शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

महाराष्ट्र बेकीकरण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:35 PM

मराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता.

- संदीप प्रधानमराठी माणसाला घोड्यांची रेस, शेअर बाजार, मटका वगैरेंमध्ये फारशी गती नसते, असा समज होता. (अर्थात, आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये गती असल्याचा मराठी माणसाचा समज असतो, हा भाग अलाहिदा) मात्र, राजकारणात मराठी माणसाला १०० टक्के गती असते, असा ठाम समज होता. मात्र, कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र बेकीकरण समितीने (निक्कालाकरिता सीमा भागातील मंडळींमध्ये दुहीच्या विचाराबाबत जे एकीकरण दिसले, त्यामुळे हे नामकरण) आपल्या हाताने पायावर पाडलेला धोंडा पाहिल्यावर मराठी माणसाला राजकारणात तरी धड गती आहे किंवा कसे, हेच समजेनासे झाले आहे. कर्नाटकातील २२४ जागांपैकी सीमावर्ती बेळगावात १८ जागा व त्यापैकी जेमतेम १० जागांवर या बेकीकरणवाल्यांचा वरचष्मा. मागील निवडणुकीत जेमतेम दोन जागांवर विजय मिळवलेला. मात्र, यंदा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच एकीकरणावर विस्तव ठेवून मरहट्ट्यांनी खेकड्यांचे नांगे परस्परांविरुद्ध परजले. सीमावासीयांचे आधारस्तंभ असलेले उद्धव ठाकरे हे जपानमध्ये बुलेट ट्रेन याचि देही, याचि डोळा पाहण्याकरिता गेले असताना शरद पवार बेळगावी पोहोचले. त्यांनी नांग्या नाचवणाऱ्या बेकीकरांना ‘एकत्र राहा’, असा संदेश दिला. (पवार वरकरणी देत असलेल्या संदेशाच्या विपरीत घडते, हा निव्वळ योगायोग असतो) त्यानंतर, नितीनभाऊ गडकरी तेथे दाखल झाले. बेळगावी कुंद्याचा भलामोठा घास अलगद तोंडात टाकून त्यांनी भरभर आकड्यांचा खेळ सुरू केला. एक तासात पाच किलोमीटर रस्ता, एकही रुपया न टाकता सीमावर्ती भागात अमूक लाख कोटी रुपयांची विकासकामे, शाळा, महाविद्यालये, विमानतळ, पंचतारांकित हॉटेल वगैरे वगैरे... मराठी माणसाचे डोळे पांढरे पडले आणि जीभ हातभर लांब लोंबू लागली. (येल्लूरच्या महाराष्ट्र स्कूलला नावात महाराष्ट्र असल्याने कर्नाटक सरकारचे अनुदान मिळाले नाही व एमएच स्कूल असे नामकरण केल्यावर मिळाले, या वास्तव्याचा चक्क आकड्यांच्या महापुरात विसर पडला) त्यामुळे मराठी मतांचे आपणच ‘ठाकूर’ असल्याचा दावा करणाºयांना भाजपात आशेचा ‘किरण’ दिसला, तर सीमावर्ती पाटलांनी ‘मराठा तितुका मेळवावा’, या पवारांच्या आवाहनाला साद घातली. मग, सुरू झाले परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांचे घमासान. सीमावर्ती मराठी बेकीकरण समितीच्या सदस्यांच्या वाकफैरी पाहत साहित्य संमेलनातील अखंड महाराष्ट्राच्या ठरावांनी वारा घेत सुस्कारे सोडत होता. यंदा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याचा विचार करत होता. अखेरीस, मतदानाच्या दिवशी बेकीकरणवाल्यांना खड्यासारखं बाजूला सारून त्यानं चक्क राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना मतं दिली. आता कन्नडिगांची नाराजी पत्करून कुठला राष्ट्रीय पक्ष सीमावर्ती भागातील मंडळींच्या बाजूनं उभा राहणार आहे? दहा वर्षांपूर्वी बेकीनं एकीकरणवाल्यांच्या पदरात टाकलेला भोपळा पुन्हा पडल्यानं कन्नड रक्षण वेदिकेच्या मंडळींना हर्षवायू व्हायचा तेवढे बाकी आहे. यापुढं साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करून शिळ्या कढीला ऊत आणायला नको किंवा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेखाची औपचारिकता तरी कशाला हवी?