शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सौंदर्यवादी साहित्याचे ‘फडके युग’

By विजय दर्डा | Published: August 03, 2018 2:53 AM

लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...

-विजय बाविस्कर

लघुनिबंधकार, कथाकार, कादंबरीकार, ना. सी. फडके यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कन्या गीतांजली जोशी ‘साहित्यगंगेच्या काठी’ हा कार्यक्रम पुण्यात ४ आॅगस्टला सादर करत आहेत. त्यानिमित्त...लोकप्रिय कादंबरीकार, सौंदर्यवादी साहित्यिक, नारायण सीताराम ऊर्फआप्पासाहेब फडके यांचा जीवनपट विविधरंगी होता. तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे नामवंत प्राध्यापक असलेल्या फडके यांचा जीवनाकडे, कलेकडे व साहित्याकडे पाहण्याचा स्वत:चा असा खास दृष्टिकोन होता.सन १९०४ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आलेल्या फडक्यांचे शिक्षण पुण्यात झाले अन् नोकरीनिमित्त ते कोल्हापूरमध्ये स्थिरावले. राजाराम महाविद्यालयात दोन तपे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. सन १९१२ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली; परंतु ती लिहिल्यावरही आपण साहित्यिक होणार आहोत अशी त्यांची भावना नव्हती. सन १९१६ मध्ये ‘अल्ला हो अकबर’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर आणि थोडीफार गाजल्यावरदेखील साहित्यिक होण्याची इच्छा त्यांच्या हृदयात उगम पावली नव्हती. पुढे ‘जादूगार’ आणि ‘दौलत’ या दोन कादंबऱ्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी ‘हरिभाऊ आपट्यांनंतर एक नवा कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला आहे,’ असं वाचक म्हणू लागले.‘ललित साहित्याची दौलत उधळणारे जादूगार’ अशा शब्दांत बेळगाव येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना शि.म. परांजपे यांनी त्यांचा गौरव केला. मग मात्र साहित्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून दाखविण्याचं जीवितकार्य मानून त्यांनी साहित्यिक होण्याचं ध्येय ठेवलं. त्यानंतर १९७८ पर्यंत ते सतत लिहीतच राहिले. त्यातून ७४ कादंबºया, २७ लघुकथासंग्रह, ७ नाटके, २२ समीक्षणात्मक लेखसंग्रह आणि ८ चरित्रे असा प्रचंड पसारा उभा राहिला.मराठीतील पहिले कथाकार मानले गेलेल्या फडके यांनी लघुकथा आणि समीक्षेच्या क्षेत्रात विशिष्ट परिभाषा रूढ केली. त्यांनी केवळ विवेचन केले नाही, तर तंत्रवाद आणि कलेकरिता कला याबाबत निश्चित अशा भूमिका घेतल्या. आपल्या कथांना आकर्षक शीर्षक देणाºया फडके यांनी वाचकांसमोर उत्तम दर्जाचा आदर्श निर्माण केला. मराठी कादंबरीला त्यांनी बांधेसूद, आधुनिक व तंत्रशुद्ध रूप दिले. विशेषत: बोलीभाषेला जवळची सुटसुटीत, सोपी भाषा दिली. महाराष्टÑातील तत्कालीन महत्त्वाच्या घटना, चळवळी व विचारप्रणालीचा त्यांनी आपल्या कादंबरी लेखनासाठी उपयोग केला व स्वत:ला काळाच्या मागे पडू दिले नाही. लघुनिबंध या पाश्चात्त्यशैलीतले लेखन त्यांनी जाणीवपूर्वक मराठीत वाढवले. मराठी साहित्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यामागे होता.शैलीदार, श्रवणीय, निरुपमेय आनंद देणारा वक्ता म्हणूनही ना.सी. फडके यांनी लौकिक कमावला. त्यांचे अमोघ वक्तृत्व हे मैफलीचा आनंद देणारे होते. असे असले तरी वाङ्मयचौर्य तसेच लेखनातील काहीसे एकसुरीपणअशा टीका त्यांच्यावर होत गेल्या. त्यांचे प्रेमविषयक चिंतन उथळ व ठरावीक ठशाचे असले, तरी त्यांच्या लेखनशैलीची सहजताव रुचिर सौंदर्यदृष्टी यामुळे हे चित्रण वाचकांना आकर्षक वाटत असे. आपल्या लेखनातूनवसंत फुलविणारा युगप्रवर्तक साहित्यिकम्हणून वाचकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण झाले आणि मराठी साहित्यातीलएका कालखंडाची ‘फडके युग’ म्हणून नोंद घेतली गेली.

टॅग्स :Puneपुणे