शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम चित्रकार आणि मुशायऱ्यांचे शायर राहत इंदौरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 07:52 IST

साहिर लुधियानवी यांच्यानंतर मुशायऱ्यात ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची, ते राहतजी म्हणजे चमत्कार होते.

- प्रदीप निफाडकर, ज्येष्ठ गझलकार व पत्रकार, पुणेहम ऐसे फूल कहाँ रोज रोज खिलते है,सियह गुलाब बडी मुश्किलों से मिलते है।(आमच्यासारखी फुलं कुठे रोज रोज उमलतात का? अहो, काळा गुलाब फार मुश्किलीने उमलतो.)राहत इंदौरी गेले अन् माझ्या ओठांवर हाच शेर आला. त्यांच्याकडून मी पहिला हाच शेर ऐकला होता. स्वत:च्या काळ्या रंगावर त्यांनी सियह गुलाब लिहिले; पण त्याचबरोबर त्यांनी लिहिले होते की, ‘अशी फुले थोडीच रोज उमलतात?’ ते खरेच होते. एक चांगला चित्रकार, चांगला शायर व चांगला माणूस म्हणून भारतच नाही, तर संपूर्ण शायरी जगत ज्यांना जाणत होते, ते राहत इंदौरी म्हणजे मुशायरा जिंकणारे खात्रीशीर नाव होते. याचा अर्थ असा अजिबात नाही की, ते फक्त मुशायऱ्यांचे शायर होते.

हौसले जिंदगी के देखते हैं,चलिए कुछ रोज जी के देखते हैं।असे शेर लिहिणारे राहतजी. आणि मंदिर-मशिदींच्या बदलत्या स्वरूपावर-यहां एक मदरसा होता था पहलेमगर अब कारखाना चल रहा है।असे लिहिणारे राहतजी मुशायऱ्यांचे शायर होते असे कोण म्हणेल; पण साहिर लुधियानवी यांच्यानंतर मुशायऱ्यात ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची, ते राहतजी म्हणजे चमत्कार होते. शाळेत असतानाच त्यांचा मल्लखांब खेळताना खांदा निसटला, तरी अत्यंत मेहनत करून त्यांनी आपल्या व्यंगाची कुणाला जाणीवही करून दिली नव्हती. ते ध्वनिक्षेपकाजवळ उभे राहिले की तिरके उभे राहत आणि लोकांना त्यांची ती शैलीच वाटायची; पण आपल्या व्यंगाला त्यांनी बदलले हा चमत्कारच नाही का? त्यांना मधुमेहापासून अनेक आजार झाले तरी देश-विदेशात मुशायरे गाजत होते. त्यांची पत्नी सीमाजी म्हणायच्या की, ते जर घरी राहिले तर आजारी पडतील. आणि त्यावर ते शेरही ऐकवायचे-फुर्सते चाट रही हैं मेरी हस्ती का लहूमुन्तजिर हूँ, कि कोई मुझको बुलाने आये।
मित्र-चाहत्यांमध्ये वाटला गेलेला हा शायर जाणे हे केवळ ऊर्दूचे नव्हे, तर तमाम कवितेच्या जगाचे नुकसान आहे. अनेकांना माहिती नसेल, ते उत्तम चित्रकार होते. तारिक शाहीन यांच्या ‘सूरज देश’ या पुस्तकाचे कव्हर पाहिल्यावर अनेकांना ते कळाले. त्यांनी इंदूरला आपल्या चित्रकारितेने अनेक चित्रपटांची पोस्टर रंगविण्यापासून सुरुवात केली. पुढे कलार्थी नावाचा स्टुडिओ उघडून अनेक कामे त्यांनी केली. त्याकाळाचे नामवंत चित्रकार विष्णू चिंचाळकर, डी. डी. देवलाळीकर, एन. एस. बेंद्र यांच्याकडे त्यांनी काही काळ चित्रकलेचे धडेही घेतले होते. इकडे हे उस्ताद, तर शायरीमध्ये त्यांचे उस्ताद कैसर इंदौरी होते. म्हणून सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरूची आठवण म्हणून ‘राहत कैसरी’ या नावाने गझला लिहिल्या होत्या. त्यांचा पहिला संग्रह ‘धूप-धूप’ आला. त्यावर हेच नाव दिसते. कैसर साहेब इंदूरच्या राणीपुरा भागात राहात. राहत जेव्हा त्यांच्याकडे जात तेव्हा वाटेत नाला ओलांडून जावे लागे. या नाल्याने इंदूरचे दोन भाग केले होते. एकदा असेच ते कैसर साहेबांकडे गेले असता त्यांनी विचारले की, किती गझला लिहिल्यास? त्यावर राहत यांनी अभिमानाने सांगितले, अगदी चार-पाच दिवसांत २२ गझला लिहिल्या. कैसर साहेब म्हणाले, ‘जा, त्या नाल्यात सगळ्या फेकून ये.’ राहत यांनी त्या फेकल्या. उस्तादांचे म्हणणे होते, इतक्या झपाट्याने गझला लिहू नयेत. अशा गझलांना जीव नसतो. राहत यांनी गुरूंची आज्ञा पाळली. अशा घटनेतून त्यांचा लिखाणाचा झपाटा दिसतो आणि गुरूवरचे प्रेमही. त्यांचा मुलगाही अलीकडे लिहू लागला होता. त्याचा पहिला मुशायरा पुण्यातच झाला. त्यावेळी मी गेलो होतो. आमची ती शेवटची भेट. त्यावेळी त्यांनी ऐकवलेला शेर आजही कानात गुंजतो आहे -जिस्म में कैद है घरों की तरहअपनी हस्ती है मकबरों की तरहऔर दो चार दिन हयात के हैंये भी कट जायेंगे सरों की तरह(घरात जसे कोंडून राहतो, तसे आयुष्य हे शरीरात कोंडलेले आहे. आपले अस्तित्व एखाद्या थडग्यासारखे आहे. अजून दोन-चार दिवसांचे आयुष्य आहे. तेही कापले जाईल मुंडकी उडवावी तसे.) तेव्हा वाटले नव्हते की, हे दोन-चार दिवस असेच उडून जातील. फार लवकरच गेले. असा हा माणूस. माझे चांगले मित्र आज आपल्यातून गेले आहेत. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी. त्यांच्याबरोबरचे अनेक मुशायरे आठवतात. विशेषत: जळगावच्या बालगंधर्व नाट्यगृहातील त्यांच्या गुजरातच्या वक्तव्यावरचे शेर आणि त्यावर मी दिलेले उत्तर व त्यानंतर त्यांनी भेटून दिलेली दाद. सारेच आठवते, पण... आपण आता फक्त त्यांच्या गझला आणि ‘चोरी चोरी जब नजरे मिली’सारखी गीते गुणगुणणे हीच त्यांना श्रद्धांजली.