शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:59 IST

नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही.

ठळक मुद्देमोफत पुस्तकेच नाही : नवीन सत्राचे आठ दिवस लोटले, आठवीचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही. अभ्यासक्रम बदललेल्या आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग राखावा लागला. शिवाय पाचव्या वर्गाची पुस्तके वितरणात दुजाभाव चालविला. चौथीचा वर्ग जोडून असलेल्या शाळांनाच पाचवीची मोफत पुस्तके दिली जात आहे. एकूणच जिल्ह्यात मोफत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पूर्ण पाठ्यपुस्तके अपवादानेच मिळालेली आहे. यावर्षीही तेच घडले. पालकांनी घेऊन दिलेली बुकं दप्तरात टाकून विद्यार्थी शाळेत पोहोचले. मात्र त्यांच्या हाती पुस्तकाचा पूर्ण संच पडलाच नाही. काही विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांवर भागवावे लागले आणि लागत आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील शाळांनाही याचा अनुभव येत आहे. पुस्तकांचे गठ्ठे वाहनाने शाळांमध्ये पोहोचले. त्यात काही ठिकाणी एकाच विषयांची अधिक तर, काही विषयांची कमी पुस्तके टाकली गेली आहे.चौथीचा वर्ग जोडून असलेल्या शाळांनाच पाचवीची पुस्तके द्यायची, असा प्रकारही येथे घडला आहे. गतवर्षीपर्यंत असे होत नव्हते. यावेळी मात्र याचीही सुरुवात झाली आहे. यातही दुजाभाव झाल्याची ओरड आहे. चौथीचा वर्ग जोडून नसलेल्या काही शाळांना पाचवीची पुस्तके मिळाली असल्याचे मान्य केले जात आहे. यावर्षी आठव्या वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलेला आहे. नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गतवर्षीपर्यंत जुन्या पुस्तकावर भागविले जात होते. यावर्षी ती सोयही नाही. पुस्तकाचा पूर्ण संच मिळाला, हे अपवादानेच झाले आहे. आवश्यकतेपेक्षा कमी पुस्तके मिळाल्याचे शाळांकडून सांगितले जाते. १५० विद्यार्थ्यांसाठी ७० ते ७५ पुस्तके आल्याने ती वाटायची कशी, हा प्रश्न काही शाळांपुढे आहे. पुस्तके नसल्याने ज्ञानदानाचा तर विद्यार्थ्यांपुढे विद्याजर्नांचा प्रश्न आहे.यूडायसमध्ये माहिती भरली गेली नसल्याने चौथीचा वर्ग जोडून नसलेल्या शाळांना पाचवीची पुस्तके उपलब्ध होऊ शकली नाही. शिवाय इतर वर्गांना अद्याप पुस्तके वितरित झाली नसली तरी लवकरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील.- शेषराव राठोड,गटशिक्षणाधिकारी यवतमाळ

टॅग्स :educationशैक्षणिक