शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:24 IST

नुकताच फार्मसी दुकानांनी आॅनलाइन फार्मसीविरोधात संप पुकारला होता.

नुकताच फार्मसी दुकानांनी आॅनलाइन फार्मसीविरोधात संप पुकारला होता. गेल्या सहा महिन्यांत देशात अनेक आॅनलाइन फार्मसी सुरू झाल्या आहेत. आघाडीच्या सेलीब्रिटींना घेऊन याच्या जोरदार जाहिराती सुरू आहेत. तसेच नुकतेच या आॅनलाइन फार्मसीवर कशाप्रकारे भोंदू आॅनलाइन डॉक्टर तुम्हाला हवे ते प्रिस्क्रिप्शन तयार करून देतात याचे गैरप्रकार उघड झाल्याने आॅनलाइन फार्मसीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरी आयते आणून दिलेले औषध हे रुग्णांना सोयीचे वाटत असले तरी वैद्यकीयदृष्ट्या ते जिकिरीचे ठरू शकते.

आपल्या देशात आॅनलाइन फार्मसीचे वारे शिरण्याआधी २०१४ साली अमेरिकेत याचे प्रचंड पेव फुटले होते. अमेरिकेत जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत असे दिसून आले की यावर विकली जाणारी ५० टक्के औषधे ही बनावट औषधे होती व दहा हजारपैकी ९९३८ आॅनलाइन फार्मसी अमेरिकेच्या फार्मसी नियमांचे उल्लंघन करत होते. वर लान्सेट या जगमान्य मेडिकल जर्नलमध्ये आवाज उठवल्यावर अमेरिकेत यावर नियंत्रण आणण्यात आले. बनावट औषधे आणि दुकानांच्या माध्यमातून औषध विक्रीवर अजून आपल्या देशात अन्न औषध प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण नसताना आॅनलाइन फार्मसीचा भस्मासूर अंगावर ओढून घेणे धोक्याचे ठरणार आहे. आज मानसिक आजार, लहान मुले यांची बरीच औषधे ही शेड्यूल एच औषधे आहेत. यात रुग्ण बघून प्रिस्क्रिप्शनच्या हार्ड कॉपीशिवाय देणे अवैध आहे. पण हे प्रकार आॅनलाइन फार्मसीवर सुरू झाले आहेत. सवय लागण्याची शक्यता असलेली बरीच औषधे आॅनलाइन फार्मसीवर उपलब्ध आहेत. अन्न व औषध प्रशासन अजून आॅनलाइन फार्मसीच्या धोक्यांबद्दल जागरूक नाही.

आॅनलाइन फार्मसी जर नियंत्रित असेल तर त्याचे काही फायदेही आहेत. यावर तुम्हाला त्या औषधाचे कन्टेंट काय आहे हे टाकले की त्याच्या विविध किमतींचे १० आॅप्शन्स दिसतात. हे औषधांच्या दुकानात शक्य नाही. तसेच आॅनलाइन फार्मसीवर किमतीवर तुम्हाला २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय घरपोच औषधे मिळण्याची सोय वेगळीच. पण आजही आपला समाज औषधसाक्षर झालेला नाही. डोकेदुखते म्हणून सहज जाऊन फार्मसिस्टला विचारून औषध घेण्याचे प्रमाण आपल्या देशात खूप आहे. तसेच औषधांमध्ये चांगल्या प्रतीचे स्वस्त औषध वापरण्यास हरकत नाही. पण आज भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेली बहुतांश औषधे निकृष्ट दर्जाची आहेत.औषधांची खरेदी हा डॉक्टर, फार्मसिस्ट आणि रुग्ण यांच्यातील एक अत्यंत व्यक्तिगत, संवादपूर्ण आणि जिव्हाळ्याचा व्यवहार असतो.

यात डॉक्टरांकडून औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन ते फार्मसिस्टने पडताळून नीट देणे आणि परत डॉक्टरांनी विकत दिलेले औषध योग्य आहे की नाही हे तपासून औषध कसे घ्यायचे हे समजावून सांगणे. नंतर एखाद्या औषधाचा त्रास झाल्यास परत डॉक्टरांकडून औषध बदलून घेणे. आॅनलाइन फार्मसी व्यवहारात कुठेतरी या संवादाला तडा जाऊ शकतो. आॅफलाइन फार्मसी खरेदीत दरवेळी हा व्यवहार होतोच असे नाही. पण त्याचा हट्ट रुग्ण व नातेवाइकांनी धरायला हवा. आजच्या डिजिटल युगात आॅनलाइन फार्मसी नकोच असे म्हणून चालणार नाही. पण त्यातील अनागोंदीही खपवून घेणे जीवावर बेतेल. आॅनलाइन फार्मसी खरेदी करताना आपण किराणा किंवा मोबाइल अशा तत्सम चैनीच्या वस्तू नव्हे तर आपल्या जगण्या-मरण्याशी थेट संबंधित काहीतरी खरेदी करतोय हे भान प्रत्येकाने ठेवावे.

- डॉ. अमोल अन्नदाते । वैद्यकीय क्षेत्राचे अभ्यासक