शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

अतिंद्रिय शास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:03 AM

आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल की, निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतिंद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत.

- डॉ़ मेहरा श्रीखंडेआपल्यापैकी थोड्यांनाच पटेल की, निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतिंद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतिंद्रिय जग हे अंधुक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते. भौतिकशास्त्र व अतिंद्रिय शास्त्र यामधील फरक हा जडत्व व भूत, मर्यादित व अमर्यादित, मानव व ईश्वर यांच्यातील फरकासारखा आहे.आपले भौतिक शरीर ही एक माया आहे. या मायेच्या शरीराखाली जीवनाचा मूळ प्राण आहे. प्राण हा विश्वाचा असून सर्वव्यापक ऊर्जा, जी सर्व प्राणिमात्रात वास्तव्यास आहे, त्याचाच एक भाग आहे.एक पुनर्जन्म हा फक्त त्या आत्म्याच्या पृथ्वीप्रतलातील एक प्रवास आहे. प्रत्येक आत्मा हा अनेक जन्मांतून फिरत असतो. या साखळीतूनच तो स्वत:ची प्रगती करून घेत असतो. हे भौतिक विश्व हेच सत्य आहे, हे जाणून घेण्यासाठीच तो भौतिक शरीरात प्रवेश करतो.ज्याप्रमाणे पाणी, बर्फ व वाफ ही विविध तरंगलहरींवरील एकाच गोष्टीची रूपे असतात, त्याप्रमाणे आपले भौतिक शरीरही असते. परंतु अवकाशीय जग हे वेगळ्या तरंगलहरीवर असते. जर त्या तरंगलहरींबरोबर आपण सूर जुळविला तर आपल्याला त्या लहरी समजू शकतात.आपण एकटे नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या विश्वाचाच आपण एक भाग आहोत. निर्माण करणाऱ्याने जे निर्माण केले त्यात व आपणात एक प्रकारची एकवाक्यता आहे. आपण आपल्याला घडवू शकतो व आपल्या अंधुक जाणिवांची उत्क्रांती घडवून आणू शकतो. आपल्या अतिंद्रिय शक्तींचा विकास करून विश्वातील ऊर्जा बघू व जाणवू शकतो. त्याच्याचमुळे आपण मानव व प्राणी यांच्या भोवतीचे दैवी आवरण बघू शकतो. अवकाशीय जगातील आवाज ऐकू शकतो व अतिंद्रिय शक्तीने अनेक गोष्टींचे ज्ञानही मिळवू शकतो. प्रत्येक मानवाला त्याच्या स्वत:च्या प्रयत्नाने विश्वाशी जोडण्याची प्रक्रिया निर्माण करायची असते. दैवीतत्त्वाचे ज्ञान समजून घेणे हे विशेष काम आपणास करायचे असते. आपल्यातले पुष्कळ जण ही महत्त्वाची गोष्ट न समजताच जगतात. मेंदूमध्ये खोलवर असलेली वाटाण्यासारखी पिनियल ग्रंथी ही तत्त्वज्ञानी व गूढवादी यांच्या मते भौतिक व अतिंद्रिय जगाशी संपर्क साधणारी एकसारखी आहे. ज्याला तिसरा डोळा किंवा आत्म्याची जागा असे म्हटले जाते, ती ही ग्रंथी ध्यान व दैवी शिक्षण याद्वारे उद्दीपित केली जाते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक