शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

घुबड... त्यांना तो शकुन, मग इतरांना अपशकुन कसा?

By गजानन दिवाण | Published: December 03, 2019 2:12 AM

घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

- गजानन दिवाण (उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)

प्रगतीची अनेक शिखरे पार केली, तरी घुबडाला पाहणे शकुन की अपशकुन, असा प्रश्न अनेकांना पडतो. गावागावात तो उपस्थित होतो. पुढारलेल्या शहरांमध्ये देखील तो होतो. घुबडाचे तोंड पाहिले की अपशकुन होतो, असा आमचा गैरसमज. काळ्या जादूच्या अंधश्रद्धेतून वाढलेली शिकार, प्रचंड जंगलतोड, जंगलावरील अतिक्रमणे आणि वणव्यांमुळे या घुबडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे थांबावे आणि जनजागृती व्हावी म्हणून पुण्यात गेल्या आठवड्यात जागतिक घुबड परिषद भरविण्यात आली होती. जगभरातील १६ देशांमधील संशोधकांनी या ठिकाणी हजेरी लावली.घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. शेतात पिकांची प्रचंड नासाडी करणारे उंदीर आणि घूस या घुबडाचे मुख्य अन्न. घुबडाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते, ते यामुळेच. उंदराच्या सात जाती, सरपटणाºया चार जाती, चिचुंद्रीच्या तीन आणि काही किडेदेखील घुबडाचे अन्न. जगभरात घुबडाच्या जवळपास २४० जाती आढळतात. त्यातील ३८ प्रकारच्या जाती भारतात आढळतात. यातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक घुबड एकट्या महाराष्टÑात आढळतात. अंधश्रद्धेतून भारतात दरवर्षी ७८ हजार घुबडांची हत्या होत असल्याची आकडेवारी या परिषदेचे संयोजक आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी दिली. हा पक्षी तसा अतिशय देखणा; पण काही कारणांमुळे तो भेसूर वाटतो. घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना ट्यूबसारखी असते. त्याला तीन पापण्या असतात. मोठ्या डोळ्यांमुळे तो रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतो. दिवसा आराम करतो आणि रात्री तो शिकारीसाठी बाहेर पडत असतो. घुबडाला डोळे हलविता येत नाहीत. आजूबाजूला पाहण्यासाठी तो डोळे नव्हे तर अख्खे डोके गोल फिरवीत असतो. माणसांच्या नजरेत हे भीतीदायक असते. त्याच्या मानेत १४ मणके असतात. त्यामुळेच तो आपली मान २७० अंशांमध्ये फिरवू शकतो. घुबडाची ऐकण्याची क्षमतादेखील अतिशय उत्तम असते. घुबडाच्या पंखांवरील पिसांची रचना अशी असते की, ज्यामुळे उडताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही. स्वत:च्या रक्षणासाठी घुबड भयावह आवाज काढू शकतात. भीती वाटण्याचे हे आणखी एक कारण.ज्याचे तोंड पाहिल्याने दिवस वाईट जातो, असा समज असलेल्या त्या घुबडावर कोल्हापूरचे संशोधक डॉ. गिरीश जठार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे तीन वर्षे अभ्यास केला. नंतर तब्बल एक महिना मेळघाटात घालविला. या काळात दिवसातून किमान तीन वेळा त्यांना घुबड दिसायचे. म्हणून त्यांचा कुठलाच दिवस वाया गेला नाही. उलट याच घुबडाच्या संशोधनावर त्यांनी पीएच.डी. मिळविली. घुबडाच्या अतिसंकटात असलेल्या आठ जातींपैकी ‘रानपिंगळा’ या जातीचा घुबड जठार यांनी शोधला. महाराष्टÑात घुबडाच्या १२ पेक्षा जास्त जाती आढळणारे तोरणमाळ, मेळघाट आणि तानसा अभयारण्य ही तीनच ठिकाणे आहेत. घुबडाला वाचवायचे असेल, तर त्यांचा अधिवास वाचवायला हवा. हाच विचार करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात ‘बीएनएचएस’ने तानसा अभयारण्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्थानिकांची जैवविविधता समिती स्थापन करून जंगलावरील अतिक्रमण, वणवे रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय जंगलाशेजारी राहणाºया लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. जनजागृतीसाठी दरवर्षी २४ आॅक्टोबर हा रानपिंगळा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे. जठार यांच्याशिवाय महाराष्टÑात पुण्यात राहणारे पंकज कोपर्डे घुबडाच्या उत्क्रांतीवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी याच विषयावर पीएच.डी. मिळविली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार भारतात आढळणाºया लहान आकाराच्या घुबडाची उत्क्रांती साधारण ३० ते ५० लाख वर्षांपूर्वी झाली असावी.देवी लक्ष्मी स्वर्गातून खाली उतरत असताना तिच्याजवळ सर्वात आधी घुबड पोहोचले. त्यामुळे तिने घुबडाला आपले वाहन निवडले, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. जठार आणि कोपर्डे या दोघांनाही घुबड शकुन ठरले. तसे पाहिल्यास घुबड कोणासाठीच अपशकुन ठरत नाही. शेतकºयांचा मित्र, म्हणजे तो सर्वांचाच मित्र. मग त्याचा अपशकुन कसा?

टॅग्स :environmentपर्यावरण