसाच हाही चालेल व तारखा पडत राहतील. पण तरीही अस्मितेचे प्रश्न असेच रेटून न्यावयाचे असतात. तरीही एक महत्त्वाचे कारण म्हणजे दिल्लीत मराठी मुत्सद्देगिरी कमी पडते. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोेद्योग महामंडळाकडून राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधी संसदेत कायदा करावा लागेल, असे जनतेला सांगत मागच्या सरकारने तीन वर्षे वेळ मारून नेली. निवडणूक प्रचारात या विषयाचे भांडवले केले गेले. पण सामाजिक अस्मितेचा हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूकपणे मार्गी लावला. सत्तेत येताच फडणवीसांनी महाधिवक्त्यांचे मत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘संसदेत कायदा करण्याची काही गरज नाही. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने एनटीसी ही जागा राज्य सरकारला देऊ शकते’, असा कायदा सांगतो असे पटवून दिले, आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही जागा स्मारकासाठी दिली गेली. विषय मात्र पाच वर्षे भिजत पडला होता. राजकीय इच्छाशक्ती असली की प्रश्न कसे चटदिशी मार्गी लागतात, याचेच हे उदाहरण. ‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्यासाठी आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. दरम्यान चार कायदा मंत्री बदलले गेले. राज्य सरकारने दोन वर्षांत केंद्राला बारा पत्रे दिली. शिवसेनेने अलीकडे दोनवेळा हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. शेवटी असे लक्षात येऊ लागले की, मद्रास हायकोर्टाचे चेन्नई करण्याचे ज्या दिवशी ठरेल, त्याच दिवशी ‘बॉम्बे’चेही बारसे होईल.मुंबई उच्च न्यायालयाच्या १५०व्या वर्धापनदिनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुंबईत गेले होते. त्या कार्यक्रमात नामांतराची घोषणा व्हावी, असा आग्रह भाजपा नेते व सध्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी धरला होता. आज तरी शिवसेनेने हा विषय लावून धरला असला तरी वास्तवात हा विषय धसास लावण्याच्या प्रयत्नांच्या मुळाशी राम नाईक आहेत. १९८९ मध्ये ते उत्तर मुंबईचे खासदार असताना त्यांनी मराठी नावांचा आग्रह धरताना अनेक बदल सुचविले आणि केवळ तितकेच नाही तर त्यांचा पाठपुरावाही केला. इंग्रजीतील बॉम्बे व हिंदीतील बंबई हे दोन शब्द गाळून एकच ‘मुंबई’ नाव असावे हा त्यांचा आग्रह त्यांनी पूर्ण करून घेतला. त्याच मालिकेत बॉम्बे हायकोर्टाचा विषय होता. पण अजूनही हे घोंगडे भिजतेच आहे. मूळ मुद्दा भले भाजपाचा असला तरी शिवसेनेची सध्याची भूमिका पाहून तमिळनाडूच्या खासदारांनीही मद्रासचे चेन्नई करण्यासाठी कायदामंत्र्यांची भेट घेतली आणि नामांतराचा मुहूर्त लगेच सांगा असा आग्रह धरला. अर्थात मुंबईसोबत चेन्नईचाही घोळ सुरूच आहे. कायदामंत्र्यांनी तमिळ खासदारांसोेबतही दोनदा बैठक घेतली. सीमाप्रश्न कायद्याच्या कचाट्यात सापडलेला असताना केंद्राने बेळगावचे नामांतर केले. अन्य बारा शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिली. पण महाराष्ट्रासाठी बहुधा वेगळे नियम असावेत. एकूण काय, ‘नावात काय आहे’ असे शेक्सपीअर म्हणून गेला असला तरी नावात बरेच काही असते. विशेषत: अस्मिता असते. महाराष्ट्राला नामांतरे तशी नवी नाहीत. आजवर अनेक विद्यापीठे, गावे, रस्त्यांची नावे बदलली गेली आहेत. अशा काही नामांतरांचा आग्रह धरणारे आता मोठे पुढारीही झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नामकरणाच्या आग्रही मागणीवर शिवसेना आपली नाममुद्रा कोरून मोकळी झाली आहे. तेव्हा बारसे आता होईल तेव्हा होवो!