शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

By यदू जोशी | Updated: November 1, 2024 07:19 IST

Maharashtra Assembly Election 2024 :आपल्यासोबत असलेल्या शिंदेसेना या मित्राला प्रसंगी नाराज केले तरी चालेल; पण ‘राज’हित महत्त्वाचे असे भाजपला का वाटते?

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

भूमिकांमध्ये सातत्याने बदल करतात, असा आरोप ज्यांच्यावर होत आला आहे, त्या राज ठाकरेंबाबत आता भाजप एकाचवेळी दोन भूमिका घेताना दिसत आहे. राज यांची मनसे महायुतीविरुद्ध जागोजागी लढत आहे, तरीही त्यांचे पुत्र अमित यांना पाठिंबा देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. अमित यांची विधानसभेतील एन्ट्री सोपी करण्यासाठी भाजप धावून आला आहे. आपल्यासोबत असलेल्या शिंदेसेना या मित्राला प्रसंगी नाराज केले तरी चालेल, पण ‘राज’हित महत्त्वाचे असे भाजपला का वाटते? 

भाजप ‘मातोश्री’तील ठाकरेंविरुद्ध ‘शिवतीर्था’वरील ठाकरे असा सामना लावत आहे. शिंदे सोबत आहेतच, पण ठाकरे या आडनावाचे वलय ‘मातोश्री’त किंवा ‘शिवतीर्था’वरच! आता ‘मातोश्री’शी पुन्हा लगेच जुळेल, जमेल याची शक्यता दिसत नाही. मुंबई आणि आसपासच्या आताच्या आणि पुढच्या राजकारणासाठी शेवटी एक ठाकरे लागतीलच ना? म्हणूनच भाजप अमित यांना मांडीवर बसवत आहे. राज यांचे मुंबई, ठाणे, नाशिकच्या पट्ट्यातील  उमेदवार उद्धवसेनेची मते खातील अन् त्याचवेळी राज हे मुलाच्या उमेदवारीला मिळालेल्या पाठिंब्याच्या निमित्ताने भाजपसोबत असल्याचाही मेसेज दिला जाईल, अशी ही दुहेरी खेळी आहे.  

शिंदेसेनेचे सदा सरवणकर काय करतील? - अंदाज असा आहे की ते माघार घेतील. त्यांच्या माघारीसाठी शिंदेंवर महाशक्तीचाही दबाव आहे म्हणतात. या माघारीचा फायदा अर्थातच अमित ठाकरे यांना होईल.  विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि तो आमच्या साथीने होईल, असे विधान करून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना अस्वस्थ केले असणार. राज यांना जवळ करून पुढचे राजकारण भाजपकेंद्रित करण्याचे प्रयत्न होत आहेत. ही निवडणूक केवळ विरोधकांचा सामना करण्याचीच नाही, आपल्यांना कंट्रोल करण्याचीदेखील आहे. 

महाराष्ट्र पॉलिटिकल लीगइंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर आपल्याकडे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र पॉलिटिकल लीग (एमपीएल) सुरू आहे. एका मोसमात एका टीममध्ये असलेले प्लेअर्स दुसऱ्या मोसमात भलत्याच टीमसोबत खेळतात, नेत्यांचेही तेच चालले आहे. ट्वेंटी-ट्वेंटीच्या क्रिकेटमध्ये नजाकत नसते, आडदांडपणा असतो, महाराष्ट्रात तेच होत आहे. कसेही आडाबल्ला मारा, पण सिक्सर ठोका, असे चालले आहे. परवा गावाहून मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘भाऊ! काय राजकारण सुरू आहे हो! काहीच नाही समजत, कोणते वासरू कोणत्या गाईचे दूध पिते तेच कळून नाही राह्यलं.’ 

लोकसभेला लढायचे तर सहा मतदारसंघांत प्रभाव लागतो. विधानसभेला बंडखोरी त्या मानाने सोपी असते. नवश्रीमंत नेत्यांची एक फळी उभी झाली आहे. पायाभूत सुविधांचा विकास, त्याला जोडून फोफावलेला रिअल इस्टेटचा धंदा, कंत्राटदारधार्जिण्या विकासकामांमुळे आलेला पैसा असे एक बटबटीत अर्थकारण महाराष्ट्रात उभे राहिले आहे, त्याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीत उमटले आहे. पैसा तर कमावला; आता राजकीय ताकद दाखवली पाहिजे या महत्त्वाकांक्षेतून जो- तो आमदार होऊ पाहत आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे केवळ भाजपचा कार्यकर्ताच अस्वस्थ नाही तर नेतेही अस्वस्थ आहेत, शिंदेसेना दबाव टाकून जागा आपल्याकडे ओढून घेत असल्यानेही भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे, ती बंडखोरीतून दिसते आहे. 

‘आली आली नवी निवडणूक पेरा पैका, मते आपसुकमतचिठ्ठ्यांचे गळ्यात हार, झांजी बार, झांजी बार, झांजी बार ’ अशी कविता ग. दि. माडगूळकरांनी सहा दशकांपूर्वी लिहिली होती, ती आजही जशीच्या तशी लागू आहे. 

एकमेकांना सांभाळून घेणेपरवा एक मित्र विचारत होता की, ‘भाऊ, तुम्हाला आतले माहिती असते, मग सांगा बरं,  वरवर एकमेकांशी दुश्मनी दाखवणारे नेते आतून एक असतात का?’ -  मित्राच्या या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे आणि ‘नाही’ असे देखील! विधानसभेच्या निवडणुकीत जे सर्वपक्षीय तिकीट वाटप झाले आहे, त्यावर नजर टाकली तर जाहीररित्या एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या नेत्यांनी कुठेतरी एकमेकांनी सांभाळून तर घेतले नाही ना? अशी शंका येते. अमरावतीतला एक मतदारसंघ आहे तिथे भाजपसमर्थित एका तगड्या उमेदवारासमोर त्या मतदारसंघातील एका महिला नेत्याला उभे केले असते तर ते मोठे आव्हान ठरले असते. पण त्या महिलेला तिकीट न देता भलत्यालाच दिले गेले. वाशिम जिल्ह्यातला एक मतदारसंघ असा आहे की, तिथे शरद पवार गटाने भाजपमधून आलेल्या एका तरुणाला उमेदवारी देताच पक्षाची सूत्रे स्वत:कडे ठेवण्याची धडपड करणाऱ्या एका बड्या तरुण नेत्याने रातोरात आपल्या जवळच्या व्यक्तीला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवून दिली.

मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातला पण तेथे कहानी मे ट्विस्ट आणण्याचे काम पुण्याच्या ‘मगर’मिठीत झाले. दिग्रसमध्ये संजय राठोडांना निवडणुकीचा पेपर सोपा जावा म्हणून महाविकास आघाडीत आधी कोणी सहकार्य केले होते? मग उमेदवार बदलून माणिकराव ठाकरेंना मैदानात उतरवले आणि पेपर कठीण केला गेला हा भाग वेगळा. कोणाचे काय सेटिंग असेल ते लगेच समजत नाही. पण हळूहळू त्याचे पदर उलगडत जातात.  विविध पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये कुठे ना कुठे, काही ना काही परस्पर अलिखित सामंजस्य करार झाला असल्याची शंका येते आहे. निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरची सत्ता समीकरणे घडतील तेव्हा हा करार नेमका कोणता आणि कोणाकोणामध्ये होता, याचा उलगडा होईलच. २०१९ मध्येही असे घडले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे