शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Election: निवडणुका जिंकायच्या तर जनाधार हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 10:09 IST

Election: काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मंत्री सचिन पायलट यांनी आजच्या ज्वलंत प्रश्नांविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांच्याशी केलेली बातचीत.

काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मंत्री सचिन पायलट यांनी आजच्या ज्वलंत प्रश्नांविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांच्याशी केलेली बातचीत. 

मोदी सरकारची अग्निपथ योजना तुम्हाला कशी वाटते? अतिशय घाईने ही योजना आणली गेली आहे. सैन्यदलात भरती होणे म्हणजे दुसऱ्या कुठल्या नोकरीला लागण्यासारखे असत नाही. ती अभिमानाची आणि मनापासून करण्याची गोष्ट आहे. सैन्यदलात कोण जाते? कुठल्याही राजकारण्याची, नोकरशहांची किंवा उद्योगपतींची मुले सैन्यात जात नाहीत. प्रामुख्याने खेड्यातली, गरीब शेतकऱ्यांची मुले लष्करात जातात. त्यांना भारतमातेची सेवा करायची असते. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन ते तयारी करतात. केवळ चार वर्षांची कालमर्यादा ठेवण्यात आल्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.लष्कर भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत नाही?लष्करात सुधारणा आणायला कोणाचाही विरोध नाही. आम्हालाही आधुनिकीकरण हवे आहे; पण ते कसे करायचे याची काही पद्धत असते. आधी एक पथदर्शक प्रकल्प आणायला हवा होता. त्यातल्या उणिवा लक्षात घेऊन त्या दूर करता आल्या असत्या. समाजावर त्याचा काय परिणाम होतो याचा अंदाज घेतला गेला पाहिजे.बेकार असण्यापेक्षा हातात कुठली तरी नोकरी असणे तरुणांसाठी अधिक चांगले नाही का? सैन्य दलात सेवा बजावणे नोकरी आहे असे मला वाटत नाही. सैनिक छातीवर गोळी झेलतात ती भारतमातेवरच्या प्रेमापोटी. काही हजारांच्या पगारासाठी नाही. जगण्यासाठी लोक ‘नरेगा’वर  काम करतात. लष्कर भरतीवर सरसकट बंदी देशहिताची ठरणार नाही.राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे. त्याविरुद्ध संपूर्ण काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे असे वाटत नाही?हे प्रकरण सात वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. केवळ काँग्रेस नेतृत्वाला त्रास देण्यासाठी ते पुन्हा सुरू करण्यात आले. या प्रकरणात कोणाची तक्रार नाही. प्रथम माहिती अहवाल दाखल झालेला नाही. काहीही चुकीचे केलेले नाही. पैसे दुसरीकडे वळवले किंवा काही गफला केला असेही झालेले नाही. तरीही ते खटला उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीबीआय आणि आयकर यासारख्या संस्थांचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी केला जात आहे. ही १९७७ सालची पुनरावृत्ती आहे असे वाटते का? त्यावेळी इंदिरा गांधींना त्रास देण्यासाठी शाह कमिशनचा वापर केला गेला; पण नंतर काय घडले ते सर्वांनाच ठाऊक आहे. इंदिराजी पुन्हा सत्तेवर आल्या. जेव्हा लोकांचा आवाज दडपला जातो, तेव्हा प्रतिक्रिया उमटणारच. काँग्रेस पक्षसुद्धा राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकवटला आहे.परंतु, पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल इंदिरा गांधींना प्रश्न केले जात होते. राहुल गांधींच्या बाबतीत व्यक्तिगत आर्थिक आरोप केले गेले आहेत..हाच तर माझा मुद्दा आहे. हे केवळ आरोप आहेत आणि ते कोण, कोणत्या आधारावर करत आहे? कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. ती एक ना नफा तत्त्वावरची कंपनी.  एक पैसासुद्धा तिच्यातून घेतला गेला नाही. नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसचे वृत्तपत्र आहे. जसे शिवसेनेचे सामना हे वृत्तपत्र किंवा कम्युनिस्टांचीही वृत्तपत्रे आहेत. इतकंच कशाला, भाजपची स्वतःची प्रकाशने आहेत. जेव्हा आमचे वृत्तपत्र अडचणीत आले, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यात चुकीचे काय आहे? हा खोटानाटा रचलेला खटला आहे. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. काँग्रेस पक्षाचे सध्याचे दुखणे कोणते?लोकांच्या प्रश्नांसाठी लढत आहोत. मग ती चलनवाढ असो किंवा बेरोजगारी. तीन कृषी विधेयकांच्या विरुद्ध आम्ही लढलो आणि आता अग्निपथ योजनेविरुद्ध रस्त्यावर आहोत. आम्ही लढत राहिलो. आज ना उद्या लोक आमच्या पाठीशी उभे राहतील.काँग्रेस पक्षात कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले जाते आणि स्तुतिपाठकांना  बक्षीस मिळते अशी भावना नाही काय? होय, तळागाळाशी घट्ट नाते असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाने शाबासकी द्यायला हवी. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी विधानसभा निवडणुका जिंकायच्या तर विश्वासार्ह आणि जनाधार असलेले लोक गरजेचे आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान