शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

हॉलीवूडची नजर भारतीय ॲक्टर्स, लोकेशन्सवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा फायदा भारताला होतो आहे. हॉलीवूड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची फिल्म इंडस्ट्री आहे.

भारतीय अभिनेते आणि प्रेक्षकांना कायम हॉलीवूडनं मोहिनी घातली आहे. त्यामुळे हॉलीवूडचे अनेक चित्रपट अमेरिकेसोबतच भारतातही प्रदर्शित होतात आणि त्यांना प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळते. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी  मोठमोठ्या बिग बजेट हिंदी चित्रपटांपेक्षाही जास्त गल्ला जमवला, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय अभिनेत्यांनी हॉलीवूडच्या चित्रपटांत एखादी छोटीशी भूमिका केली तरी लगेच त्यांचं नाव होतं. पण कोरोनाकाळानंतर ही परिस्थिती बरोब्बर उलट होते आहे. हॉलीवूडलाच आता भारताची मोहिनी पडली आहे आणि अलीकडच्या काळात अनेक हॉलीवूडपट भारतात येऊ घातले आहेत. पण या चित्रपटांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातल्या बहुतेक चित्रपटांचं शूटिंगही आता भारतातच होणार आहे. शिवाय अनेक भारतीय कलाकार यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा.. यासारखी अनेक लोकेशन्स हॉलीवूड निर्माता-दिग्दर्शकांच्या मनात भरली असून तिथे आता मोठ्या प्रमाणात हॉलीवूडच्या चित्रपटांचं शूटिंग सुरू होईल. (Hollywood's eye on Indian actors, locations!)कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा फायदा भारताला होतो आहे. हॉलीवूड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची फिल्म इंडस्ट्री आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन अमेरिकेनं सातत्यानं चीनला लक्ष्य केल्यामुळे चिनी लोकांनी हॉलीवूड पटांवर जवळपास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे चीनला पर्याय म्हणून  हॉलीवूडनं आता भारताकडे आपलं लक्ष वळवलं आहे. हॉलीवूडचे निर्माते दिग्दर्शक केवळ भारतात यायलाच उत्सुक आहेत, असं नव्हे, तर भारतीय प्रेक्षक, त्यांची मानसिकता, त्यांची आवड-निवड लक्षात घेऊन कथेतही त्याप्रमाणे बदल करण्याची त्यांची तयारी आहे.क्रिस्टोफर नोलन हा एक इंग्लिश-अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक. गेल्यावर्षी अमेरिकेतील थिएटर्स बंद असल्यामुळे ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन’ हे चित्रपट त्यानं भारतात प्रदर्शित केले होते. त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ‘टेनेट’चं भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन १२.४३ कोटी तर ‘वंडर वुमन’चं कलेक्शन १५.५४ कोटी रुपये होतं. कोरोनाकाळातली ही कमाई खूप मोठी मानली जाते.‘टेनेट’ या चित्रपटातील काही दृष्यांंचं चित्रण मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि ताज महाल पॅलेसमध्ये झालं होतं. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पॅटिनसन, एलिझाबेथ देबिकी, मायकेल केन आणि केनेथ ब्रेनाग यांच्या या चित्रपटांत प्रमुख भूमिका असल्या तरी चित्रपटाला भारतीय टच देण्यासाठी त्यात ‘प्रिया’ नावाच्या एका व्यक्तिरेखेला प्राधान्यानं स्थान दिलं होतं. प्रियाची ही भूमिका डिंपल कपाडियानं केली होती. फिल्मच्या पोस्टरवरही डिंपलच्या नावाला स्थान देण्यात आलं होतं. कोरोना काळात या चित्रपटानं जगभरात प्रचंड गल्ला जमवला.हॉलीवूडच्या चित्रपटांच्या कमाईचा जवळपास ७० टक्के हिस्सा विदेशातला असतो. त्यातील तब्बल ५० टक्के हिस्सा एकट्या चीनचा असतो. १९९१ मध्ये हॉलीवूड चित्रपटांचा चीनमधील कमाईचा हिस्सा ३१ टक्के होता, २०१९ मध्ये चीनकडून आलेल्या कमाईचा वाट्टा तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त होता. कोरोनाकाळात जगभरात सगळेच उद्योग डबघाईला आलेले असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी हॉलीवूडला चीनचाच मोठा आधार होता, ‘एवेंजर्सः एंडगेम’ या एकाच चित्रपटानं चीनमधून मोठी कमाई केली होती. पण हॉलीवूड चित्रपटांकडे चिनी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे हॉलीवूडलाही आता भारताशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बहुभाषी भारतातील विविध भाषांमध्ये हॉलीवूडपटांचं डबिंग करण्यासाठीचं बजेटही दुपटीपेक्षा अधिक केलं आहे. आता अनेक हॉलीवूडपटांचं डबिंग आणि सबटायटल्स भारतीय भाषांत होऊ लागली आहेत.पुढच्या महिन्यात जेम्स बॉण्डचा ‘नो टाइम टू डाय’, मे मध्ये ‘ब्लॅक विडो’, फास्ट एंड फ्यूरियस सीरिजचा ‘एफ नाईन’, जुलैमध्ये टॉम क्रूजचा ‘टॉप गनः मेवेरिक’ याशिवाय ‘मोर्टार कॉम्बॅट’, ‘अ क्वाएट पॅलेसः पार्ट टू’, ‘गॉडजिला वर्सेस कांग’, ‘द कन्ज्यूरिंग’.. इत्यादी अनेक हॉलीवूडपट भारतात येत्या काळात रिलीज होत आहेत. भारतीय चित्रपटांचं वार्षिक बजेट साधारण २७ हजार कोटी रुपयांचं आहे. हॉलीवूडचे प्रमुख निर्माता वॉर्नर ब्रदर्स दरवर्षी साधारण शंभर चित्रपट तयार करतात. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातच चित्रपट निर्मितीची योजना आहे.

हॉलीवूड करतंय बक्कळ कमाई! हॉलीवूडचे चित्रपट दरवर्षी भारतात अधिकाधिक कमाई करताहेत. २०१५ मध्ये हॉलीवूडपटांची बॉक्स ऑफिसच्या कमाईची टक्केवारी होती आठ टक्के, २०१९ मध्ये ती २१ टक्के झाली. २०१८ मध्ये हॉलीवूडनं भारतातून ९२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. २०१९ मध्ये हा आकडा १२२० कोटी रुपयांवर गेला. येत्या दोन वर्षांत हॉलीवूडला भारताकडून अधिक कमाईची अपेक्षा आहे. कमाईचा हा वाटा किमान २५ ते ३० टक्के किंवा १६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल असा जाणकारांचा अंदाज आहे. 

टॅग्स :Hollywoodहॉलिवूडbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा