शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

इतका बदल कशामुळे? वर्षभरापूर्वी भाजपसोबत गेलेले अजित पवार आता भाजपलाच अंगावर का घेताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:59 IST

अजितदादांनी बरेच महिने मौन बाळगले होते; पण विधिमंडळ अधिवेशनात वेगळेच दादा जाणवले. सरकारवरची प्रत्येक टीका ते अंगावर घेताना जाणवले.

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने पहाटेचा शपथविधी केला होता. मोठ्या साहेबांनी डाव उलटवला. महाविकास आघाडीचं सरकार आलं. अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री झाले; पण बरेच महिने त्यांनी एक गूढ मौन बाळगलं होतं. राज्य सरकारसाठी अडचणीचा विषय असला तरी ते बोलण्याचं टाळत. आपलं काम भलं की आपण भलं असं सुरू होतं; पण विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात वेगळेच दादा जाणवले. सरकारवर होणारी प्रत्येक टीका ते अंगावर घेताना दिसले. सभागृहातही आणि सभागृहाबाहेरही. ‘बदले बदले से नजर आते हैं अजितदादा’ असं नक्कीच म्हणता येईल. एका पहाटे भाजपबरोबर गेलेल्या अजितदादांनी, परवा विधानसभेत भाजपलाच सुनावलं की, येत्या चार महिन्यांत आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील ते तुम्हाला कळणारही नाही. हा मोठा बदल आहे. अजितदादांचं काही वेगळं तर चाललं नाही ना याची चाचपणी अधूनमधून होतच असेल. अदृश्य हातांचे सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्यावर असतीलच. अशी चाचपणी करणाऱ्यांचं टेन्शनही त्यांनी कमी केलं.  फडणवीस हे दादांचा वीकपॉइंट, पण यावेळी त्यांनी फडणवीसांनाही सोडलं नाही. बदललेली परिस्थिती त्यांनी स्वीकारलेली दिसते. आता चमत्कार होण्याची शक्यता नाही वा त्यांची इच्छा किंवा क्षमता नाही म्हणून की काय सरकारचा आक्रमक चेहरा बनण्याचा त्यांचा मानस दिसतो. दादा आक्रमक झाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील भार तर हलका होईलच; पण सरकार मजबूत व्हायलाही मदत होईल.  भूकंपाचा एक केंद्रबिंदू असतो, दादा आतापर्यंत तसेच वाटत होते; पण आता ते नव्या मोडमध्ये गेले आहेत. त्यांचा नवीन पवित्रा पाहून वर्षभरापूर्वी फडणवीसांसोबत शपथ घेणारे हेच का ते दादा, असा प्रश्न पडला. एक शेर आठवला, ‘कुछ बदले बदले से उनके तेवर नजर आ रहे हैं, वह भूल गए हैं, या...! भुलाने की कोशिश किए जा रहे हैं!’ 

फडणवीस-मुनगंटीवार गट्टी! देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनंगटीवार यांची गट्टी झालेली दिसते. म्हणजे आधी कट्टी वगैरे नव्हती; पण दोघे अगदी धरम-वीरची जोडीही नव्हते. दोन दिवसांच्या अधिवेशनात दोघांचं गणित जमल्याचं दिसलं. पुरवणी मागण्यांवरील भाषणाला सुरुवात सुधीरभाऊंनी केली. दोघांनी तेंडुलकर-सेहवागसारखी बॅटिंग  केली.  सत्ता पक्षावर तुटून पडले. दोघांचं काहीतरी ठरलंय वाटतं. सोबत किल्ला लढवला तर दोघांचाही फायदा आहे हे दोघांना कळलेलं दिसतं. नागपुरात गडकरी-फडणवीस असे गट असल्याचे चित्र अधिक गडद होत असताना गडकरींचे निकटवर्ती असलेल्या सुधीरभाऊंचं ट्युनिंग फडणवीसांशी जुळत असेल तर तो पक्षाला मोठा दिलासा आहे. 
साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना पॅकेज देण्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यंतरी साखर कारखानदारांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत अमित शहांना भेटले होते. त्याचा फायदा झाला. ३५०० कोटींची मदत मिळाली. राज्यातील साखर कारखान्यांना जवळपास सोळाशे कोटी रुपये मिळतील. भाजपसोबत असलेल्या साखर कारखानदारांना राज्यात सत्ता नसतानाही सांभाळून ठेवण्यासाठी ही मदत म्हणजे टॉनिक आहे. भाजपमध्ये राहूनही साखर कारखानदारीचे प्रश्न सुटू शकतात हा विश्वास फडणवीस यांनी या निमित्तानं दिला.मेट्रोचं कारशेड आरेमध्येच व्हावं असा फडणवीसांचा आग्रह होता. मुख्यमंत्री ठाकरेंनी ते कांजूरमार्गला हलविलं, पण उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं सरकारला दणका बसला, फडणवीस जिंकले. ते काहीही असो मुंबईचा विकास हरता/थांबता कामा नये. आम्ही म्हणतो तिथे तुम्ही कारशेड होऊ देत नसाल तर तुमच्या बुलेट ट्रेनच्या छातीवर आम्ही कारशेड आणतो ही विकास थांबविण्याची स्पर्धा बरी नाही.मुख्य सचिवपदी कोण?राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार फेब्रुवारीत निवृत्त होत आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे हे नवे मुख्य सचिव असतील असे म्हटले जाते. सध्या युनोमध्ये जबाबदारी सांभाळत असलेले प्रवीणसिंह परदेशी हेही या पदासाठी इच्छुक आहेत म्हणतात. ख्रिसमसनंतर जवळपास वीस दिवस ते मुंबईत आहेत. लॉबिंग होईल असे दिसते. संजय कुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. ते महारेराचे प्रमुख म्हणून जाऊ शकतात. अर्थात तेथे आर.ए. राजीव त्यांचे स्पर्धक असतील. एमएमआरडीएचे आयुक्त असलेले राजीव हेही फेब्रुवारीत निवृत्त होताहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता सेंट्रल इलेक्ट्रीसिटी कमिशनचे चेअरमन म्हणून दिल्लीत जाताहेत अशीही जोरदार चर्चा आहे, पण मुख्यमंत्री त्यांना सोडतील असं वाटत नाही.माहिती आयुक्त कधी मिळतील?राज्यात माहिती अधिकाराची द्वितीय सुनावणीची ५१ हजार प्रकरणे आणि ८ हजार तक्रारी विविध माहिती आयुक्त कार्यालयांमध्ये सध्या प्रलंबित आहेत. माहिती अधिकाराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतची उदासीनता त्यातून दिसते. माहिती आयुक्तांची तीन पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत ती भरण्यासाठी सर्च कमिटीने तीन महिन्यांपूर्वीच शासनाकडे डझनभर नावे पाठविली. त्यातून तिघांची निवड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते या तिघांच्या उच्चाधिकार समितीला करायची आहे; पण त्याचा मुहूर्त अद्याप सापडत नाही. माहिती आयुक्त कधी नेमणार यासाठीच माहिती अधिकार वापरण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल! काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे बदल होऊ शकतात. मुंबई काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवा चेहरा दिला जाऊ शकतो. एका बड्या नेत्यानं परवा छातीठोकपणे सांगितलं की, काँग्रेसच्या दोन-तीन मंत्र्यांची खाती बदलली जातील. काँग्रेसमध्ये तडकाफडकी काही होत नसतं; पण, कुछ तो पक रहा हैं. सहज सुचलं : एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरनं फिरणाऱ्या मंत्र्यांची सध्या फार चर्चा आहे. या चर्चेमुळे वादळ निर्माण होण्याआधी अशा हवाईसफारीचा मोह कुटुंबासह आवरलेला बरा. आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्याच खात्याशी संबंधित कंपनीचे हेलिकॉप्टर वापरले तर ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा मुद्दा होईल हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार