शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 10:18 AM

उदारमतवादी विचाराने आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते.

- दत्ता दामोदर नायक

उदारमतवादी विचाराने (ज्याला इंग्रजीत Liberal thought असे म्हटले जाते) आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते. अशावेळी उदारमतवादी विचारसरणी म्हणजे नेमके काय याचा ऊहापोह करणे गरजेचे ठरते.

उदारमतवादी विचारसरणी स्वातंत्र्य हे सर्वोच्च मानवी मूल्य मानते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक जीवनात हवे ते निर्णय घेण्याचे निर्णय स्वातंत्र्य, नागरी जीवनातले नागरी स्वातंत्र्य, राजकीय जीवनातले राजकीय स्वातंत्र्य, सांस्कृतिक जीवनातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला उदारमतवादी विचार प्राधान्य देतो. याचमुळे राजकारणात हुकूमशाही, फॅसिस्ट राजवटीचा उदारमतवादी विचारसरणी तिरस्कार करते आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या लोकशाही राजवटीचे स्वागत करते. स्वातंत्र्याखालोखाल मानवी हक्क (human rights) आणि मानवी प्रतिष्ठा ((human dignity) ही मूल्ये उदारमतवादाला महत्त्वाची वाटतात.

समता हे मूल्य मानवांना उदारमतवाद, त्यात दर्जाची समता (equality of status) आणि संधीची समता (equality of opportunity) यांचा समावेश करते. विषम समाजाला संधीची समता उपलब्ध करण्यासाठी शिक्षणात आणि रोजगारात आरक्षणाचे तत्त्व उदारमतवादाने पुरस्कृत केलेले आहे. अमेरिकेत त्याला  Affirmative action असे म्हणतात.

उदारमतवादी तत्त्वज्ञान समाजातल्या कोणत्याही प्रतिगामी, मूलतत्त्ववादी (fundamentalist), जातीयवादी, अंधश्रद्धा, धर्मवादी विचारांच्या विरोधात असते. या तत्त्वज्ञानाचा पाया विज्ञाननिष्ठ, विवेकी व शास्त्रशुद्ध असतो. तो पुरोगामी व प्रगमनशील असतो. भूतकाळाच्या स्मृतिरंजनात हे तत्त्वज्ञान अडकून पडत नाही, त्याची दृष्टी मानवी समाजाच्या भविष्यकालीन क्षितिजाचा वेध घेते.उदारमतवादी विचार सरकारी हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या अति डाव्या आणि सरकारी हस्तक्षेपाला गैर मानणाऱ्या अति उजव्या अशा दोन्ही टोकांच्या आर्थिक तत्त्वज्ञानापासून दूर राहाते. अर्थव्यवस्थेत सरकारने कमीतकमी हस्तक्षेप करावा असे उदारमतवादी तत्त्वज्ञानाला वाटते.

उदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाला नागरिकांच्या खासगी मालमत्तेचा हक्क अबाधित राहावा असे वाटते. ग्राहकाला बाजारात निवडीचे स्वातंत्र्य असावे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंवर अवास्तव सरकारी बंधने व कर असू नयेत.

आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्र्न हे हिंसेतून, युद्धांतून किंवा क्रांतीतून सोडविले जाऊ नयेत तर ते संवादांतून, चर्चेतून, सुधारणांतून, प्रागतिक कायद्यांतून व प्रबोधनांतून सोडविले जावेत, असे उदारमतवादाला वाटते. उदारमतवाद व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य करतो. पण धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला मान्य नाही. त्या दृष्टीने उदारमतवादी तत्त्वज्ञान ईहवादी (सेम्पलर) आहे.धर्मावर आधारलेले राजकारण जसे उदारमतवादी विचाराला पसंत नाही तसेच जात, पंथ, भाषा, अस्मिता या भावनिक प्रश्र्नावर राजकारण केले जाऊ नये असे उदारमतवादाला वाटते. राजकीय पथांनी विशेषत: निवडणुकांत प्रामुख्याने आर्थिक प्रश्र्नच हाताळले पाहिजेत, असे उदारमतवादी विचार मानतो.

एखाद्या देशात, प्रदेशात किंवा आस्थापनात कणखर नेतृत्व असले म्हणून त्या देशाची किंवा आस्थापनाची प्रगती होत नाही. त्या देशातील नागरिक किंवा त्या आस्थापनातील कर्मचारी किती कार्यक्षम आहेत त्यावर त्या देशाचे भवितव्य अधिक अवलंबून असते, असे उदारमतवाद मानतो.

उदारमतवादी विचार प्रागतिक करप्रणालीचा पुरस्कार करतो. उदाहरणार्थ जमिनीवर कर असावेत असे त्याला वाटते. म्हणजे जमिनी विकसित होतील. भूखंडावर घरे बांधली जातील. घरांची समस्या कमी होईल याचप्रमाणे वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर व मालमत्तेवर कर (इस्टेट ड्युटी) असावा, असे उदारमतवादाला वाटते.

मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता, उद्योजकता, सामूहिक पुरुषार्थ यांच्या बळावर जागतिक प्रश्र्न सोडविणे कठीण नाही असा आशावाद उदारमतवादी विचार जोपासतो. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका