शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हे रजनीसार, एन्ना नदकरद्दू?

By admin | Updated: January 24, 2015 00:27 IST

स्वत:च्या जीवाची आणि त्याच्याच जोडीला इतरांच्याही जिवांची मनसोक्त करमणूक करुन घेण्याचे आणि करण्याचे आजच्या काळातील सगळ्यात सस्ते साधन म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप.

स्वत:च्या जीवाची आणि त्याच्याच जोडीला इतरांच्याही जिवांची मनसोक्त करमणूक करुन घेण्याचे आणि करण्याचे आजच्या काळातील सगळ्यात सस्ते साधन म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप. अर्थात कोणत्याही प्रकारची करमणूक म्हटली की, तिच्या लक्ष्यस्थानी कोणी तरी असावेच लागते. मग कधी ती आलिया भट असते, कधी अलोकनाथ असतो, कधी करिष्मा तन्ना असते पण हटकून आणि हमखास असतो, तो रजनीकांत! जगाच्या पाठीवर जे काही गूढ, अगम्य, अतर्क्य, असाध्य आणि थोडक्यात चित्तचक्षुचमत्कारिक असेल ते ते सारे म्हणजे रजनी सरांच्या हातचा मळ! रजनीकांत म्हटले की, काहीही खपून जाणार. ‘लार्जर दॅन लाईफ’पेक्षाही काही लार्जेस्ट असेल तर ते म्हणजे रजनीकांत. केवळ दक्षिणी भाषेतील आणि त्यातही तमीळ भाषेतील सर्वाधिक सिनेमांमध्ये काम केले असून वा करीत असून रजनीकांत इतका लोकप्रिय व्हावा, हेही पुन्हा त्याच्या प्रतिमेसमान अतर्क्यच. अर्थात त्यात खरा वाटा दाक्षिणात्य लोकांचाच. जे काही करायचे, ते अत्यंत भडक (बरेचसे बटबटीतही) हा खाक्याच मुळी दक्षिणी. मग तो सिनेमा असो की राजकारण. त्यामुळे सिनेमाची असोत की राजकीय नेत्यांची असोत, पोस्टर्सदेखील गगनाला भिडणारी. त्यातच मग ‘रजनी सार’ म्हटलं की विचारुच नका. सारं काही अचाटच. त्यांच्या सिनेमाचा खर्च अचाट, किंमत अफाट आणि प्रसिद्धी वारेमाप. पण केलेला सारा पैसा वसूल होणार याची साऱ्यांना पक्की खात्री. थोड्या फार आणि खरं तर थोड्याच फरकानं हिन्दी सिनेमासृष्टीत राजेश खन्नाच्या बाबतीतही असंच नव्हतं का? त्याने सिनेमात काम करायचे मान्य करताक्षणी त्या सिनेमाचे सारे हक्क पटापट विकले जायचे. पण कोणाचीही सद्दी अशी सदासर्वकाळ चालत असते थोडीच? राजेश खन्नाची ती संपली आणि तो केविलवाणा बनत गेली. पण अशी वेळ आपल्या रजनीसरांवर कधीच येणार नाही (यावचन्द्र दिवाकरौ वगेरे) याबाबत दक्षिणी लोक आणि विशेषत: तमीळ सिनेमाच्या जगतातील वितरक आणि प्रदर्शक अगदी ठाम. त्यामुळं रजनीकांत यांच्या सर्वात अलीकडच्या ‘लिंगा’ सिनेमाचे हक्कदेखील बदाबदा पैसे ओतून साऱ्यांनी विकत घेतले. एकट्या रजनीकांतने या सिनेमात काम करण्यासाठी तब्बळ चाळीस कोटी रुपये घेतले म्हणतात. जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मेहनताना घेणाऱ्या जॅकी चॅनचा विक्रम रजनीसरांनी मोडला असेही म्हणतात. पण लिंगाने त्याच्या वितरणाशी संबंधित सगळ्यांवाच जबर इंगा दाखवला. निर्माता तर गाळात गेलाच पण वितरक आणि प्रदर्शक यांचे हात तर भयानक पोळले. आता सिनेमा रजनीसरांचा तेव्हां हे संकट आणि त्यावरील उपायदेखील रजनीसरांच्या ष्टाईलमध्येच असायला हवे. त्यामुळे तामीळनाडूच्या सात वितरण केन्द्रांच्या (सर्किट्स) प्रमुखांनी लिंगाच्या निर्मात्याकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच, आमरण उपोषणाचा सोहळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे निम्मानिम नुकसान झाले आहे, त्याची भरपाई झालीच पाहिजे, हा त्यांचा हेका आहे. आजवर असे कधीच आणि कुठेही झालेले नाही. म्हणजे हादेखील खास रजनी इफेक्टच म्हणायचा. वितरक आणि प्रदर्शक यांनी ज्याच्या नावावर पैसे लावले आणि आपले हात भाजून घेतले, त्यानेही आपले नुकसान भरुन काढण्यात हातभार लावावा, असे त्यांचे म्हणणे. पण रजनी सर म्हणतात, माझा काय संबंध? मी फक्त सिनेमात काम केलं. त्याच्या व्यवसायाशी माझा काहीही संबंध नाही. पण रजनीकांतच्या काही निकटवर्तीयांनी मात्र मोठी धमालच उडवून दिली आहे. रजनीसरांचा राजकारण प्रवेश रोखण्यासाठीच म्हणे कुणीतरी हे षडयंत्र रचले आहे. कोण असावेत बरे हे षडयंत्रकारी? राजकारणाचे रजनीकांतला वावडे तसे कधीच नव्हते. चो रामास्वामी यांनी जेव्हां रजनी आणि जयललिता एकत्र आल्या तर विधानसभेच्या साऱ्या जागा जिंकता येथील असे म्हटसे होते, तेव्हां रजनी यांनी प्रत्यक्ष मैदानात न उतरता जयललिता यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. पण जेव्हां जयललिता आणि काँग्रेस यांचे सख्य झाले तेव्हां रजनीकांतने आपले वजन करुणानिधी यांच्या पक्षाच्या पारड्यात टाकले होते. त्यानंतर म्हणजे बरोबर दहा वर्षांपूर्वी, रजनीकांतने जाहीर केले की, व्यक्तिगतरीत्या आपण भाजपालाच मदत करणार. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात नरेन्द्र मोदी वाकडी वाट करुन चेन्नईला जाऊन आले होते हे तर साऱ्यांना ठाऊकच आहे. त्यानंतर स्वत: रजनी नाही तर त्यांच्या बायकोला भाजपात आणण्याची चर्चा सुरु झाली. म्हणजे हेदेखील सारे दक्षिणी सिनेमांना साजेशेच. तेव्हां ‘रजनीसार एन्ना नदकरद्दू’? ये क्या हो रह्या है? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तरीदेखील रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश रोखण्यात कोणाला बरे स्वारस्य? जयललिता जेलातून बाहेर पडल्यानंतर ज्या घरी गेल्या, त्या घरातून म्हणे बाहेरच पडलेल्या नाहीत. अगदी एमजीआरच्या स्मृतीदिनालाही नाही. करुणानिधी आपल्या दोन्ही मुलग्यांच्या झगड्यात अडकून पडले आहेत. मग कोण बरे रजनीसरांच्या वाटेत काटे पेरणारे? पण बरं आहे, नुसत्या नावाचा का होईना मराठी गडी साऱ्या मुंडुधारींना गरगरायला लावतोय, तितक्याच आपल्याला गुदगुल्या!