शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बिनखात्याचे मंत्री, आढाव्यात अडकलेलं सरकार, जनता निराधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:46 IST

उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येऊन १२ दिवस उलटले, तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. पुढील आठवड्यात हिवाळी अधिवेशन होत आहे. त्याचा अट्टहास करण्यापूर्वी संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करून सरकार कामाला लागले असते; तर महाराष्ट्रातील जनतेला आधार मिळाला असता.

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता, निवडणुका, मतमोजणी, राजकीय अस्थिरता, राष्ट्रपती राजवट आणि बिनखात्यांचे मंत्रिमंडळ या प्रवासाला ऐंशी दिवस झाले. महाराष्ट्राच्या सरकारला लकवा मारावा, अशी अवस्था झाली आहे. २१ सप्टेंबरला निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हापासून नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत दोन महिने तीन दिवस राज्य मंत्रिमंडळ असून नसल्यासारखे होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यांच्याबरोबर शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी समारंभात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यालाही आता बारा दिवस उलटले. शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, हे सांगण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री दररोज आढावा घेत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठकही सुरू झाली आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी तीन पक्षांची ही महाविकास आघाडी विकासाचे कोणतेही निर्णय न घेता राजकीय जुळवा-जुळवच करीत आहे. प्रत्येक पक्षाचे सरासरी पन्नासावर आमदार असताना यावरून त्यांच्यात असंतोषाला तोंड फुटेल, अशी भीती वाटते आहे.भाजपला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी वीस-पंचवीसच आमदार लागणार आहेत. त्यामुळे राजकीय अस्थिरतेला घाबरून राज्य मंत्रिमंडळाची संपूर्ण रचना न करता ठाकरे सरकारचा कारभार चालू आहे, असे म्हणण्याचे धाडस कोणी करेल का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक आमदारांना मंत्री म्हणून प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. शिवाय शिवसेनाही गेली पाच वर्षे सत्तेत होती. त्यांच्याही काही आमदारांना हाच अनुभव आहे. सर्व पक्षांतील अनुभवी आमदारांना मंत्रिमंडळात घेऊन एक दमदार, वजनदार सरकार करता येऊ शकते. मात्र, या पक्षांच्या नेत्यांचा त्यांच्या आमदारांवरच विश्वास नाही, असेच यातून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय न घेता, विनाखात्याचे मंत्रिमंडळ मागील कॅबिनेटच्या बैठकांतील निर्णयाचा आढावा घेत असल्याचे सांगत आहे.खरीप हंगामाच्या प्रारंभी दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्र दुष्काळाच्या तोंडावर होता. परतीचा पाऊस निघून जाताच अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत गेल्या कित्येक वर्षांतील विक्रमांची तोडमोड करून टाकली. थोडेबहुत आलेले खरिपाचे पीक भिजून गेले. कुजून गेले. शेतातच विस्कटले. अवकाळी पाऊस लांबल्याने रब्बीचा पेरा अद्यापही पूर्ण झालेला नाही. डिसेंबरचा पहिला आठवडा संपला, तरी कडाक्याच्या थंडीचा पत्ता नाही. अशा गंभीर परिस्थितीत खंबीर निर्णय घेण्याची गरज असताना असे लुळेपांगळे सरकार काय कामाचे? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर ठाकरे-पवारांची हुकूमत आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी करण्याचे धाडस असणारा नेता कोण आहे? त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती बाळगण्याचे कारणच काय असू शकते?पुढील आठवड्यात नागपूरला एक आठवड्याचे हिवाळी अधिवेशन होत आहे. तेदेखील औपचारिक आहे. त्यापैकी किती दिवस पूर्ण कामकाज होईल? नवे निर्णय जाहीर कसे करता येतील? कारण मंत्र्यांना कोणत्या खात्यांचा कारभार पाहायचा आहे, याचाच पत्ता नाही. अशा परिस्थितीत अधिवेशन घेण्याचा अट्टहास करण्यापूर्वी संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करून सरकार कामाला लागले असते; तर महाराष्ट्रातील जनतेला आधार मिळाला असता. दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीने ग्रामीण भागाबरोबरच शहरांनाही फटका बसला आहे. त्यांना मदतीचा हात आवश्यक आहे. राज्याची तिजोरी अधिकच कमकुवत करून भाजपने सत्ता सोडली आहे. धडाधड निर्णय घेण्याजोगीही स्थिती नाही. महाराष्ट्र राज्यच एका नाजूक वळणावर उभे आहे. अशा राज्याचे मंत्रिमंडळ लुळेपांगळे असावे, हे अशोभनीय आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस