Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत

By यदू जोशी | Published: April 16, 2021 02:56 PM2021-04-16T14:56:19+5:302021-04-16T14:59:08+5:30

शिवसेनेच्या विरोधात गेली तीस वर्षे राजकारण करीत असलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात म्हणजे चमत्कारच.

Pandharpur Election: Ajit Pawar at Shiv Sena office, Gulabrao Patil asked vote for 'NCP' | Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत

Pandharpur Election: राजकारण झिंदाबाद; अजितदादांची शिवसेना शाखेत बैठक अन् गुलाबरावांनी मागितलं 'घड्याळा'साठी मत

Next
ठळक मुद्देएकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोंडवळा बदलताना दिसत आहे. ३६ वर्षांच्या राजकारणात घड्याळाला मत द्या हे सांगण्याची संधी त्यांनी मला दिली.तुमच्यामुळे (देवेंद्र फडणवीस) हे दिवस आले... प्यार का वादा फिप्टी-फिप्टी' केलं असतं तर हे दिवस आले नसते

यदु जोशी 

भाजपला(BJP) सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस(Shivsena-NCP-Congress) हे तीन पक्ष एकत्र आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री(CM Uddhav Thackeray) तर अजित पवार(Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले. आता तीन पक्षांचा संसार जवळपास दीड वर्षे जुना झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा या महाविकास आघाडीने पार बदलून टाकला. यापुढील सर्व निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढू असे तिन्ही पक्षांचे नेते अधुनमधून सांगत असतात. केवळ मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आधीच जाहीर केले आहे. सत्तेत एकत्र असलेले तीन पक्ष निवडणुकीतही एकत्र असल्याचे चित्र सध्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. तेथे राष्ट्रवादीचे भगिरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी जिवाचे रान केले आहे. पंढरपूर, मंगळवेढ्यातील गावागावात ते गेले. काल एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. अजितदादा चक्क शिवसेनेच्या मंगळवेढ्यातील कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. हा फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

शिवसेनेच्या विरोधात गेली तीस वर्षे राजकारण करीत असलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात म्हणजे चमत्कारच. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भगिरथ भालकेंना विजयी करण्यासाठी भिडलेले अजितदादा शिवसेना कार्यालयात जाऊन बसले. दुसरीकडे, शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचारसभेत जबरदस्त शेरेबाजी केली. ते भगवा दुपट्टा घालून भाषण देऊ लागले. तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या गळ्यात घड्याळाचा म्हणजे राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकला. ‘३६ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की, ३६ वर्षांच्या राजकारणात घड्याळाला मत द्या हे सांगण्याची संधी त्यांनी मला दिली.  त्यांचं अन् आमचं 'लव्ह मॅरेज' होतं. नवरदेव कोण अन् नवरी कोण यापेक्षा लफडं होतं हे पक्कं आहे. ते कसं झालं कसं तुटलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे, असे बोलतानाच गुलाबराव पाटील यांनी, 'तुमच्यामुळे (देवेंद्र फडणवीस) हे दिवस आले... प्यार का वादा फिप्टी-फिप्टी' केलं असतं तर हे दिवस आले नसते, असं सांगत गुलाबरावांनी हशा पिकवला.

एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोंडवळा बदलताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अलिकडेच निधन झाले. महिना-दीड महिन्यात तिथेही विधानसभेची पोटनिवडणूक होईल. पंढरपूरमध्ये २०१९ मध्ये पंढरपुरात भारत भालके (राष्ट्रवादी) यांनी भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला होता. देगलूरमध्ये अंतापूरकर (काँग्रेस) यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीत ही जागा सिटिंग-गेटिंगनुसार काँग्रेसकडेच राहील. शिवसेनेचे गुलाबराव पाटील तिथे काँग्रेसच्या प्रचाराला जातील कदाचित. महाराष्ट्राच्या राजकारण असं बदलत चाललं आहे.

Web Title: Pandharpur Election: Ajit Pawar at Shiv Sena office, Gulabrao Patil asked vote for 'NCP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.