घुमानचे सूर घुमू दे.!
By Admin | Updated: November 15, 2014 00:47 IST2014-11-15T00:47:04+5:302014-11-15T00:47:04+5:30
पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे.

घुमानचे सूर घुमू दे.!
पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्याच्या बटाला तालुक्यातील घुमान या जेमतेम 2क् हजार लोकवस्तीच्या तीर्थक्षेत्री एप्रिल महिन्यात होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. राजकारणापल्याड असलेल्या माणसाला फारशी किंमत न देणा:या नवी दिल्लीत घडलेला पुढचा प्रसंग मात्र अपवाद ठरणाराच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांच्या दालनात त्यांच्या भेटीसाठी या संमेलनाचे निमंत्रक व सरहद या संस्थेचे प्रमुख संजय नहार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी हे दोघे उभे होते. त्यांच्या हाती संमेलनाची काही कागदपत्रे आणि ‘नामदेव बाणी’ही सीडी होती. हरसीमरत आल्या आणि सीडीवरील नामदेवांचे चित्र पाहताच त्यांनी सीडीला अभिवादन केले नि मागचापुढचा कोणताही विचार न करता त्यांनी गिरीश गांधी यांना चरणस्पर्श केला.!! हरसीमरत कौर म्हणाल्या, की आपण नामदेवांच्या जन्मभूमीतून आलेला आहात, आमचा माथा म्हणून झुकतो. नामदेवांच्या सर्व रचना आम्हाला प्रात:स्मरणीय आहेत. आमच्या घरी नियमित त्या ऐकल्या जातात. त्यांनी काही ओळी म्हणून दाखवल्या.. प्रसंग काही मिनिटांचाच पण या आपुलकीने क्षणभरात महाराष्ट्र ते पंजाब यातील अंतर कमी झाले. नामाचा हो टाहो.!! नामदेवांच्या आठ रचनांची सीडी त्यांना नहार यांनी भेट दिली. संमेलनाबद्दल सांगितले. संमेलनाची पद्धत, परंपरा, महाराष्ट्र बाहेर झालेली संमेलने आणि घुमानचे महत्त्वही सांगितले.
आता घुमानबद्दल कमालीची आस्था असलेले संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला व संतोषसिंग मोखा यांच्या संकल्पनेतून ‘नामदेव बाणी’ही सीडी तयार झाली. यापूर्वी कोणत्याही साहित्य संमेलनाआधी वातावरण निर्मिती करणारी अशी सीडी निघाली नव्हती. शिखांच्या साहित्यात नामदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे प्रकटीकरण या संमेलनातून होऊ शकते. मराठी प्रकाशकांनी घुमानमध्ये पुस्तकविक्री होणार नाही, म्हणून मक्षिकापात केला असला तरी परिस्थिती तशी नसेल. 2क् हजार लोक येतील असा अंदाज आहे. नागपूर, पुणो व मुंबईतून सवलतीच्या दरात विमानसेवा आणि दोन रेल्वेगाडय़ा या ठिकाणांवरून सुटणार आहेत. स्वातंत्र्यकाळात लाल-बाल-पाल तसेच भगतसिंग- राजगुरू हा पंजाब-महाराष्ट्र असा संबंध जोडला गेला. तुटणा:या धाग्यांचीच भरमार असताना जुळणारे धागे घुमानच्या निमित्ताने विणले जातील.
ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर संत नामदेवांनी महाराष्ट्र सोडला. आधी दक्षिणोची आणि नंतर उत्तरेची यात्र केली. काशी, पुष्कर, हरिद्वारला असताना त्यांना दिल्लीच्या बादशाहाने कैद करून दरबारात नेले. तेथून नामदेवमहाराज पंजाबातील भूतविंडमध्ये आले. कीर्तन, भजनाच्या माध्यमातून अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, व्यसने आणि चालीरीती, अवडंबराच्या विरुद्ध प्रबोधन केले. पंजाबात नहरांच्या (पाण्याचे पाट) आसपास ते कीर्तन-भजन करत. त्यांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. प्रवचने व कीर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसनांविषयी लोकांचे प्रबोधन केले. भिट्टवालंमधील दुष्काळ घालवण्यासाठी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केले आणि दुष्काळ संपला. भिट्टवाल आणि आसपासच्या सखोवाल, धारिवाल या गावांमध्ये नामदेवांना मानणा:यांची संख्या वाढू लागली. शेवटची काही वर्षे ते भिट्टवालच्या शेजारीच असलेल्या जंगलात राहण्यासाठी गेले. जंगलाचं रूपांतर एका गावात झालं. त्याचं नाव घुमान. घुमानजवळ ते जिथे तप करीत, तिथे आता तिपयाना साहीब गुरुद्वारा आहे, तर जिथे त्यांनी समाधी घेतली असे शीख बांधव समजतात, तिथे मुख्य गुरुद्वारा आहे. नामदेवांच्या नावाचे असे पाच गुरुद्वारे आहेत. ज्याप्रमाणो ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्याचप्रमाणोच नामदेवमहाराजांनीही येथे समाधी घेतल्याचे अनेक दाखले पंजाबात दिले जातात. संशोधन अजूनही जारी आहे. आपण मात्र ते विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्रात परत आले आणि त्यांनी पंढरपूरला पायरीच्या चि:याशी समाधी घेतली, असे मानतो. प्रवाद अनेक आहेत. ते जिथे गेले तिथली बोली स्वीकारली. गुजरातीत लिहिले, खडी बोलीत लिहिले, पंजाबीतही लिहिले. पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच पाकिस्तानातही नामदेवांची मंदिरे आहेत. अशा उत्सवी पाश्र्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी तयार केलेली नामदेवबाणी आता पंजाब, दिल्लीतील बडय़ा नेत्यांकडे पोहोचली आहे. त्यांच्यात संमेलनाबद्दल उत्सुकता आहे. दिल्लीत जिथे मराठी नेते, प्रशासनातील अधिकारी मराठी बोलायला बिचकतात, लाजतात तिथे नामदेवांनी मराठीची पताका उंचावली आहे.
रघुनाथ पांडे
विशेष प्रतिनिधी,
लोकमत समूह, नवी दिल्ली