शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Birth anniversary : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा उद्गाता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 9:56 AM

दीनदयालजींनी अंत्योदयाची कल्पना मांडली, म्हणजे आर्थिक विचार करत असताना समाजातील अखेरच्या पायरीवर उभे असलेल्या गोर-गरिबांचे कल्याण केले गेले पाहिजे. जन-धन खाते, अटल पेन्शन योजना ही याच विचारांच्या रूपाला आलेली फळं आहेत.

स्व. दीनदयाल उपाध्याय केवळ रा. स्व. संघाचे प्रचारक नव्हते तर तत्कालीन भारतातील जनसंघांचे नेते होते. आर्थिक क्षेत्र,  राष्ट्रवाद,  वैश्विक रचनेविषयीचे त्यांचे विचार आज  काळाच्या कसोटीवर उतरलेले दिसतात. तत्कालीन भारत आणि एकूण जगभरामध्येच साम्यवाद व भांडवलशाही अशा दोन विचारसरणी प्रभावशाली होत्या. अंतिम सत्याचा मार्ग यातल्या कुठल्या तरी एका विचारसरणीतूनच जातो, अशी ठाम भूमिका तत्कालीन विचारवंताची, राजकीय नेतृत्वाची  होती. परंतु, भारतीय जनसंघाच्या नेतृत्वाखाली दीनदयालजींनी सातत्याने  संतुलित समन्वयवादी भूमिका घेतली.  समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय विचार केला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह!

स्वातंत्र्यानंतरचा कालखंड हा जागतिक स्तरावर शीतयुद्धाचा कालखंड होता. पंडित नेहरुंसह देशातील बहुसंख्य नेते साम्यवादी व अलिप्त राष्ट्र धोरणांच्या विचारांचे पुरस्कर्ते होते.  दीनदयालजींनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. एक सशक्त, स्वयंभू विकसित राष्ट्र म्हणून आपण उभे राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका सातत्याने राहिली होती. काळाच्या ओघात भारताने आता हीच भूमिका स्वीकारली आहे. 

विद्यमान काळामध्ये देशात नव्हे तर जगात ‘पर्यावरण’ हा परवलीचा शब्द झाला आहे.  दीनदयालजी म्हणत, निसर्गाचे दोहन करू नका. जेवढे निसर्गाकडून आपण घेतो, तेवढे निसर्गाला दिले पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. परंतु त्यावेळी त्यांची चेष्टा केली गेली. एकीकडे समाजवाद व भांडवलशाही याच्या द्वंद्वामध्ये एकात्ममानवतावादाचा विचार त्यांनी विजयवाडा येथील जनसंघाच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये प्रबंधाच्या माध्यमातून सादर केला.  विकास आणि वाढ यात फरक असतो, हे त्यांचे सूत्र होते.  

प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वसामान्यांची शेती, साक्षरता, महिलांची प्रगती अशा निकषांवरसुद्धा आर्थिक प्रगतीचे मोजमाप केले पाहिजे, असे ते म्हणत. मनुष्य हा केवळ भाकरीकरिता जगतो आणि त्याची पूर्तता करणे हेच शासनाचे काम असले पाहिजे, या विचारांनी भारलेल्या वातावरणात त्यांनी मानवजातीचा, त्याच्या कल्याणाचा विचार करताना माणसाचा समग्र विचार केला पाहिजे, ही भूमिका  मांडली. जगातल्या अनेक देशांचा वाढीचा दर चांगला असतानासुद्धा या देशांना आपली जनता सुखी आहे किंवा नाही, हे पाहण्याकरिता Happiness Index वापरावा लागतो. यातच दीनदयालजींनी मांडलेल्या मूलगामी विचारांचे यश आहे.

ऋजुतापूर्ण व्यवहार,  बडेजावाला फाटा, आपली वैचारिक बांधिलकी प्रखरपणे पण नम्रतेने मांडत राहणे, ही दीनदयालजींच्या विचारांची आणि व्यवहारांची वैशिष्ट्य होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जनसंघाचे काम देशभरात तर वाढवलेच, पण हे करत असताना  अटलजी, अडवाणीजी यांच्यासह अनेक तरुण नेत्यांना तयार करण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली.  त्यांच्या अकाली व संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूने केवळ जनसंघाचे नव्हे, तर या देशातल्या राष्ट्रवादी विचारांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना  श्रद्धांजली वाहताना अटलजी म्हणाले होते, ‘‘दीनदयालजी जरी गेले तरी त्यांचे विचार  आमच्यात राहतील व दीनदयालजींच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून राष्ट्रवादी विचारसरणीचे कार्यकर्ते निर्माण होतील!’’ अटलजींची ही भविष्यवाणी आज खरी ठरल्याचे आपण अनुभवत आहोत.

दीनदयालजींनी अंत्योदयाची कल्पना मांडली, म्हणजे आर्थिक विचार करत असताना समाजातील अखेरच्या पायरीवर उभे असलेल्या गोर-गरिबांचे कल्याण केले गेले पाहिजे. जन-धन खाते, अटल पेन्शन योजना ही याच विचारांच्या रूपाला आलेली फळं आहेत.  जागतिक राजकारणामध्ये दादागिरी न करता “वसुधैव कुटुंबकम”चा आग्रह भारताने धरला पाहिजे, ही भूमिका दीनदयालजींनी मांडली होती. आज भारताने जगाबरोबर केलेली “लसमैत्री” हे त्याचेच एक स्वरूप आहे.            आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय विचारांच्याबाबतीत काळाच्या कसोटीवर चोख उतरलेली राष्ट्रवादाची भूमिका मांडत असताना  संपूर्ण मानवतेचा विचार ज्यांनी काळाच्या पुढे जाऊन मांडला, अशा या महान नेत्याला त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत अभिवादन !- अतुल भातखळकर, आमदार, भारतीय जनता पक्ष 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ