शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

मराठी भाषकांनो, सावध राहा... आणि पुढल्या हाका ऐका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 09:05 IST

आपण बुद्धिमान ‘एआय’च्या काळात राहतो. यापुढे ज्ञानाला आणि माहितीला प्रचंड महत्त्व असेल. ते ज्या भाषेत सहज उपलब्ध असेल, ती भाषा आणखी विकास पावेल.

- प्रणव सखदेव, लेखक

मराठी भाषा खरंच वाहती आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं तसं गुंतागुंतीचं आहे. ते ‘हो’ किंवा ‘नाही’ असं ‘बायनरी’ नाही; पण मराठी भाषेच्या संदर्भात मी काम करत असलेल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्यांचा  ऊहापोह आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या  निमित्ताने येथे करावासा वाटतो -

१. आज आणि त्याआधीही मराठीमध्ये ललित साहित्याला (फिक्शन) अतोनात महत्त्व देण्यात आलं. (मी स्वतः फिक्शन लिहीत असूनही हे म्हणतो!) आजही मराठी भाषा संवर्धनाबाबतचे किंवा मराठी भाषेबद्दलचे कार्यक्रम पाहिले तर त्यात लेखकांच्या मुलाखती किंवा अभिवाचनं अशा स्वरूपाचे उपक्रम असतात. अर्थात असे कार्यक्रम होणं चांगलंच, पण प्रत्यक्ष भाषेबद्दल चिंतन करणारे, काम करणारे भाषातज्ज्ञ, भाषा संशोधक यांना मात्र परिघाबाहेर ठेवलं जातं. त्यांच्याकडे काहीशा तुच्छतेने पाहिलं जातं किंवा ‘कॉपी-पेस्ट लेखक’ म्हणून हेटाळणी केली जाते. असं का? कारण ज्ञान, माहिती आपल्याला कमी महत्त्वाची वाटते; पण आजच्या युगात या दोन्ही गोष्टी कळीच्या आहेत आणि ज्यांच्याकडे त्या असतील तो समाज पुढे जाणार आहे, हे नीट ध्यानात घेऊन कथा-कादंबरी लिहिणाऱ्या लेखकांइतकंच महत्त्व या लेखक-संशोधक-तज्ज्ञांना दिलं पाहिजे. त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, साहित्य अकादमीसारखा एखादा प्रतिष्ठेचा पुरस्कार मराठीत नॉनफिक्शन लिहिणाऱ्या लेखकाला मिळालाय, असं  या ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात का घडू नये? 

२. आज मराठी प्रकाशन क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, वैद्यकशास्त्र, व्यवसाय मार्गदर्शन, अर्थशास्त्र, व्यवस्थापन यांसारख्या अनेकानेक विषयांची उत्तमोत्तम पुस्तकं भाषांतरित होत आहेत; पण असं असूनही या भाषांतरांना आणि भाषांतरकारांनाही प्रतिष्ठा मिळत नाही. उदा. सेपियन्स आणि होमो देअस ही अत्यंत महत्त्वाची पुस्तकं मराठीत भाषांतरित झाली; पण या पुस्तकांची आणि त्यांच्या भाषांतरकारांची योग्य अशी दखल घेतली गेली का? त्यांना प्रतिष्ठित पारितोषिकं का मिळाली नाहीत? की कथा-कादंबरीचं भाषांतर हेच तितकं महत्त्वाचं असतं असा इथेही समज आहे? दुसरं, आज मराठीत व्यावसायिक भाषांतरकार म्हणून अनेक जण काम करत आहेत. म्हणजे जर ही एक छोटी अर्थव्यवस्था निर्माण होत असेल, तर मराठी अर्थार्जनाची भाषा होऊ शकते, हे सिद्ध होत नाही का? अगदी साधं उदाहरण, इंग्रजी भाषा एवढी समृद्ध होण्याचं कारण काय? तर या भाषेत जगभरातल्या भाषांमधलं साहित्य भाषांतरित केलं गेलं! 

३. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा- बालसाहित्याला असलेलं सर्वस्तरीय गौण स्थान. खरंतर बाल किंवा कुमार साहित्याकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण हे साहित्य वाचणारी मुलं पुढे मराठी वाचणार आहेत, बोलणार आहेत आणि पुढे इतर क्षेत्रांत व्यवसाय-नोकरीधंदा करणार आहे. आज एका टचवर मुलांना एवढी अद्ययावत माहिती उपलब्ध असताना मराठीत काय प्रकारचं बाल-कुमार साहित्य निर्माण होतं आहे? फिक्शन आणि नॉनफिक्शन  दोन्ही? चिकित्सा केली की हतबल व्हायला होतं. असं का? कारण बालसाहित्य म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं, उरलं-सुरलं लेखन असा समज. बरं, मराठीतून निघणारी लहान मुलांसाठीची मासिकं किती? दोन किंवा तीन. बालसाहित्याकडे गंभीरपणे पाहणारे लेखक? दोन-अडीच फारतर आणि असेच गंभीर प्रकाशक? एक किंवा ताणायचंच तर दोन! साहित्यिक कार्यक्रमांत, उपक्रमांत मुलांसाठी लिहिणाऱ्यांना किती जागा मिळते? जवळजवळ शून्य! 

शेवटी एवढंच की, आज आपण बुद्धिमान ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)च्या काळात राहतो आहोत. इथून पुढे ज्ञानाला आणि माहितीला प्रचंड महत्त्व असेल आणि ते ज्या भाषेत सहज उपलब्ध असेल, ती भाषा आणखी विकास पावेल. तेव्हा सावध ऐका, पुढल्या हाका...sakhadeopranav@gmail.com

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिन