शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतीच्या बरकतीची देदीप्यमान दहा वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:19 IST

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे अर्थ, संरक्षण अशा अन्य क्षेत्राचेही तज्ज्ञ, पण त्यांचा खास जीव शेतीवर. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम जवळून अनुभवता आले.

- डॉ. शंकरराव मगर(माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) ही मार्च २००५ मधील घटना आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ चीन दाैऱ्यावर होते. तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यात मी होतो. आमची खास भेट ‘वॉटर बफेलो’ केंद्रातील २,५०० म्हशींच्या अत्याधुनिक गोठ्यास होती. प्रत्येक म्हशीचे रोज ३४ किलो दूध हा आमचा जिव्हाळ्याचा विषय होता. भेट सुरू होताच साहेबांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे रूपांतर रागात झाले व भेट अर्धवट सोडून ते निघून गेले. नंतर आम्हास खडसावले. ‘अहो, या तर आपल्या हरयाणातील मुऱ्हा म्हशी. त्यांनी ती वंशावळ जपली. चांगले व्यवस्थापन केले. तेव्हा आपण कुठे कमी पडतो ते प्रथम शिका!’ असाच अनुभव ब्राझीलने जपलेल्या गीर गाईंचा होता. परिणाम हा झाला की कर्नालच्या राष्ट्रीय दुग्धोत्पादन विकास केंद्राचे उपकेंद्र राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘सिमेन प्रीझर्व्हेशन अँड प्युरिटी’ नावाने आले. २५० कोटी खर्च करून जागतिक कीर्तीचे अत्याधुनिक केंद्र नामवंत पशुजातींची वंशावळ जतन करण्यासाठी १०० एकरांवर उभे राहिले. दुभत्या जनावरांच्या विविध जातींची शुद्धता सांभाळण्याकडे लक्ष देण्याच्या या कार्यशैलीमुळे दुधाचे उत्पादन वाढले. देश पहिल्या क्रमांकावर पोहोचला. सन २०११-१२ मध्ये १२७.१ दशलक्ष टन तर २०१४ मध्ये ते १७६ दशलक्ष टनांवर पोहोचले. याच काळात अंडी उत्पादन २७ अब्जावरून ६६.५ अब्ब्जावर पोहोचले. अशा शेतीपूरक व्यवसायाची पायाभरणी पक्की असली की काय होते, याची ही झलक होती.तसे पाहता, शरद पवार हे अर्थ, संरक्षण अशा अन्य क्षेत्राचेही तज्ज्ञ, पण त्यांचा खास जीव शेतीवर. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम जवळून अनुभवता आले. त्याचे सिंहावलोकन त्यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने करणे नक्कीच संयुक्तिक ठरेल. हरितक्रांतीची सुरुवात चांगली झाली, पण नंतर सातत्य राहिले नाही. कृषिविकास दर घसरत घसरत उणे झाला. विविध पिकांच्या उत्पादनावर विशेषत: धान (भात) व गव्हावर आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात कृषिसंलग्न व्यवसायांवर आवश्यक भर देण्यात आला नाही. रसातळाला गेलेले शेतीविकास दराचे चक्र सुलटे फिरवून ते प्रगतीच्या शिखरावर आणणे हे मोठे आव्हान होते. ते शिवधनुष्य उत्तम नियोजन, अविरत कष्ट आणि शास्त्रज्ञ-शेतकऱ्यांचा सहभाग या माध्यमातून पवार यांनी पेलले.दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बारामती भेटीत जाहीरपणे सांगितल्यानुसार, केंद्रात सत्ता आल्यावर मंत्रिमंडळात पवारसाहेब कोणते खाते मागणार, यावर खलबते सुरू होती. ते संरक्षण किंवा अर्थ मागतील, असे सर्वांना वाटत होते. त्यांनी कृषिखाते मागितले, तेव्हा मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पवार यांच्या शेतीवरील सर्वश्रुत प्रेमाची ही पावती. शेतीमधील प्रगतीचा हा मार्ग प्रशस्त करणाऱ्या पद्मविभूषण शरद पवार यांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा!डेडिकेटेड, इंटिग्रेटेडकेवळ शेती परवडत नाही. त्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन हवा. म्हणूनच फलोत्पादन अभियान, बांबू अभियान, पशुधनविकास व दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय अशा शेतीपूरक व्यवसायांची सांगड घालण्यात आली. महाराष्ट्रातील रोहयोअंतर्गत १०० टक्के अनुदानावर फलोत्पादन योजनेचा अनुभव पाठीशी होताच. विविध राज्यांचे कृषिमंत्री, सचिव, राष्ट्रीय संशोधन केंद्रांमधील शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते आदींशी थेट संवाद, ठरलेल्या कार्यक्रमाचा प्रचंड पाठपुरावा, महत्त्वाचे म्हणजे राजकीय कौशल्य वापरून अर्थसंकल्पात भरीव तरतूद या मार्गाने हा यशस्वी प्रवास झाला. फलोत्पादनफलोत्पादन हा साहेबांचा आवडता विषय. त्यातही त्यांनी ईशान्य भारताकडे लक्ष वळविले. दुर्लक्षित राज्यांमध्ये टेक्नालॉजी मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट सुरू करण्यात आले. अकराव्या पंचवार्षिक योजनेत त्याचे फलित पाहावयास मिळाले. सणासुदीला किंवा आजारपणात दिसणारे सफरचंद हातगाडीवर वर्षभर उपलब्ध आहे. स्वतंत्र फलोत्पादन विद्यापीठे, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च ही त्यांचीच प्रेरणा. प्रत्येक फळपीक, भाजीपाला, लसूण, कांद्यासाठी खास राष्ट्रीय संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagricultureशेती