शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

Maharashtra Lok Sabha election results 2024: प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’!

By नंदकिशोर पाटील | Updated: June 5, 2024 10:32 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: मविआसोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा आंबेडकरांचा निर्णय परिवर्तनवादी मतदारांनीच नाकारला... का?

 - नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, छ. संभाजीनगर)

उत्तम संघटन कौशल्य, वक्तृत्व, नेतृत्व आणि लोकप्रियता आदी अनेक राजकीय गुणविशेष असून देखील केवळ अनाकलनीय राजकीय भूमिकांमुळे  ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी साफ नाकारले.  ‘वंचित’ने ३५ उमेदवार उभे केले, शिवाय, कोल्हापूर, नागपूर, बारामती आणि सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

नीलेश सांबरे आणि स्वत:  आंबेडकर वगळता वंचितच्या एकाही उमेदवाराला दोन लाखाच्या वर मते मिळू नयेत याचा अर्थ, वंचितने घेतलेली ‘एकला चलो रे’ची भूमिका परिवर्तनवादी मतदारांना आवडलेली दिसत नाही.  . पाचेक जागा देण्याची  मविआच्या नेत्यांची ऑफर नाकारून  आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. ते मविआ सोबत असते, तर कदाचित ते स्वत: आणि आणखी एक-दोन तरी खासदार वंचितचे राहिले असते.

महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण असल्याचे संकेत असताना ही राजकीय संधी आंबेडकरांना साधता आली असती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वंचितच्या मतांचा टक्काही घसरला आहे. २०१९ मध्ये वंचितला ७ टक्के मते मिळाली होती. नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला या जागांवर लाखांहून अधिक मते होती. त्यामुळेच या जागांवरील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. मात्र, वंचितचा हा मत टक्का नंतरच्या विधानसभा आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहिला नाही.  

त्यांनी मविआसोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय का घेतला, हे  न उलगडलेले कोडे आहे. वंचितच्या उमेदवारामुळे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि विशेषत: आंबेडकरी मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच होण्याची दाट शक्यता होती. मात्र, परिवर्तनवादी मतदारांनी ‘वंचित’च्या मागे न जाता मविआला पाठिंबा दिल्यानेे महाराष्ट्रात वेगळे चित्र समोर आले. ॲड. प्रकाश आंबेडकरांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावणारा हा निकाल आहे.   

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर