शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

नव्या नात्यांचं महाभारत!

By सचिन जवळकोटे | Published: November 30, 2017 12:25 AM

पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला.

पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला. समोरच्या चॅनेलवरील महाभारतात अर्जुनाला कृष्ण उपदेश करत होता. एवढ्यात दुसºया चॅनेलच्या बातम्या महाभारतात घुसल्या.थोरले काका बारामतीकर भाषण करत होते, ‘उद्धव म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा...’ हे ऐकून महाभारतातली पात्रंही गोंधळली. भीष्मानं अर्जुनाला मिठी मारली; मात्र दचकलेल्या अर्जुनानं आपली पाठ चाचपली. सुदैवानं कोठेही खंजिराचा वार आढळला नाही. एवढ्यात ‘न्यूज चॅनेल’वर ‘उठसूट खळ्ळऽऽ खट्याककर’ अन् ‘उठसूट कविताकर’ या दोघांची भेट झाल्याची ब्रेकिंग फिरू लागली. दरम्यान, बारामती ते सातारा वडाप सेवा सुरू केल्याची माहिती थोरल्या बारामतीकरांनी दिली. जाताना साताºयाचे राजे तर येताना फलटणचे राजे, अशा पद्धतीनं सिटांचं बुकिंग केलं. तेव्हा महाभारताच्या चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूला गुरुवर्य द्र्रोणांनी चक्क आपल्या रथात बसविलं. कृष्णानंही आपल्या रथाकडं दुर्योधनाला बोलविलं.हे पाहून महाभारताचं वर्णन करणारा संजयही गडबडला. रोज एका नव्या भूमिकेत शिरणाºया बारामतीकरांची नवी रूपं पाहून धृतराष्ट्रही गोंधळला. सकाळी बाबा महाराज कराडकर यांना चहाला बोलाविणारे बारामतीकर दुपारी देवेंद्र पंत नागपूरकर यांच्यासोबत लंचला बसले. संध्याकाळची टी पार्टी ‘मातोश्री’करांसोबत झाल्यानंतर रात्रीचं डिनर ‘नमो नमो’सोबत कसं करता येईल, याचे आडाखे बांधू लागले. हे पाहून धाकले बारामतीकर खूश झाले.मात्र पुन्हा महाभारताचं चॅनेल सुरू झालं. पुत्रप्रेमानं कासावीस झालेले धृतराष्ट्र आपल्या पुतण्याकडे बघायलाही तयार नव्हते. हे पाहताच मात्र पिंटकरावांची धुंदी पूर्णपणे उतरली. ‘शत्रूला मित्राचा मुलगा’ म्हणणारे बारामतीकर स्वत:च्या पुतण्यावर किती माया करतात, हे पाहण्यासाठी २०१९ पर्यंत आपल्याला टीव्ही सुरू ठेवूनच समोर बसावं लागेल, हे पिंटकरावांच्या लक्षात आलं. (sachin.javalkote@lokmat.com) 

टॅग्स :newsबातम्या