कृषी पायाभूत सुविधा निधी कागदोपत्री आकर्षक भासत आहे; पण त्याचे मूल्यमापन अंमलबजावणीनंतरच करता येईल. घोषणा आकर्षक; पण अंमलबजावणी ढिसाळ, हा अनुभव कृषी क्षेत्राने यापूर्वी अनेकदा घेतला आहे. ...
केंद्र सरकारने सक्तीचा सल्ला दिला की, पुरेशा आरोग्य संरक्षणासह कॅम्पस परीक्षा राज्य सरकारने घ्यावी. परंतु, महाराष्ट्रासह काही राज्यांना वाटते की, कॅम्पसमध्ये परीक्षा घेण्यात तरुणांमध्ये कोविड पसरण्याचा धोका आहे. ...
गीतेच्या तत्त्वबोधाने ज्ञानेश्वरी नटली की ज्ञानेश्वरीचे सिद्धांत - दृष्टांत आणि भाषा सौंदर्याने गीता नटली. कुणी कुणाला अलंकारिले हे समजत नाही; पण या दोन्ही ग्रंथांमुळे ज्ञानवंत, साधक, रसिक, भक्त आणि सामान्यजनही तृप्तीच्या आनंदाने नटले हे निश्चित. ...
सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे ...
संकटातही लोकांची पिळवणूक करण्याची, त्यांची लूट करण्याची प्रवृत्ती ही आपली मोठी समस्या आहे. एरवी देशप्रेमाच्या गप्पा करणारे संधी मिळताच खिसेकापू होतात. भांडवलशाहीची स्तुती करणारे युरोप, अमेरिकेतील देशांमधील सक्षम सरकारी आरोग्य व्यवस्था दुर्लक्षित करता ...
विकासाचा दरच उणे होणार असे ते म्हणतात, तेव्हा आर्थिक विकासाच्या आघाडीवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत. थोडा उत्तम पाऊस आणि एक-दोन राज्यांतील कोरोनाची हाताबाहेर गेलेली स्थिती वगळता आलेले यश एवढीच जमेची बाजू आहे. ...